• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • IT क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या; मोठं पॅकेज, बोनस आणि 120 टक्के पगारवाढ!

IT क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या; मोठं पॅकेज, बोनस आणि 120 टक्के पगारवाढ!

 केवळ नोकऱ्यांची संख्या वाढली आहे असं नाही. कित्येक कंपन्या मागील वर्षीच्या तुलनेत नवीन जॉईन होणाऱ्यांना अधिक चांगले पॅकेज (IT companies offering better package) ऑफर करत आहेत.

केवळ नोकऱ्यांची संख्या वाढली आहे असं नाही. कित्येक कंपन्या मागील वर्षीच्या तुलनेत नवीन जॉईन होणाऱ्यांना अधिक चांगले पॅकेज (IT companies offering better package) ऑफर करत आहेत.

केवळ नोकऱ्यांची संख्या वाढली आहे असं नाही. कित्येक कंपन्या मागील वर्षीच्या तुलनेत नवीन जॉईन होणाऱ्यांना अधिक चांगले पॅकेज (IT companies offering better package) ऑफर करत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 18 सप्टेंबर : 2020च्या सुरुवातीलाच आलेल्या कोरोना महामारीने जगभरात कित्येक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवलं. पण आता सुमारे दीड वर्षांनंतर, आणि महामारीच्या दोन लाटांनंतर यांपैकी कित्येक क्षेत्रं सावरू लागली आहेत. यातील सर्वात वेगानं पूर्वपदावर येत असलेलं क्षेत्र म्हणजे, भारतातील आयटी (IT Sector hiring) सेक्टर. तिसऱ्या लाटेची शक्यता असूनही, देशातील आयटी सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात भरती (IT sector hiring aggrecively) सुरू झाली आहे. अगदी ‘लिंक्ड इन’ सारख्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तरी कित्येक आयटी कंपन्यांमध्ये व्हेकन्सी (IT Company vacancy) असल्याचं दिसून येईल. इनडीप रिपोर्टने (Indeep report) कोरोना महामारीचा देशातील नोकऱ्यांवर कसा परिणाम झाला याचा सखोल अभ्यास केला होता. यातून मिळालेल्या माहितीनुसार, आयटीमध्ये काम करणाऱ्यांची मागणी 400 पटींनी (IT sector demand increased) वाढली आहे. दीड वर्षांपूर्वी या महामारीच्या एकदम सुरूवातीला, कित्येक कंपन्या या परिस्थितीचा आढावा घेत होत्या. त्यामुळे कित्येकांनी भरती थांबवली होती, तर अनेकांनी आहे त्या कामगारांमध्ये कपात सुरू केली होती. मात्र आता, मोठ्या प्रमाणात भरती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य असलेल्यांची मागणी सध्या वाढली आहे. आयटी क्षेत्रामध्ये (IT sector vacancies) ॲप डेव्हलपर, लीड कन्सल्टंट, सेलफोर्स डेव्हलपर आणि साईट रिलायबिलिटी इंजिनियर या पदांसाठी 150 ते 300 टक्के मागणी वाढली आहे. अंगात भूत संचारलंय म्हणत पुजाऱ्याने केली महिलेला मंदिरात अमानुष मारहाण, VIDEO विशेष म्हणजे, केवळ नोकऱ्यांची संख्या वाढली आहे असं नाही. कित्येक कंपन्या मागील वर्षीच्या तुलनेत नवीन जॉईन होणाऱ्यांना अधिक चांगले पॅकेज (IT companies offering better package) ऑफर करत आहेत. तसंच, आधीपासून काम करत असणाऱ्यांना कित्येक कंपन्या (IT companies giving 120% hike) 70 ते 120 टक्के पगारवाढ देत आहेत. गेल्या वर्षापर्यंत या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ 20 ते 30 टक्के पगारवाढ देत होत्या. त्यामुळे आताचे पगारवाढीचे प्रमाण हे अगदीच जास्त असल्याचं या रिपोर्टमध्ये दिसून आलं. आईने आणलेली वेताची छडी तोडून फेकली; Amazon वर जाहिरात पाहून मुलांना सुटला घाम टाटा कन्सल्टंसी सर्विस (TCS) या मोठ्या आयटी कंपनीने नुकतंच जाहीर केलं होतं, की ते महिला कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी भरती करणार आहेत. खास करुन करिअर गॅपनंतर पुन्हा नोकरी शोधत असलेल्या महिलांसाठी ही सुवर्णसंधी होती. टीसीएस सोबतच इन्फोसिस (Infosys), विप्रो (Wipro) आणि इतर मोठ्या आयटी कंपन्याही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात भरती करत आहेत. अधिक जागा, चांगलं पॅकेज आणि चांगलं इन्क्रिमेंट, या सगळ्या गोष्टींमुळे आयटी क्षेत्रातील तरुणांसाठी नोकरी मिळवण्याची ही सगळ्यात चांगली संधी आहे.
  First published: