मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IOCL Recruitment: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये तब्बल 71 जागांसाठी होणार भरती; आताच करा अप्लाय

IOCL Recruitment: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये तब्बल 71 जागांसाठी होणार भरती; आताच करा अप्लाय

या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 02 ऑक्टोबर:  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Indian Oil Corporation Limited Recruitment 2021) तब्बल 71 जागांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IOCL Recruitment 2021) नुकतीच जारी करण्यात आली आहे.  सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी (Assistant Quality Control Officers) -  एकूण जागा 71

IOCL Recruitment 2021

IOCL Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता  

सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी (Assistant Quality Control Officers) -  उमेदवारांनी रसायनशास्त्र/समकक्ष विषयांमधून पदव्युत्तर पदवी घेतली

असणं आवश्यक. तसंच M.Sc. in Chemistry  असणं आवश्यक. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी पदवी शिक्षणादरम्यान किमान 60  टक्के गुण घेतले असणं आवश्यक. मागास प्रवर्गातील उमेदवारांनी पदवी शिक्षणादरम्यान किमान 55 टक्के गुण घेतले असणं आवश्यक .

हे वाचा - क्या बात है! IT कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते आठवड्यातून 3 दिवस सुटी

अनुभव

या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कमीतकमी 02 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. पेट्रोलियममधील Testing/R&D/Quality Control या संबंधीचा अनुभव असणंही आवश्यक आहे. तसंच NABL शी निगडित कोणत्याही लॅबचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

अशी होणार निवड

या पदभरतीसाठी लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन, ग्रुप टास्क आणि त्यानंतर मुलाखत अशा पद्धतीनं उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. तसंच लेखी परिक्षेनंतर पुढील गोष्टींसाठी पात्र ठरण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 100 पैकी 40 मार्क्स घेणं आवश्यक आहे. तसंच मागास वर्गातील विद्यार्थ्यांना 100 पैकी 35 मार्क्स घेणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी (Assistant Quality Control Officers) - 40,000/- ते  1,40,000/- रुपये प्रतिमहिना

अशा पद्धतीनं करा अप्लाय

सुरुवातीला www.iocl.com या इंडियन ऑईलचा ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्या.

यानंतर ‘What’s New’ वर क्लिक करा.

यानंतर “Recruitment of

Assistant Quality Control Officers - 2021” या लिंकवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला जाहिरात दिसेल या जाहिरातीवर क्लिक करा.

“Click here to Apply Online” वर क्लिक करा आणि आपली संपूर्ण माहिती आणि तपशील भरा.

हे वाचा - Baramati Agro Recruitment: बारामती कृषी लिमिटेड जळगाव इथे मोठी पदभरती

JOB TITLEIOCL Recruitment 2021
या पदांसाठी भरतीसहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी (Assistant Quality Control Officers) -  एकूण जागा 71
शैक्षणिक पात्रता  उमेदवारांनी रसायनशास्त्र/समकक्ष विषयांमधून पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक.
अनुभवकमीतकमी 02 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवडलेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन, ग्रुप टास्क आणि त्यानंतर मुलाखत
इतका मिळणार पगार40,000/- ते  1,40,000/- रुपये प्रतिमहिना

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ioclrhq.onlinereg.in/krisreg0821/home.aspx  या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Mumbai, जॉब