मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

क्या बात है! आता घरबसल्या शिका SPACE बद्दल सर्वकाही; ISRO नं आणला फ्री सर्टिफिकेशन कोर्स; असं करा अप्लाय

क्या बात है! आता घरबसल्या शिका SPACE बद्दल सर्वकाही; ISRO नं आणला फ्री सर्टिफिकेशन कोर्स; असं करा अप्लाय

ISRO ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स

ISRO ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स

ISRO नं विद्यार्थ्यांसाठी आणि उमेदवारांसाठी Free Certification Course (Free Online certification course in ISRO) लाँच केला आहे. चला तर मग जाणून घेऊया या कोर्सबद्दल.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 05 डिसेंबर: अनेक मुलांना अवकाश आणि वैज्ञानिक संशोधनात खूप रस असतो. पण कधी माहितीच्या कमतरतेमुळे, कधी संसाधनामुळे किंवा आर्थिक समस्येमुळे त्यांना त्यांच्या आवडी आणि करिअरशी (Career in ISRO) तडजोड करावी लागते. तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (Indian space research Organisation) ISRO नं विद्यार्थ्यांसाठी आणि उमेदवारांसाठी Free Certification Course (Free Online certification course in ISRO) लाँच केला आहे. चला तर मग जाणून घेऊया या कोर्सबद्दल. ISRO ने यावर्षी 3 नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत, जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS), डेहराडून द्वारे आयोजित केले जात आहेत. 2022 मध्ये हा कोर्स करण्यासाठी तुम्ही IIRS च्या अधिकृत वेबसाइट https://www.iirs.gov.in/ वर जाऊन नोंदणी (Registration for ISRO online certification course) करू शकता. मात्र, सध्या ऑनलाइन अर्जाची विंडो बंद आहे. इस्रोचा हा कोर्स करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. तिन्ही अभ्यासक्रम पूर्णपणे विनामूल्य आहेत आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र (ISRO course certificate) देखील दिले जाईल. आयआयआरएस डेहराडूनच्या अधिकृत वेबसाइटनुसार, IIRS यूट्यूब चॅनेलद्वारे सत्राला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 24 तासांनंतर उपलब्ध असलेल्या ऑफलाइन सत्रात त्यांची उपस्थिती नोंदवणे आवश्यक आहे. ISRO च्या मते, या ऑनलाइन शिक्षण अभ्यासक्रमातील प्रत्येक अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीत विभागलेला आहे, जो 4 ते 12 दिवसांचा असतो. त्यामुळे तुम्हालाही हा कोर्समध्ये शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी आहे. 2022मध्ये 'या' 4 राशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये होणार लाभ; मिळेल भरघोस पैसा या कोर्सेससाठी करा अप्लाय मशीन लर्निंग टू डीप लर्निंग: रिमोट सेन्सिंग डेटा classification ISRO च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा अभ्यासक्रम खासकरून विविध ऍप्लिकेशन्समध्ये रिमोट सेन्सिंग डेटा प्रोसेसिंगमध्ये काम करणाऱ्या तज्ञांसाठी तयार करण्यात आला आहे. अर्थ ऑब्जर्वेशन फॉर कार्बन सायकल स्टडी हा अभ्यासक्रम पृथ्वी निरीक्षण, कार्बन मॉडेलिंग, कार्बन असेसमेंटमध्ये सहभागी असलेल्या संशोधक, तज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. ओव्हर व्ह्यू ऑफ GIS टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाला जीआयएस म्हणतात (Geographic Information System). संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने उमेदवारांना भौगोलिक माहिती एकत्रित करण्यासाठी, त्यांच्यासाठी डेटा गोळा करणे, व्यवस्थापित करणे, विश्लेषण करणे, जतन करणे आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणे यासाठी हे डिझाइन केले आहे. Work From Home की Work From Office? कर्मचाऱ्यांसाठी काय आहे फायदेशीर; वाचा अशा पद्धतीनं करा अप्लाय (How to apply for ISRO Online certification course) तुम्हाला पुढील सत्रात ISRO चे मोफत ऑनलाइन कोर्स करायचे असल्यास, तुम्हाला इसरो किंवा IIRS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी, विद्यार्थ्याला पूर्ण नाव, इयत्ता 10वीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र, ईमेल आणि पासवर्ड, ज्या कोर्समध्ये त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा गोष्टी प्रविष्ट कराव्या लागतील. यासोबत वैयक्तिक तपशील, शैक्षणिक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला ई-क्लास पोर्टलद्वारे 70% सत्रांमध्ये उपस्थित राहावे लागते.
First published:

Tags: Career opportunities, Isro, Online education

पुढील बातम्या