जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JEE Mains 2022: उद्यापासून सुरु होणार JEE परीक्षेचं पहिलं सत्र; परीक्षेला जाण्याआधी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

JEE Mains 2022: उद्यापासून सुरु होणार JEE परीक्षेचं पहिलं सत्र; परीक्षेला जाण्याआधी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

JEE Mains परीक्षेसाठी हॉल तिकिट्स

JEE Mains परीक्षेसाठी हॉल तिकिट्स

आता हॉल तिकीट जारी करण्यात आलं आहे जेईई मेन 2022 च्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 जून: JEE Mains परीक्षेचे पहिले सत्र उद्यापासून म्हणजेच 23 जून 2022 पासून सुरू होत आहे. ही परीक्षा NTA द्वारे आयोजित केली जाईल आणि 29 जून 2022 पर्यंत चालेल. 23 जून ते 29 जून या कालावधीत संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE mains exam 2022) मुख्य आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. परीक्षेच्या आधी अनेक विद्यार्थी त्यांची प्रवेशपत्रे जाहीर (JEE Mains Exam 2022 Hall Ticket) होण्याची वाट पाहत होते. त्यानुसार आता हॉल तिकीट जारी करण्यात आलं आहे जेईई मेन 2022 च्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जेईई मुख्य परीक्षेची प्रवेशपत्रे सर्व एनटीए वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जारी करण्यात आली आहेत. सर्व उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याशिवाय त्यांना परीक्षा देऊ दिली जाणार नाही. जाणून घ्या जेईई मेन 2022 परीक्षेशी संबंधित खास गोष्टी. ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामध्ये जॉब ओपनिंग्स; पात्र असाल या गोष्टी ठेवा लक्षात JEE मुख्य माहिती बुलेटिन नुसार, परीक्षा केंद्रामध्ये पेन्सिल बॉक्स इत्यादींना परवानगी नाही. कोणतीही वस्तू आत घ्यायची असेल तर त्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागेल. JEE Mains परीक्षा परदेशातील 22 शहरांव्यतिरिक्त भारतातील 501 शहरांमध्ये होणार आहे. JEE परीक्षा केंद्रामध्ये पेपर, स्टेशनरी किंवा खाद्यपदार्थ आणण्यास परवानगी नाही. केंद्रामध्ये ब्लूटूथ, मोबाईल फोन, मायक्रोफोन, कॅल्क्युलेटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सना परवानगी नाही. विद्यार्थ्यांनी वैध फोटो ओळखपत्र घेऊनच परीक्षा केंद्रावर जावे. दागिने किंवा गॉगल वगैरे घालून जाऊ नका. कोविड 19 ची वाढती प्रकरणे पाहता मास्क नक्कीच लावा. बारावी नुकतीच झालीय? ‘हा’ कोर्स करा अन् लगेच 30,000 रुपये पगार मिळवा : VIDEO   असं करा हॉल तिकीट डाउनलोड सुरुवातीला नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या. होमपेजवर, ‘JEE Main Admit Card 2022’ या लिंकवर क्लिक करा. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड यांसारखी आवश्यक क्रेडेन्शियल्स टाकून तुमच्या खात्यात लॉग इन करा. वेबसाइटवरून हॉल तिकीट डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात