मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MBA करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CAT 2022 चं नोटिफिकेशन जारी; 'या' तारखेपासून सुरु होईल रजिस्ट्रेशन

MBA करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CAT 2022 चं नोटिफिकेशन जारी; 'या' तारखेपासून सुरु होईल रजिस्ट्रेशन

CAT परीक्षेचं रजिस्ट्रेशन

CAT परीक्षेचं रजिस्ट्रेशन

MBA चांगल्या कॉलजेमधून करायचं असेल तर CAT ही प्रवेश परीक्षा (What is CAT Exam?) देणं महत्त्वाचं असतं. यंदा IIM च्या प्रवेश परीक्षांसाठी CAT चं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 31 जुलै: व्यवसाय किंवा मॅनेजमेंटमध्ये आवड असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशननंतर MBA (How to do MBA after graduation) करण्याची प्रचंड इच्छा असते. पदवीनंतर MBA करून अनेक विद्यार्थी चांगला जॉब  मिळवतात. मात्र चांगला जॉब मिळवण्यासाठी चांगल्या MBA कॉलजेमधून शिक्षण घेणं महत्त्वाचं असतं. अनेकदा चांग कॉलेज न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगला जॉब लागू शकत नाही. पण मग चांगलं कॉलेज मिळणार कसं?. MBA चांगल्या कॉलजेमधून करायचं असेल तर CAT ही प्रवेश परीक्षा (What is CAT Exam?) देणं महत्त्वाचं असतं. यंदा IIM च्या प्रवेश परीक्षांसाठी CAT चं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. आज म्हणजेच 31 जुलै रोजी अधिसूचना (CAT 2022 Notification) जारी करण्यात आली आहे. यासाठी (CAT 2022) अर्ज प्रक्रिया 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. CAT 2022 साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार CAT 2022 च्या अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. CAT 2022 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर आहे. यासोबतच CAT 2022 साठी अर्ज शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. Engineersसाठी मोठी बातमी! GATE 2023 परीक्षेचं नोटिफिकेशन जारी; असं असेल पॅटर्न
याशिवाय, उमेदवार https://iimcat.ac.in/per/g01/pub/756/ASM या लिंकवर क्लिक करून CAT 2022 साठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, या लिंकद्वारे CAT 2022 अधिसूचना, आपण CAT 2022 ची अधिसूचना देखील तपासू शकता. CAT 2022 साठी संगणक-आधारित चाचणी 27 नोव्हेंबर 2022 रोजी घेतली जाईल. परीक्षा तीन सत्रात घेतली जाईल. सुमारे 150 चाचणी शहरांमध्ये पसरलेल्या परीक्षा केंद्रांवर कॅट आयोजित केली जाईल. उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या क्रमाने सहा चाचणी शहरांपैकी कोणतेही निवडण्याचा पर्याय दिला जाईल. CAT 2022 प्रवेशपत्र 27 ऑक्टोबर 2022 रोजी जारी केले जाईल.
काही महत्त्वाच्या तारखा CAT 2022 साठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख- 3 ऑगस्ट 2022 (AM 10) CAT 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 सप्टेंबर (PM 5) परीक्षेच्या अर्ज शुल्कात वाढ CAT 2022 साठी अर्ज शुल्क वाढवण्यात आले आहे. आता अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २३०० रुपये भरावे लागतील जे मागील वर्षी १९०० रुपये होते. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 1500 रुपये भरावे लागतील जे पूर्वी 950 रुपये होते. क्या बात है! इथे थेट या आणि थेट मिळवा नोकरी; कोणतीच परीक्षा देण्याची गरज नाही
अर्ज करण्याची पात्रता
CAT 2022 साठी पात्र होण्यासाठी, उमेदवाराकडे किमान 50% गुणांसह किंवा समतुल्य CGPA असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि अपंग व्यक्ती (PWD) श्रेणीतील उमेदवारांसाठी आवश्यक किमान गुण 45% आहेत.
First published:

Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Exam Fever 2022, Job, Jobs Exams

पुढील बातम्या