मुंबई, 23 जानेवारी: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main) 2023 सत्र 1 साठी परीक्षा सिटी स्लिप जारी केली आहे, जी 24 जानेवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षा 1 फेब्रुवारीपर्यंत चालेल. jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर परीक्षा सिटी स्लिप उपलब्ध आहे. या परीक्षेसाठी हॉल तिकिट्स जारी करण्यात आले आहेत. उद्यापासून ही परीक्षा सुरु होणार आहे. पण परीक्षेला जाण्याआधी काही नियम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहेत. कोणत्याही अडचणींशिवाय सेंटरवर प्रवेश हवा असेल तर या गाईडलाईन्स वाचणं आवश्यक आहे.
या गाईडलाईन्स पाळणं आवश्यक
जेईई मेनच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश आणि बाहेर पडण्याची परवानगी असेल.
जेईई मेन 2023 परीक्षेदरम्यान कोणतेही संभाषण, गोंधळ किंवा कोणत्याही प्रकारचे हावभाव गैरवर्तन मानले जाईल. कोणताही विद्यार्थी कोणत्याही प्रकारचा अन्यायकारक मार्ग वापरताना आढळल्यास, त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
विद्यार्थ्यांनी NTA वेबसाइटवरून डाउनलोड केलेले JEE Main 2023 प्रवेशपत्र तसेच A4 बाजूच्या शीटवर मुद्रित केल्यानंतर स्वयंघोषणा (अंडरटेकिंग) फॉर्म सोबत ठेवावे लागेल.
याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यासारखे वैध फोटो ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल. फोटो ओळखपत्र दाखवल्याशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवावा, जो त्यांनी नोंदणीच्या वेळी वापरला होता, कारण फक्त तोच फोटो विद्यार्थ्यांच्या उपस्थिती पत्रकावर चिकटवला जाईल.
विद्यार्थ्यांना पारदर्शक बॉल पॉइंट पेन, वैयक्तिक हँड सॅनिटायझर (50 मिली) आणि वैयक्तिक पारदर्शक पाण्याची बाटली सोबत ठेवता येणार आहे.
मधुमेही विद्यार्थी त्यांच्यासोबत साखरेच्या गोळ्या/फळे (जसे केळी, सफरचंद आणि संत्री) घेऊ शकतात.
धार्मिक कारणांसाठी कोणताही विशेष पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी तपासणीसाठी नियोजित वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Education, Entrance Exams, Job