मुंबई, 28 ऑक्टोबर: नामांकित IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) इंजिनिअरिंग पदवीधरांची भरती (TCS jobs for Freshers) करण्यासाठी ऑफ-कॅम्पस ड्राइव्हच्या फेज 2 (TCS Hiring Phase 2) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. 2020 किंवा 2021 मध्ये BE, BTech, ME, MTech, MCA, MSc पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी या भरती मोहिमेसाठी पात्र असणार आहेत.इंजिनिअरिंग फ्रेशर्ससाठी (TCS jobs for Engineering Freshers) असणाऱ्या या भरतीमध्ये अप्लाय करण्यासाठी शेवटची तारीख ही 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
TCS ऑफ कॅंम्पस ड्राइव्हसाठीचा (TCS off campus drive) हा Phase 2 असणार आहे. नोकरीसाठी निवड होण्यासाठी, उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण करावी लागणार आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. TCS च्या अधिकृत वेबसाइटवर या वेळापत्रकाची घोषणा केली जाणार आहे.
हे उमेदवार असतील पात्र
उमेदवार हे 2020 किंवा 2021 या शैक्षणिक वर्षात पास आउट झाले असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी त्यांच्या इयत्ता दहावी, बारावी, डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत किमान एकूण ६० टक्के गुण मिळवलेले असणं आवश्यक आहे.
उमेदवाराचं वय 18 - 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
किमान दोन वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना TCS ऑफ कॅंम्पस ड्राइव्हमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.
तुमचंही शिक्षण Computer Science मध्ये झालंय? हे आहेत भरघोस पगारचे टॉप 10 जॉब्स
अशी होणार उमेदवारांची निवड
लेखी परीक्षेत दोन भाग असतील - भाग A मध्ये cognitive skills वर प्रश्न असतील तर भाग B मध्ये प्रोग्रामिंग कौशल्यांचे प्रश्न असतील. भाग A साठी 120 मिनिटे आणि भाग B साठी 180 मिनिटांचा कालावधी असणार आहे. लेखी परीक्षेचा निकाल TCS iON द्वारे कळवळा जाणार आहे.
अशा पद्धतीनं करा अप्लाय
https://www.tcs.com/careers/tcs-off-campus-hiring या TCS करिअरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
यानंतर CS नेक्स्ट स्टेप पोर्टलच्या लिंकवर पुढे क्लिक करा
सर्व आवश्यक तपशील सबमिट करून नोंदणी करा आणि TCS ऑफ कॅम्पस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.
तुमचा रीतसर भरलेला अर्ज सबमिट करा आणि “Apply For Drive” वर क्लिक करा
"Track Your Application" वर क्लिक करून तुमच्या अर्जाचं स्टेट्स तपासा.
या पदभरतीबाबत कोणत्याही सहाय्यासाठी किंवा प्रश्नासाठी, TCS हेल्पडेस्क टीमशी त्याच्या ilp.support@tcs.com या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतो: किंवा हेल्पलाइन क्रमांक 18002093111 यावर संपर्क साधा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, जॉब