• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Job Alert: 10वी पास असणाऱ्यांसाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Job Alert: 10वी पास असणाऱ्यांसाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज

दहावी पास असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी कसा अर्ज करायचा आहे जाणून घ्या सविस्तर.

 • Share this:
  मुंबई, 26 फेब्रुवारी : दहावी पास आणि बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची खास संधी आहे. हिंदुस्थान कॉपर लिमिटेड कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. 120 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना नेमकं काय करायचं? अर्ज कसा करायचा जाणून घ्या सविस्तर. एकूण रिक्त जागा 120 इलेक्ट्रिशियन: 20 इंस्ट्रूमेंट मॅकेनिक: 02 मॅकेनिक डिजल: 11 वेल्डर (जी एंड ई): 14 फिटर: 14 टर्नर: 06 रेफ्रिजरेशन एंड एसी मॅकेनिक: 02 ड्राफ्टमॅन (मैकेनिक): 03 ड्राफ्टमॅन (सिविल): 01 हेही वाचा-बाबा गेल्यानंतर शिक्षणासाठी दमडी नव्हती, सायकलचं पंक्चर काढणारा आज झाले IAS सर्वेयर: 05 कारपेंटर: 03 प्लंबर: 02 मेसन: 01 टेलीकॉम मॅकेनिक: 02 हॉर्टिकल्चर असिस्टेंट : 02 शॉर्टफिल्टर/ब्लास्टर (माइंस) : 14 मेट (माइंस): 18 शैक्षणिक पात्रता- इच्छुक उमेदवार दहावी पास असणं आवश्यक आहे. संबंधित ट्रेडमधील आईटीआई प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. अर्जदाराचं वय किती असावं?- इच्छुम उमेदवाराचं वय 31 जानेवारी 2020 पर्यंत 25 वर्षांपेक्षा अधिक असून नये. यामध्ये OBC कर्मचाऱ्यांना तीन वर्ष sc/st कर्मचाऱ्यांना 5 वर्षांची सूट देण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया- इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यातून उमेदवारांची निवड करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. असं करा अल्पाय- इच्छुक उमेदवारांनी apprenticeship.gov.in या वेबसाईटला भेट द्या. तिथे लॉग इन करून आपल्याला ज्या पदांसाठी अर्ज करायचा आहे तो करू शकता. हेही वाचा-नोकरी शोधताय तर मग या 5 Applicationवर करा आपला CV अपलोड
  Published by:Kranti Kanetkar
  First published: