मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मोठी बातमी! Google नं Work From Home बाबत घेतला मोठा निर्णय; अनिश्चित काळासाठी WFO केलं Postponed

मोठी बातमी! Google नं Work From Home बाबत घेतला मोठा निर्णय; अनिश्चित काळासाठी WFO केलं Postponed

नामांकित कंपनी Google नंही अशाप्रकारचा मोठा निर्णय घेतला आहे

नामांकित कंपनी Google नंही अशाप्रकारचा मोठा निर्णय घेतला आहे

काही मोठ्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम ऑफिसच्या (Google Postponed WFO decision) आपल्या निर्णयाला पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 05 डिसेंबर: गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव सुरु आहे. या महामारीनं अनेकांचा जीव घेतला आहे. कोरोनातील लॉकडाऊनमुळे अनेकांना आपले जॉबही गमवावे लागले आहेत. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) दिलं आहे. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याची चिन्हं दिसत होती. देशासह जगभरातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. पण आता Omicron नावाच्या नव्या कोरोना व्हेरिएन्टनं (What is Omicron variant of Corona?) संपूर्ण जागर परत तांडव करण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस परत कोरोना रग्णांमधे वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे काही मोठ्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम ऑफिसच्या (Google Postponed WFO decision) आपल्या निर्णयाला पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नामांकित कंपनी Google नंही अशाप्रकारचा मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे Google नं निरनिराळ्या ऑफर्स (How to get job in Google) देऊन आपल्या कर्मचाऱ्यांना परत ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला होता. या वर्षीचे अखेरपर्यंत कर्मचारी ऑफिसमध्ये जाऊन काम सुरु करणार होते. मात्र आता Google नं आपला हा निर्णय बदलला आहे. Google नं अनिश्चित काळासाठी कर्मचाऱ्यांना पुन्हा वर्क फ्रॉम होम (Google gave WFH to employees) दिलं आहे. आपला वर्क फ्रॉम ऑफिसचा निर्णय पुढे ढकलला (Google Postponed WFO) आहे. यासंबंधीचं वृत्त Trak.in या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. काय सांगता! 'या' IT कंपनीचे CEO दररोज 5 कर्मचाऱ्यांसोबत घालवतात वेळ; वाचा कारण आयटी कंपन्यांनी त्यांची कार्यालये सुरू केल्यामुळे आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना कार्यालयात परत बोलावण्यास सुरुवात केली असल्याने, गुगलची ही अचानक घोषणा आश्चर्यकारक आहे. यापूर्वी गुगलने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना १० जानेवारीपर्यंत कार्यालयात परत येण्यास सांगितले होते. ही हालचाल अचानक रद्द करण्यात आली आहे, कारण Google ने आता सर्व 1.5 लाख कर्मचार्‍यांसाठी अनिश्चित काळासाठी घरून काम करण्याची घोषणा केली आहे. Google च्या मूळ कंपनी अल्फाबेटने या नवीन विकासाची माहिती सर्व कर्मचार्‍यांना दिली, ज्याची माहिती प्रथम इनसाइडरने दिली होती.याचा अर्थ असा की Google ने आपली भूमिका बदलल्याशिवाय सर्व Google कर्मचारी आता अनिश्चित काळासाठी घरून काम करत राहतील. यामागचं कारण आहे तरी काय अल्फाबेटने सर्व कर्मचार्‍यांना त्यांच्या नोटमध्ये माहिती दिली आहे की कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत बोलावण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये उद्भवलेल्या ओमिक्रॉन, नवीन शोधलेल्या कोरोनाव्हायरस प्रकाराने संपूर्ण जगाला सतर्क आणि अतिरिक्त सावध राहण्यास भाग पाडले आहे कारण या प्रकाराचा संसर्ग दर वेगवान आहे आणि मोठ्या लोकसंख्येवर परिणाम करू शकतो किंवा तीसरी लाट ट्रिगर करू शकतो. असं जरी असेल तरी भारतात ओमिक्रोनचे रुग्ण हळूहळू वाढत आहेत. सध्या भारतातील IT कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम ऑफिस करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता वाढत्या ओमिक्रोनच्या संख्येवर भारतातील IT कंपन्या वर्क फ्रॉम होमबाबत काय नॉर्न्य घेतील याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
First published:

Tags: Career opportunities, Google, Work from home

पुढील बातम्या