जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: महिलांनो, भारतीय वायुसेनेत फ्लायिंग ऑफिसर व्हायचंय? इथे जाणून घ्या संपूर्ण माहिती

Career Tips: महिलांनो, भारतीय वायुसेनेत फ्लायिंग ऑफिसर व्हायचंय? इथे जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतीय वायुसेनेत नोकरी (Jobs in IAF) करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते

भारतीय वायुसेनेत नोकरी (Jobs in IAF) करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते

आज आम्ही तुम्हाला फ्लायिंग ऑफिसर (Flying Officer Career in IAF) होण्यासाठी काय पात्रता असणं आवश्यक आहे आणि यात करिअर कसं करणार याबद्दल सांगणार आहोत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 फेब्रुवारी: जगातील सर्वात सक्षम वायुदलांपैकी एक वायुसेना म्हणजेच भारतीय वायुसेना**.(Indian Air Force)** देशसेवा करायची असल्यास आणि शिक्षण उत्तम झालं असेल तर भारतीय वायुसेनेत नोकरी (Jobs in IAF) करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. भारतीय वायुसेनेत फ्लायिंग ऑफिसर (How to become Officer in IAF) ही मोठी पोस्ट असते. यासाठी देशभरातून हजारो उमेदवार अर्ज करतात. मात्र आता पुरूषांसोबतच महिलाही सक्षम होऊ लागल्या आहेत. त्यामुळे भारतीय वायुसेनेत महिलांनाही फ्लायिंग ऑफिसर (How to become Flying Officer in IAF) म्हणून करिअर करण्याची संधी मिळू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फ्लायिंग ऑफिसर (Flying Officer Career in IAF) होण्यासाठी काय पात्रता असणं आवश्यक आहे आणि यात करिअर कसं करणार याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. ही पात्रता असणं आवश्यक (Eligibility to become Flying Officer in IAF) UPSC द्वारे वर्षातून दोनदा घेतल्या जाणाऱ्या NDA परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मात्र भारतीय हवाई दलात प्रवेशासाठी, महिला उमेदवारांनी 10+2 परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर 2021 च्या परीक्षेत बसण्यासाठी उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2003 पूर्वी झालेला नसावा आणि 1 जानेवारी 2006 नंतर झालेला नसावा. ऑफिस, घर किंवा कुठूनही करू शकता काम; ‘या’ कंपनीनं कर्मचाऱ्यांना Gift अशी असते निवड प्रक्रिया आणि प्रशिक्षण (Selection Procedure for Flying Officer in IAF) NDA परीक्षेतील कामगिरीच्या आधारे यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांना संरक्षण मंत्रालयाच्या सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) द्वारे घेण्यात येणाऱ्या मुलाखत फेरी आणि वैद्यकीय तपासणी टप्प्यांसाठी बोलावले जाते. SSB टप्प्यांमधील त्यांच्या कामगिरीच्या आधारे, यशस्वी महिला उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि त्यांच्या भारतीय हवाई दलाच्या निवडीनुसार तीन वर्षांचे शैक्षणिक आणि शारीरिक प्रशिक्षण (Training for Flying Officer) दिले जाते. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या वायुसेना कॅडेट्सना उमेदवारांना दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून B.Tech पदवी/B.Sc/B.Sc पदवी प्रदान केली जाते. क्या बात है! देशभरात तब्बल 100 नवीन सैनिक शाळा सुरु होणार; असा मिळेल प्रवेश त्यानंतर, फ्लाइंग किंवा नॉन-टेक्निकल ग्राउंड ड्यूटी शाखेसाठी कॅडेट्स एअर फोर्स अकादमी, हैदराबाद येथे पाठवले जातात आणि एअर फोर्स कॅडेट ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक शाखा) एअर फोर्स टेक्निकल कॉलेज, बंगलोर येथे पाठवले जातात. हवाई दलाच्या कॅडेट्सना संबंधित अकादमीमध्ये दीड वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, कॅडेट्सना भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून कायमस्वरूपी कमिशन (नियुक्ती) दिली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: career , tips
  • First Published :
जाहिरात
जाहिरात