जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / आता तुमची बँकेत नोकरी पक्की; ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 'या' बँकेत बंपर ओपनिंग्स; असा करा अर्ज

आता तुमची बँकेत नोकरी पक्की; ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 'या' बँकेत बंपर ओपनिंग्स; असा करा अर्ज

इंडियन बँकेत जॉबची ही घ्या डायरेक्ट लिंक

इंडियन बँकेत जॉबची ही घ्या डायरेक्ट लिंक

बँकिंगच्या परीक्षाही अनेक जण देत असतात. या परीक्षेच्या अनुषंगानं खासगी क्लास लावणं, स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचं वाचन करणं, अशी मेहनत अनेकजण घेत असतात. अशा उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे.

मुंबई, 22 मे:   बँकेत नोकरी मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी बँकिंगच्या परीक्षाही अनेक जण देत असतात. या परीक्षेच्या अनुषंगानं खासगी क्लास लावणं, स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचं वाचन करणं, अशी मेहनत अनेकजण घेत असतात. बँकेच्या भरतीच्या अधिसूचना कधी येतील, याचीही ते वाट पाहत असतात. अशा उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. इंडियन बँकेने कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेसमधल्या स्पेशलिस्ट्च्या 18 रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केलीय. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. इंडियन बँकेनं स्पेशलिस्ट पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार इंडियन बँकेची अधिकृत वेबसाइट indianbank.in द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेत बँकेतील 18 पदं भरण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे. अर्जाची फी 1000 रुपये असून, याबाबतचा अधिक तपशील इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलाय. महिन्याचा 40,000 रुपये पगार अन् थेट वन विभागात नोकरी; घाई करा; पात्र असाल तर इथे पाठवा अर्ज रिक्त जागा किती? बँकेच्या या भरती प्रक्रियेद्वारे प्रॉडक्ट मॅनेजर 5 पदं, टीम लीड 7 पदं व चार्टर्ड अकाउंटंट 6 पदं, अशा एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार या पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची माहिती बँकेची अधिकृत वेबसाइट indianbank.in येथे तपासू शकतात. कुठे अर्ज करावा? या पदांसाठीचे अर्ज मुख्य महाव्यवस्थापक (CDO & CLO), इंडियन बँक कॉर्पोरेट ऑफिस, एचआरएम विभाग, भरती विभाग 254-260, अवाई शानपुगाम सालाई (Avvai Shanmugam Salai), रोयापेटाह, चेन्नई, तमिळनाडू, पिन कोड - 600 014 येथे पाठवावेत. हा अर्ज 29 मे 2023 पूर्वी पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे, त्या पदाचं नाव पाकिटावर लिहिणं गरजेचं आहे. Google मध्ये जॉब हवाय? मग तुमच्या Resume मधून आताच काढून टाका ‘या’ चुकीच्या गोष्टी; वाचा IMP टिप्स अशी केली जाईल निवड उमेदवारांची अंतिम निवड पात्रता, अनुभव, इंटरव्ह्यू या आधारे केली जाईल. इंटरव्ह्यू हा भरती प्रक्रियेसाठी स्थापन केलेल्या समितीद्वारे घेण्यात येतील.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या व भरती प्रक्रियेची वाट पाहणाऱ्यांसाठी इंडियन बँकेची ही भरती प्रक्रिया म्हणजे एक चांगली संधी आहे. या प्रक्रियेद्वारे उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याला चांगला पगार व त्यासोबतच सोयीसुविधासुद्धा मिळतील. या विषयी अधिक माहिती उमेदवारांना इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर मिळू शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात