मराठी बातम्या /बातम्या /करिअर /नवीन वर्षात Google आणि HCL कडून सर्वात मोठं गिफ्ट; भारतात करणार बंपर पदभरती; इथे करा अप्लाय

नवीन वर्षात Google आणि HCL कडून सर्वात मोठं गिफ्ट; भारतात करणार बंपर पदभरती; इथे करा अप्लाय

गुगल कंपनीला वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी हवे असून, एचसीएल टेक कंपनीला पुणे कार्यालयासाठी कर्मचारी हवे आहेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या.

गुगल कंपनीला वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी हवे असून, एचसीएल टेक कंपनीला पुणे कार्यालयासाठी कर्मचारी हवे आहेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या.

गुगल कंपनीला वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी हवे असून, एचसीएल टेक कंपनीला पुणे कार्यालयासाठी कर्मचारी हवे आहेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 जानेवारी:  2023 या वर्षावर काहीसं मंदीचं सावट असल्याची चिन्हं असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 2022मध्ये अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्याने परिस्थिती आधीच बिकट आहे; मात्र काही आशेचे किरणही दिसत आहेत. गुगल तसंच एचसीएल टेक या कंपन्यांनी कर्मचारी भरतीची घोषणा केली आहे. गुगल कंपनीला वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी हवे असून, एचसीएल टेक कंपनीला पुणे कार्यालयासाठी कर्मचारी हवे आहेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या. 'कंटेंट डॉट टेक गिग डॉट कॉम'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

Google 

भारतातल्या प्रमुख तंत्रज्ञानविषयक कंपन्यांमध्ये गुगलचाही समावेश होतो. कारण गुगल कंपनी संपूर्ण वर्षभर भारतातून अनेक नव्या तंत्रज्ञांची भरती करत असते. आता कंपनीने जाहीर केलेली भरती टेक्निकल प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी आहे. तसंच, ही जबाबदारी उमेदवारांनी घरून काम करून म्हणजेच वर्क फ्रॉम होम करून सांभाळायची आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी गुगल कंपनीशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

या उमेदवारांनी काय काम करणं अपेक्षित आहे, याबद्दलही थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.

- उत्तर अमेरिकेतल्या बाजारपेठांमध्ये फिल्ड टेस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी सेल्युलर सिस्टीम व्हॅलिडेशनचं व्यवस्थापन आणि नेतृत्व.

- दिलेल्या वेळेत प्रोग्राम्स, प्रोजेक्ट्स, प्रॉडक्ट्सची उद्दिष्टं गाठण्यासाठी टेक्निकल जजमेंट

- टेस्टिंग प्रोग्रेसमध्ये दर्जाबद्दलची माहिती स्टेकहोल्डर्सना देणं, फिल्ड ऑटोमेशनच्या संधी ओळखणं, तसंच फिल्ड ऑटोमेशन टूल्स आणि प्रोसेसेस विकसित करणं, त्यांचं व्यवस्थापन करणं.

- 5G R15/R16 कॅरिअर फीचर्सचं समरायझेशन, डेटा विश्लेषण, बग रिपोर्टिंगचं व्यवस्थापन करून पिक्सेल मॉडेम क्वालिटी राखणं.

- वेगवेगळ्या प्रदेशांतल्या फिल्ड टेस्ट्समधल्या 5G/4G लॉग्जचं विश्लेषण करणं, महत्त्वाच्या समस्या ओळखणं आणि त्या सोडवण्यासाठी सॉफ्टवेअर टीमसोबत काम करणं

HCL tech 

एचसीएल टेक ही भारतीय मल्टिनॅशनल इन्फोटेक सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग कंपनी आहे. तिचं मुख्यालय नोएडात आहे. ही कंपनी सध्या पुणे कार्यालयात सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची भरती करत आहे.

पात्रता :

- बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी असणं आवश्यक.

- या क्षेत्रात 0-2 वर्षांचा अनुभव आवश्यक.

- विकेंद्रित टीममध्ये Agile/Scrum टेक्निक्स वापरून लार्ज स्केल सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्स विकसित करण्याची क्षमता आवश्यक.

- क्रिएटिव्ह विचार करून सोल्युशन्स काढता आली पाहिजेत.

- CSS, Angular, EXTJS, Bootstrap, JQuery यांची माहिती असल्यास उत्तम; मात्र हे अत्यावश्यक नाही.

- JSP, Servlet, Tag Library, XSLT, and Restful APIs यांबद्दल माहिती असल्यास उत्तम.

जबाबदाऱ्या :

- बग्ज आणि इतर समस्या सोडवून प्रोजेक्ट सुरळीतपणे सुरू ठेवणं

- ग्राहकांच्या गरजा जाणून घेणं आणि त्या कोडमध्ये परिवर्तित करणं.

- टास्क रेकॉर्डिंग क्रिएट अँड सबमिट सोर्स कोड्सचं व्यवस्थापन

एचसीएल टेक कंपनीत भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पुढे दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा.

https://unstop.com/job/developer-hcl-technologies-limited-hcl-576123?utm_source=OffCampusJobs4U-Website&utm_medium=Affiliates&utm_campaign=HCL29122022

First published:

Tags: Career, Career opportunities, Google, Job, Job alert, Jobs Exams