मुंबई, 24 नोव्हेंबर: Google नेहमीच जगभरातील युवांसाठी नवनवीन सटिफिकेशन कोर्सेस (Google Career Certificate program) लाँच करत असते. जगभरातील उमेदवारांना करिअरच्या संधी (career opportunity in google) उपलब्ध व्हाव्यात म्हणून हे सर्टिफिकेशन कोर्सेस (Google Certificate program 2021) लाँच केले जातात. अशाच पद्धतीनं आता Google नं नोकरी (Google Certification program For Job Seekers) तसंच व्यवसाय (Google Certification program) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी गुगल करिअर सर्टिफिकेट हा एक नवीन प्रोग्राम लाँच केला आहे. विशेष म्हणजे Coursera या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मसह Google नं हा प्रोग्राम लाँच केला आहे. या सर्टिफिकेशनचा लाभ सर्वाना कशाप्रकारे घेता येणार आहे याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. यासंबंधीचं वृत्त ‘टीव्ही9’ हिंदी नं दिलं आहे. Google career certification कार्यक्रमाची घोषणा Google for India 2021 इव्हेंटच्या 7 व्या आवृत्तीदरम्यान करण्यात आली. या संदर्भात गुगल इंडियाच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विटही करण्यात आलं आहे.
We are building a hiring consortium with partner employers who are keen to hire from the Google Career Certificates graduates talent pool.
— Google India (@GoogleIndia) November 18, 2021
Tune in to hear Sanjay Gupta talk about this program at #GoogleForIndia.
➡️ https://t.co/hvMJWHKdE6. pic.twitter.com/hdXIUM3Fpk
या प्रोग्रामचे फायदे Google Careers सर्टिफिकेशनसह हा प्रोग्राम नवीन पदवीधरांना ऑटोमेशन, प्रकल्प व्यवस्थापन, डेटा विश्लेषक आणि UX डिझाइनमधील नवीन कौशल्यं शिकण्यास मदत करेल. यामुळे डिजिटल कौशल्याच्या बाजारपेठेत नवी तेजी येईल आणि भारतीय तरुणांनाही नवीन स्किल्स शिकण्याची संधी मिळेल. तुम्हालाही जेवण बनवण्याची प्रचंड आवड असेल Chef म्हणून घडवा करिअर; वाचा सविस्तर अनेकांनी दिलं पॉझिटिव्ह रेटिंग Google च्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत हा कोर्स अनेकांनी केला आहे. त्यापैकी तब्बल 82 टक्के लोकांना या सर्टिफिकेशन प्रोग्रॅमला पॉझिटिव्ह रेटींग दिल आहे. हा प्रोग्राम पूर्ण केल्यानंतर अनेकांना नवीन जॉब मिळाला आहे, तर कोणी आपला नवीन व्यवसाय सुरु केला आहे. या Certificate Program ला आताच्या आधुनिक युगाच्या गरजेनुसार बनवण्यात आलं आहे. काही सर्टिफिकेशन कोर्सेस Google नं नुकतेच तीन सर्टिफिकेशन प्रोग्रॅम लाँच केले आहेत. डेटा एनालिटिक्स (Data Analytics), प्रोजेक्ट मॅनेजमेंट (Project Management), यूएक्स डिजाइन (UX Design) आणि एसोसिएट एन्ड्रॉयड डेव्हलपर सर्टिफिकेशन (Associate Android Developer Certification) हे कोर्सेस यात आहेत.