Sakari Naukri: 10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, रेल्वेमध्ये 400 जागांसाठी भरती

Sakari Naukri: 10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, रेल्वेमध्ये 400 जागांसाठी भरती

लेखी परीक्षा न घेता होणार निवड, कसा भरायचा पदांसाठी अर्ज वाचा सविस्तर.

  • Share this:

मुंबई, 26 जानेवारी: 10 आणि 12 पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी आली आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आजच अर्ज भरा. रेल्वे मंत्रालयानं रेल्वे कोच फॅक्टरीसाठी 400 पदांची भरती सुरू केली आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 फेब्रुवारी असल्यांच त्यांनी आपल्या संकेतस्थळावर सांगितलं आहे. या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी पास असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे आयटीआय प्रमाणपत्रही असावं. फॅक्टरी फिटर, वेलडर, मशिनिस्ट, पेंटर, सुतार, मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आणि एसी आणि रेफ्रिजरेटर मेकॅनिक या पदांसाठी रेल कोच भरती करणार आहे. तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.

RRB Recruitment 2020: पदांची नाव आणि एकूण जागा-

फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर, कारपेंटर, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आणि एसी अॅण्ड रेफ्रिजरेटर मेकॅनिक

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान 10वी पास असणं आवश्यक आहे. त्याचं वय 15 वर्षांपेक्षा कमी असू नये. 15 ते 24 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज कऱण्यास पात्र आहेत. या जागांसाठी अर्ज केल्यानंतर 100 रुपये फी भरावी लागणार आहे. उमेदवाराची लेखी परीक्षा होणार नाही. मात्र 10 किंवा 12वी परीक्षेतील मेरिटलिस्टच्या आधारावर निवड करण्यात येईल.

कसा कराल अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवार rcf.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट द्या.त्यावर रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर न्यूज सेक्शन किंवा अनाऊंसमेंट सेक्शनला पदांसाठी भरती असा पर्याय असेल त्यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरा. फोटो अपलोड करा आणि सही करा. त्यानंतर अर्ज आणि फी सबमिट करा. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर, अर्जाची प्रिंट घ्या.

हेही वाचा-SBI Recruitment 2020: पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

हेही वाचा-JOB आहे की स्वप्न! फिरण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी कंपनीच देणार 16 लाख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2020 02:16 PM IST

ताज्या बातम्या