मुंबई, 16 फेब्रुवारी: आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आणि सध्या आपण कुठे आणि कसा अर्ज करायचा याची कोणतीही माहिती मिळत नसेल किंवा नव्यानं नोकरी शोधत आहात मग अशावेळी काय करायचं तर असा प्रश्न पडतो. त्यावेळी कामी येतं ते सोशल मीडिया. आज आम्ही आपल्याला नोकरी शोधण्यासाठी मदत करणार आहोत तुम्ही नोकरीपर्यंत आणि नोकरी तुमच्यापर्यंत अगदी एका क्लिकवर आणि सहज पोहोचू शकते. आपलं सोशल मीडिया अपडेट ठेवणं आजच्या काळात सर्वात मोठी गरज आहे. त्याच सोबत आणि काय महत्त्वाचं आहे पाहा. 1. LinkedIn LinkedIn हे व्यवसाय नेटवर्किंग साइट Application आहे. इथे वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज आपल्या व्यवसायाबद्दल माहिती देत असतात. त्यांनी आता इथे नोकरीचा पर्याय खुला केला आहे. हे जॉब सर्चिंग अॅप आहे. या अॅपमध्ये आपल्याला शैक्षणिक तपशीलांसह आपला रेझ्युमे अपलोड करावा लागेल. त्यानंतर आपल्याला जॉब ऑप्शनमध्ये नोकरीच्या संधी कुठे आहेत त्या दिसतील. 2. Shine.com भारतातील दुसऱ्या क्रमांकावरचा जॉब सर्चिंग प्लॅटफॉर्म आहे. या अॅपद्वारे हजारो तरुण नोकऱ्या शोधतात. या अॅपमध्ये तीन लाखाहून अधिक थेट रोजगार आहेत. या अॅपमध्ये 14 हजाराहून अधिक भरती करणारे आहेत. अॅपमध्ये तीन कोटीहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. या अॅपमध्ये आपल्याला आपल्या पात्रता, पगार आणि CV अपडोल करायचा आहे. त्यानुसार आपल्याला नोकरी मिळू शकेल. हेही वाचा- नव्या कर प्रणालीत काय आहे TAX FREE? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर 3. Monster.com हे एक जॉब सर्चिंग अॅप आहे. या अॅपद्वारे जगभरातील सर्व कंपन्यांमधील नोकरीच्या संधी आपल्याला पाहाता येणार आहेत. आपल्या पात्रतेनुसार आपण तिथे अर्जही करू शकता. या अॅपमध्ये रेझ्युमे अपलोड करून इतर अॅप्सपेक्षा लवकर नोकरी मिळण्याची शक्यता आहे. 4. Indeed.com देशविदेशातील नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी हे सर्वात उत्तम अॅप आहे. यामध्ये आपला सीव्ही अपलोड करायचा आणि ऑनलाईन नोकरी शोधायची. हे अॅप आयएसओ आणि अँड्रॉईड दोन्ही फोनमध्ये वापरू शकता. या अॅपच्या माध्यमातून 60 देशांमध्ये आणि 28 भाषांमध्ये उपलब्ध आहे. 5. Glassdoor आपण एखादे नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी ग्लासडोरसारखं अॅप्लिकेशन नाही. ग्लासडोरसारखं अॅप आपल्या कौशल्यासोबत जुळवून आपल्याला कोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत ते आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं जातं. हेही वाचा- परदेशी कन्येपासून राहुल गांधींचा जन्म देशासाठी चुकीचा, भाजप MPचं खळबळजनक वक्तव्य
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







