मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IT क्षेत्रात येणार 'ही' कंपनी घालणार धुमाकूळ! तब्बल 1 लाख फ्रेशर्सना 2022 पर्यंत देणार Jobs; वाचा काय आहे प्लॅन

IT क्षेत्रात येणार 'ही' कंपनी घालणार धुमाकूळ! तब्बल 1 लाख फ्रेशर्सना 2022 पर्यंत देणार Jobs; वाचा काय आहे प्लॅन

Cognizant करणार कर्मचाऱ्यांची भरती

Cognizant करणार कर्मचाऱ्यांची भरती

आता काही IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर जॉब्सच्या संधी (Career in IT companies in India) देण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई, 25 नोव्हेंबर: सध्याच्या काळात दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रापेक्षा IT क्षेत्रात नोकरीच्या (Jobs and salaries in IT sector) अनेक संधी उपलब्ध आहेत. कोरोनाकाळात सरासरी सर्वच क्षेत्रांमध्ये मंदी आली. काही क्षेत्रांमध्ये तर अक्षरशः पैशांची वानवा होती. मात्र याचवेळी IT क्षेत्रातील टॉप कंपन्या (Top companies in IT sector) भरघोस पैसे कमवत होत्या. म्हणजेचज कोरोना महामारीच्या संकटाच्या काळातही IT कंपन्या जोमात सुरु होत्या. म्हणूनच आता काही IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर जॉब्सच्या संधी (Career in IT companies in India) देण्यास सुरुवात केली आहे. TCS, Infosys सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांची भरती (TCS Mega recruitment for freshers) करण्याची घोषणा केली आहे. त्याच शर्यतीत आता Cognizant (Cognizant Mega recruitment for freshers in 2022) ही मागे नाहीये.

Cognizant या मोठ्या IT कंपनीनं येत्या काही काळातील IT क्षेत्रांतील स्पर्धा आणि स्कोप बघता TCS आणि इन्फोसिसच्या पावलावर पाऊल ठेवत तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांची भरती (1 lac jobs for freshers in Cognizant) करणार असल्याची माहिती मिळतेय. ExamDaily या डिजिटल वेबसाईटनं यासंबंधीचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

विविध कारणांमुळे अलीकडच्या काही दिवसांत आयटी फर्मचा अट्रिशन रेट (Attrition Rate in IT companies) थोडा जास्त आहे. कंपनीचा अ‍ॅट्रिशन रेट म्हणजेच कर्मचाऱ्यांनी नोकरीवरून राजीनामा देऊन निघून जाणे. हा अॅट्रिशन रेट कंपनीच्या टर्नओव्हर रेटवर परिणाम करेल. म्हणूनच, अनेक कंपन्या अॅट्रिशन रेट कमी करण्याचा विचार करत आहेत.

Google Career Certificate: 'या' उमेदवारांसाठी Google नं लाँच केला नवा Program

विशेष म्हणजे काही कंपन्यांची तुलना करता Cognizant चा अॅट्रिशन रेट हा तब्बल 33% आहे. तर या तुलनेत Tata Consultancy Services (TCS) ने तिमाहीत सर्वात कमी 11.9% एट्रिशन रेट नोंदवला, तर Infosys ने 20.1%, Wipro 20.5% आणि HCL Technologies ने ही संख्या 15.7% इतका रेट

नोंदवला. त्यामुळे आता अॅट्रिशन रेट कमी करण्यातही अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत.

त्यामुळे ognizant आता इतर कंपन्यांच्या व्यतिरिक्त अॅट्रिशनच्या समस्येचा सामना करण्यासाठी रिटेन्शन आणि रिक्रूटमेंटवर लक्ष केंद्रित करत आहे. कॉग्निझंटचे सीईओ ब्रायन जे. हम्फ्रीस यांचा Q3 अर्निंग कॉल घोषणेवर देखील यावर लक्ष केंद्रितकरत आहे. Cognizant नं तिसर्‍या तिमाहीत 17,000 हून अधिक नेट हेडकाउंट वाढवले आहे. 2022 पर्यंत भारतातील तब्बल 45,000 नवीन पदवीधरांना नियुक्त करण्याची कंपनीची योजना आहे.

चालू आर्थिक वर्षात सुमारे एक लाख IT एक्पर्टसची नियुक्ती करण्याचीही Cognizant ची योजना आहे. कॉग्निझंटच्या सीईओने असेही सांगितले की कंपनी चौथ्या तिमाहीत वार्षिक वाढीसह अनेक कार्यक्रमांद्वारे कर्मचार्‍यांच्या करिअरची प्रगती आणि प्रतिबद्धता वाढवण्यास उत्सुक आहे

First published:

Tags: Career opportunities, जॉब