मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /भय इथले संपत नाही! याठिकाणी आहे Twindemic ची स्थिती, कोरोनासह या पँडेमिकशी द्यावा लागतोय लढा

भय इथले संपत नाही! याठिकाणी आहे Twindemic ची स्थिती, कोरोनासह या पँडेमिकशी द्यावा लागतोय लढा

युरोपमध्ये फ्लू आणि कोरोना अशा दोन महामारी एकाचवेळी वाढत असल्यानं ट्विंडेमिक'ची स्थिती निर्माण झाली आहे. युरोपमध्ये गेल्या वर्षी फ्लूचे रुग्ण अंदाजापेक्षा जास्त आढळून आले होते.

युरोपमध्ये फ्लू आणि कोरोना अशा दोन महामारी एकाचवेळी वाढत असल्यानं ट्विंडेमिक'ची स्थिती निर्माण झाली आहे. युरोपमध्ये गेल्या वर्षी फ्लूचे रुग्ण अंदाजापेक्षा जास्त आढळून आले होते.

युरोपमध्ये फ्लू आणि कोरोना अशा दोन महामारी एकाचवेळी वाढत असल्यानं ट्विंडेमिक'ची स्थिती निर्माण झाली आहे. युरोपमध्ये गेल्या वर्षी फ्लूचे रुग्ण अंदाजापेक्षा जास्त आढळून आले होते.

    गेल्या दोन वर्षांपासून जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाचा (Coronavirus Pandemic) संसर्ग झपाट्यानं वाढताना दिसत आहे. कोरोनाचा विषाणू सातत्यानं म्युटेट (Mutate) होत असून, आतापर्यंत अल्फा, बीटा, डेल्टा आणि ओमिक्रॉन (Omicron) हे कोरोना व्हेरिएंट्स (Coronavirus New Variant) आढळून आले आहेत. कोरोनामुळे जगभरातल्या लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे युरोपात (Coronavirus Europe) स्थिती गंभीर झाल्याचं दिसून येत आहे. युरोपमध्ये ओमिक्रॉन व्हॅरिएंटने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. त्यातच फ्लूच्या (Flu) रुग्णांचं प्रमाणही वाढत आहे. फ्लू आणि कोरोनाव्हायरस महामारी एकाचवेळी वाढत असल्यानं यास ट्विंडेमिक (Twindemic) असं नाव देण्यात आलं आहे. युरोपसह अनेक देशांमध्ये फ्लू आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त होतोय.

    फ्लू आणि कोरोना अशा दोन महामारी एकाचवेळी वाढत असल्यानं ट्विंडेमिक'ची स्थिती निर्माण झाली आहे. युरोपमध्ये गेल्या वर्षी फ्लूचे रुग्ण अंदाजापेक्षा जास्त आढळून आले होते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, दर वर्षी फ्लूमुळे 6,65,000 मृत्यू होतात. कोरोनाच्या साथीदरम्यान फ्लू वाढल्यास आरोग्य यंत्रणेवरचा ताण अजून वाढू शकतो.

    हे वाचा-काय सांगता, 'या' देशात पुढच्या आठवड्यापासून मास्क घालण्याची गरज नाही..!

    'डीएनए'च्या वृत्तानुसार, डेल्टाच्या (Delta) संसर्गाचं प्रमाण कमी होताच, जगभरातल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगसारख्या (Social Distancing) नियमांकडे दुर्लक्ष केलं. सोशल डिस्टन्सिंगच्या पालनाकडे आणि मास्क वापराकडे दुर्लक्ष केल्यानं ट्विंडेमिकची एंट्री झाली. 2020 मध्ये नागरिकांना एन्फ्लुएंझाची लागण झाल्यानंतर त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली. त्यामुळे विषाणू संसर्ग होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली. रुग्णसंख्या वाढण्यामागे कमजोर इम्युनिटी (Immunity) हेदेखील कारण आहे.

    फ्लू आणि कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अद्याप कायम आहे. कोणत्याही व्यक्तीला कोरोना आणि फ्लू एकाच वेळी होऊ शकतो, हे सिद्ध झालं आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलमधल्या गर्भवती महिलेला फ्लोरोना झाला होता. यात फ्लू आणि कोरोना अशा दोन्ही विषाणूंचा संसर्ग या महिलेला झाल्याचं सिद्ध झालं होतं.

    फ्लू आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये बरंचसं साम्य आहे. सर्वसामान्यपणे फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी लक्षणं दिसू लागतात. 'सीडीसी' या अमेरिकी आरोग्य संस्थेच्या मते, ताप, खोकला, घशात त्रास होणं, नाक वाहणं, डोकेदुखी, स्नायूदुखी, थकवा आणि डायरिया ही फ्लूची लक्षणं आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणं दिसण्यास 2 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो. श्वास घेण्यास त्रास होणं, अंग थरथरणं, चव जाणं, वास न येणं, डोकेदुखी, थकवा, डायरिया, स्नायुदुखी ही सर्व कोरोनाची लक्षणं असून, ती दिसताच तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

    हे वाचा-या आजोबांवर कोरोनाचे 11 डोस घेतल्यामुळे FIR आहे दाखल,आता त्यांना हवाय बुस्टर डोस

    ट्विंडेमिकमुळे डॉक्टरांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण फ्लू आणि कोरोनाची लक्षणं जवळपास सारखीच आहेत. केवळ तपासणीच्या माध्यमातूनच फ्लू आणि कोरोनाचे रुग्ण ओळखणं शक्य आहे. परंतु, यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढणार आहे. या दोन्ही आजारांपासून बचाव करण्यासाठी वारंवार साबणानं हात धुणं, मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं या तीन गोष्टी आवश्यक आहेत, असं 'सीडीसी'नं स्पष्ट केलं आहे. फ्लू आणि कोरोनाचा वाढता धोका आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण बघता रुग्णसंख्या वाढू नये यासाठी पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे.

    First published:

    Tags: Corona updates, Coronavirus