नवी दिल्ली 11 सप्टेंबर: भारतीय नौसेनेत (Indian Navy Recruitment 2021) इंजिनिअर्सच्या (Indian Navy Engineers jobs) तब्बल 181 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. SSC ऑफिसर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 अक्टूबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
SSC ऑफिसर (Short Service Commission Officer) - एकूण जागा 181
पात्रता आणि अनुभव
SSC ऑफिसर (Short Service Commission Officer) - कोणत्याही शाखेतून 60% गुणांसह BE किंवा B. Tech ची पदवी असणं आवश्यक.
असम राइफल्समध्ये 10वी पास उमेदवारांसाठी पदभरती; महाराष्ट्र्रासाठी इतक्या जागा
अशी होणार निवड
सर्वात आधी परीक्षा त्यानंतर मेरिट लिस्ट आणि त्यानंतर मुलाखत अशाप्रकारे या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 अक्टूबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.joinindiannavy.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Indian navy, Jobs