मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: DRDO पासून अमेझॉनपर्यंत इथे आहेत नोकरीच्या संधी, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

Job Alert: DRDO पासून अमेझॉनपर्यंत इथे आहेत नोकरीच्या संधी, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

Amazon ही जगातली मोठी E commerce कंपनी भारतात 10 लाख नोकऱ्या देणार आहे. सरकारी नोकरीच्याही संधी आहेत. पाहा या आठवड्यात निघालेल्या Job Vacancies

Amazon ही जगातली मोठी E commerce कंपनी भारतात 10 लाख नोकऱ्या देणार आहे. सरकारी नोकरीच्याही संधी आहेत. पाहा या आठवड्यात निघालेल्या Job Vacancies

Amazon ही जगातली मोठी E commerce कंपनी भारतात 10 लाख नोकऱ्या देणार आहे. सरकारी नोकरीच्याही संधी आहेत. पाहा या आठवड्यात निघालेल्या Job Vacancies

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर: तुम्हीसुद्धा सरकारी किंवा खाजगी नोकरीच्या (Jobs) शोधत आहात? तुमचं उत्तर हो असेल तर, येत्या काही दिवसांत अशा अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. काही क्षेत्रांमधील नोकरभरतीचा (Job alert) हा शेवटचा आठवडा असेल. काही सरकारी विभाग वगळता ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनमध्ये  (Amazon job vacancies) सुमारे 55 हजार नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. या संधींसाठी कसा अर्ज करू शकता हे आपण पाहणार आहोत.खाली संस्थेचं नाव आणि त्यातील नोकरीच्या संधी दिल्या आहेत.

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO)

'डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन'ने बेंगळुरू येथील सेंटर ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्समध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो या पदासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी 18 आणि 19 ऑक्टोबर 2021 ला वॉक इन इंटरव्ह्यू ठेवण्यात आले आहेत. मुलाखतीत चांगली कामगिरी करणाऱ्या उमेदवारांची सुरवातीला 2 वर्षांसाठी नेमणूक केली जाईल.

राजस्थान RSMSSB

राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्ड (RSMSSB) एका लेखी परीक्षेच्या माध्यमातून २५० संगणक चालकांची (Computer operator) भरती करणार आहे.

Nashik Job Alert: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक इथे नोकरीची संधी

यासाठी rsmssb.rajasthan.gov.in या संकेतस्थळावर 8 ऑक्टोबर 2021पर्यंत अर्ज करता येणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडे गणित किंवा अर्थशास्त्र विषयातील पदवी आणि कॉम्प्युटर विषयातील पदविका असणं आवश्यक आहे.

सिक्कीम लोकसेवा आयोग

सिक्कीम लोकसेवा आयोगाने(SPSC) www. spscskm.gov.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावर मत्स्य ब्लॉक अधिकारी पदासाठी 11 तर मत्स्य रक्षक पदाच्या 13 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या पदासाठी 15 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

छत्तीसगडमध्ये प्राध्यापक पदासाठी 595 जागा

छत्तीसगड लोकसेवा आयोगाने(CGPSC) प्राध्यापक पदासाठी जाहिरात दिली आहे. एकूण 595 पदांसाठी ही भरती होणार असून, 13 सप्टेंबर 2021 पासून www.psc.cg.gov.in या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारले जातील. हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल यांसह विविध विषयांसाठी प्राध्यापक नेमले जाणार आहेत. यासाठी यूजीसीच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पीएचडी पदवी मिळवलेली असणं बंधनकारक आहे. त्यासोबतच शिक्षण क्षेत्रातील किमान १० वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

Indian Navy Recruitment: भारतीय नौसेनेत इंजिनिअर्सच्या तब्बल 181 जागांसाठी भरती

नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कार्पोरेशन

नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कार्पोरेशन(NHPC) अंतर्गत सीनियर मेडिकल ऑफिसर, ज्युनिअर इंजिनिअर, असिस्टंट राजभाषा अधिकारी यांसह एकूण १७३ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून nhpcindia.com या संकेतस्थळावर 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

अमेझॉन भारतात देणार 10 लाख नोकऱ्या

बहुराष्ट्रीय ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन(amzon) यावर्षी भारतात ८ हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. देशातील ३५ शहरांमध्ये कॉर्पोरेट, टेक्नॉलॉजी, कस्टमर केअर सर्व्हिस आणि ऑपरेशन क्षेत्रात नोकरभरती होईल. यात मुंबई, पुणे बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, गुरूग्राम, कोलकाता, नोएडा, अमृतसर, अहमदाबाद, भोपाळ, जयपूर, कानपूर, कोईमतूर, लुधियाना, सुरत या शहरांचा समावेश आहे. 'न्यूज १८'च्या वृत्तानुसार २०२५ पर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अमेझॉन तब्बल १० लाख नोकऱ्या भारतात उपलब्ध करून देणार आहे.

त्यामुळे तुम्ही वर दिलेल्या वेबसाइट्सवर जाऊन त्या त्या पदाची व्यवस्थित माहिती घ्या आणि पात्र असल्यास अर्ज करा.

First published:

Tags: Job alert