मुंबई, 12 सप्टेंबर: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक (MUHS Nashik Recruitment 2021) इथे प्राध्यापक पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, परीक्षा नियंत्रक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
प्राध्यापक (Professor)
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
परीक्षा नियंत्रक (Controller of Examination)
पात्रता आणि अनुभव
प्राध्यापक (Professor) - कोणत्याही वैद्यकीय शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - कोणत्याही वैद्यकीय शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - कोणत्याही वैद्यकीय शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
परीक्षा नियंत्रक (Controller of Examination) - कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
अर्ज करण्याचा ई-मेल आयडी
रजिस्ट्रार MUHS, वाणी रोड, म्हसरूळ, नाशिक- 422004 / establishment@muhs.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 ऑक्टोबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.muhs.ac.in/ या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs, Nashik