मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Interview Tips: मुलाखत संपताना 'या' गोष्टी करण्यास कधीच विसरू नका; तुमची नोकरी पक्की म्हणून समजा

Interview Tips: मुलाखत संपताना 'या' गोष्टी करण्यास कधीच विसरू नका; तुमची नोकरी पक्की म्हणून समजा

आयएएस अधिकारी होण्यासाठी 
मुलाखत

आयएएस अधिकारी होण्यासाठी मुलाखत

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही जॉब मुलाखत संपताना (How to leave Interview place) करणं आवश्यक आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 10 फेब्रुवारी: आतापर्यंत तुम्ही मुलाखतीच्या टिप्स (Interview Tips) सांगणाऱ्या अनेक बातम्या वाचल्या असतील आणि काही बातम्यांमुळे तुम्हाला मदतही झली असेल. मुलाखतीवेळी कसं बसावं (How to sit during Interview), कसं बोलावं (How to behave in Interview), कसं वागावं, इतकंच नाही तर कसे कपडे घालावे याबद्दल अनेकदा तुम्ही माहिती वाचली असेल. यामुळे बरीच जणांना फायदाही झाला आहे. मात्र मुलाखत सुरु होण्यापासून ते संपतपर्यंत संपूर्ण मुलाखत (Interview Tips in Marathi) महत्त्वाची असते. मुलाखत सुरु होण्यावेळी जितका आत्मविश्वास (How to be confident in Interview) तुमच्यात असतो तितका आत्मविश्वास मुलाखत संपतपर्यंत (actions to take after job Interview) टिकवणं आवश्यक आहे. मात्र अनेकजण असं करत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही जॉब मुलाखत संपताना (How to leave Interview place) करणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया.

प्रश्न विचारण्यास विसरू नका (Ask questions)

मुलखात घेणारे बरेच तुम्हालाही प्रश्न विचारण्याची संधी देतात. ही तुम्हाला चमकण्याची ही एक प्रमुख संधी आहे असं समजून प्रश्न विचारा. .इंटरव्ह्यूचे चांगले प्रश्न विचारून पूर्ण फायदा घ्या ज्यामुळे तुम्हाला ऑनलाइन न सापडणारी माहिती मिळेल. जसे की इथे जॉब करताना तुमचा अनुभव कसा आहे? इथे जॉब करताना पुढील शिक्षणासाठी संधी मिळेल का? अशाप्रकारचे प्रश्न तूंहीही विचारु शकता.

वर्क फ्रॉम होम दरम्यान तुमच्या डेस्कवर ठेवा 'या' वस्तू; कामात येणार नाही अडथळा

पोस्टबद्दल उत्सुकता दाखवा (Be confident about Posts)

तुम्ही दाराबाहेर जाण्यापूर्वी, तुम्हाला जी पोस्ट का हवी आहे हे पुन्हा सांगण्यासाठी एक मिनिट काढा, मुलाखत संपल्यानंतर बाहेर जाण्यापूर्वी मुलाखत घेणाऱ्यांना पुन्हा पटवून देणायचा प्रयत्न करा के तुम्ही या पोस्टसाठी का पात्र आहात. पण यासाठी जास्तीत जास्त तीस सेकंद घ्या. तुमच्या बोलण्यातून त्या पोस्टबद्दल आत्मविश्वास दिसणं महत्त्वाचं आहे.

पुढील स्टेप्सबद्दल नक्की विचारा (Ask about Next Stage)

बरेचदा नव्वद टक्के उमेदवार हे विचारण्यास विसरतात कि मुलाखतीनंतर निवड प्रक्रियेतील पुढील स्टेप काय असणार आहे? यामुळे अनेकांची नोकरी हातची जाऊ शकते. त्यामुळे मुलाखतीनंतरच्या स्टेप्स जाणून घ्यायला संकोच करू नका. जर मुलाखत हीच शेवटची स्टेप असेल तर अशा वेळी मुलाखत घेणाऱ्यांना निवड झाल्यानंतरच्या प्रोसेसबद्दल विचारा.

Career Tips: महिलांनो, वायुसेनेत फ्लायिंग ऑफिसर व्हायचंय? जाणून घ्या माहिती

Thank You ई-मेल पाठवा (how to send Thank You Emails)

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चारपैकी तीन नोकरी शोधणारे मुलाखतीनंतर थँक्स नोट पाठवण्याची तसदी घेत नाहीत. स्वतःला वेगळे ठेवण्यासाठी, प्रत्येक कर्मचाऱ्याला धन्यवाद-इमेल लिहिण्यासाठी वेळ काढा. गाडी तुम्ही भेटलेल्या रिसेप्शनिस्टपासून तर मुलाखत घेणाऱ्या प्रत्येकाला Thank You ई-मेल पाठवा. यामुळे तुमचं चांगला इम्प्रेशन तयार होईल आणि तुम्हाला नोकरी मिळण्याची संधी वाढेल.

First published:

Tags: Career, Career opportunities, Tips, जॉब