मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Job Alert : BSNL मध्ये बंपर भरती आजच करा अर्ज; पात्रता, वयोमर्यादा, शिक्षण जाणून घ्या एका क्लिकवर

Job Alert : BSNL मध्ये बंपर भरती आजच करा अर्ज; पात्रता, वयोमर्यादा, शिक्षण जाणून घ्या एका क्लिकवर

बीएसएनएलमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदांवर भरती केली जात आहे. तुम्ही त्यासाठी पात्र असाल, तर सरकारी नोकरी मिळवू शकता.

बीएसएनएलमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदांवर भरती केली जात आहे. तुम्ही त्यासाठी पात्र असाल, तर सरकारी नोकरी मिळवू शकता.

बीएसएनएलमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदांवर भरती केली जात आहे. तुम्ही त्यासाठी पात्र असाल, तर सरकारी नोकरी मिळवू शकता.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 5 जानेवारी : तुम्ही इंजिनीअर असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बीएसएनएलमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदांवर भरती केली जात आहे. तुम्ही त्यासाठी पात्र असाल, तर सरकारी नोकरी मिळवू शकता. देशभरात बीएसएनएल तब्बल 11,705 रिक्त जागांवर भरती करत आहे. त्यामुळे इंजिनीअर झालेल्यांसाठी ही सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. 31 डिसेंबरला या भरती प्रक्रियेबद्दल नोटीफिकेशन जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे अद्याप ही जाहिरात पाहिली नसेल किंवा अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करू शकता. या नोकरीसाठी 20 ते 30 वर्षं वयोगटातले उमेदवार अर्ज करू शकतात.

  रिक्त जागांची माहिती कशी मिळवाल?  

  भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर या पदांसाठी (JTO) भरती नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते bsnl.co.in या BSNLच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात. या पदांसाठी अर्जप्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

  याशिवाय, उमेदवार या पदांशी संबंधित माहिती थेट https://www.bsnl.co.in/ या लिंकद्वारे देखील मिळवू शकतात. तसंच, BSNL JTO भरती 2023 नोटिफिकेशन PDF च्या माध्यमातून तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 11,705 रिक्त पदं भरली जाणार आहेत.

  हेही वाचा  : नवीन वर्षात Google आणि HCL कडून सर्वात मोठं गिफ्ट; भारतात करणार बंपर पदभरती; इथे करा अप्लाय

  BSNL JTO भरती 2023 साठी पात्रता निकष

  जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करणार आहेत, त्यांच्याकडे कोणतीही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित शाखेतील इंजिनीअरिंगची पदवी असणं आवश्यक आहे. BSNL JTO भरती 2023 साठी किमान वयोमर्यादा 20 वर्षं तर कमाल वयोमर्यादा 30 वर्षं इतकी आहे.

  हेही वाचा  : Career Tips: Mass Communication करावं की Journalism? 2023मध्ये तुमच्यासाठी कोणता कोर्स बेस्ट

  सरकारी नोकरीची चांगली संधी  

  तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर तुम्हालाही अर्ज करता येऊ शकतो. तुम्ही अधिकृत वेबसाइटवरचं नोटिफिकेशन वाचून सविस्तर माहिती घेऊ शकता. त्यानंतर या पदासाठी पात्र असाल तर अर्ज करता येईल. तब्बल 11 हजारांपेक्षा जास्त रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे इंजिनीअरिंग केलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

  First published:

  Tags: BSNL