मुंबई, 30 नोव्हेंबर: कोणत्याही जॉबची मुलाखत देताना काही प्रश्न खूप कॉमन असतात. जसं की स्वतःबद्दल काही सांगा किंवा तुम्हाला ही नोकरी का हवी आहे? यामध्ये अजून एक प्रश्न असा असतो जो प्रश्न जवळपास सर्व मुलाखतींमध्ये विचारला जातो, तो म्हणजे “हा जॉब करताना तुम्हाला किती पगार हवा आहे?” हा प्रश्न जरी कॉमन आणि साधा वाटत असेल तरी या प्रश्नाच्या उत्तरावर तुमचा पगार अवलंबून असतो. म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर अगदी तोलून मोजून-मापून आणि अंदाज घेऊन देणं आवश्यक आहे. बरेचजण इथे घाबरतात आणि नाही ते बोलून जातात. पण आता चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला Salary Expectations च्या प्रश्नाचं उत्तर न घाबरता आणि स्मार्ट पद्धतीनं कसं देणार याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घ्या. क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स बरेचदा या प्रश्नाचं उत्तर देताना अनेकजण आपल्या पोस्टपेक्षा अधिक पगाराची मागणी करतात, यामुळे त्यांच्यातील जॉबबद्दलची आवड कमी आहे असं दिसतं. तर काही जण घाबरून पोस्टला मिळणाऱ्या पगारापेक्षा कमी सॅलरी सांगतात त्यामुळे त्यांना कमी पगारात जब करावा लागतो. म्हणूनच या प्रश्नाचं चोख उत्तर कसं द्यावं याबद्दलच्या टिप्स जाणून घेऊ. कंपनीचा उद्योग आणि कंपनीचं प्रोडक्शन इथपर्यंत सर्व आवश्यक माहितीसह स्वतःला तयार करा. आवश्यक माहितीबाबत रिसर्च करणं आवश्यक आहे कारण ते तुम्हाला चांगल्या निगोसिएशन करण्यात मदत करेल. जर तुम्हाला कंपनीबद्दल माहिती असेल आणि स्वतच्या प्रोफाईलबद्दल माहिती असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं पगाराबद्दल बोलू शकाल. DRDO Recruitment: 10वी असो वा ग्रॅज्युएट्स सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी सोडू नका; अर्जाला अवघे काही दिवस यासाठी HR ला आधीच कळवा की तुम्ही योग्य करिअरची दिशा शोधत आहात जी तुम्हाला कंपनीला सेवा देण्यासाठी योग्य ठरेल. पगार किंवा मोबदला यापेक्षा अधिक योग्य नोकरी असणं जास्त आवश्यक आहे. मात्र हे सांगताना पगाराबाबाबत विसरू नका. त्यांना खात्री द्या की तुमच्या गरजा अचूक आहेत आणि तुम्ही पगारासोबतच कंपनीत चांगल्या पद्धतीनं कामही कराल. सुरुवातीला उत्तर देण्यास टाळा जर तुम्ही मुलाखतीच्या या भागात या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नसाल तर, तुम्ही हा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला नोकरी आणि जॉब प्रोफाइलबद्दल अधिक जाणून घ्यायचं ते असं सांगून मुलाखत घेणाऱ्यांना काही काळ थांबवू शकता आणि पगाराबतच्या प्रश्नावर विचार करू शकता. सर्वात मोठी बातमी! राज्याच्या पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज असं द्या परफेक्ट उत्तर जर तुमच्यात संपूर्णपणे आत्मविश्वास असेल आणि तुम्ही नोकरीसाठी तयार असाल तर मुलाखत घेणाऱ्यांना तुम्हाला जितका पगार हवाय त्याची एक रक्कम सांगा. या पुढे काहीही बोलू नका. तुम्ही सांगितलेली रक्कम ही पूर्णपणे रिसर्च केल्यानंतरच सांगा.अवाजवी रक्कम सांगू नका. तुम्ही सांगितलेली रक्कम बरोबर असेल तर यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास मुलाखत घेणाऱ्यांना दिसेल आणि तुम्हाला हव्या त्या पगारात नोकरी मिळू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.