Home /News /career /

राज्यातील विद्यार्थ्यांना आयुर्वेदाची भुरळ; MBBS नंतर आयुर्वेदलाच विद्यार्थ्यांची पसंती; होमिओपॅथीकडेही कल

राज्यातील विद्यार्थ्यांना आयुर्वेदाची भुरळ; MBBS नंतर आयुर्वेदलाच विद्यार्थ्यांची पसंती; होमिओपॅथीकडेही कल

आतापर्यंत MBBS नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती मात्र आता याची जागा आयुर्वेदनं (Ayurvedic becomes choice of students after MBBS) घेतली आहे.

    मुंबई, 18 जून: बारावीनंतर NEET UG परीक्षा (NEET UG Exam 2022) देऊन मेडिकल क्षेत्रात डॉक्टर होण्याचं स्वप्नं अनेकांचं असतं. म्हणून देशभरातील लाखो विद्यार्थी NEET ची तयारी (NEET Exam Preparation Tips) करत असतात. मात्र सर्वांचं MBBS ला प्रवेश मिळू शकत नाही. म्हणून काही विद्यार्थी आयुर्वेदिक (Graduation in Ayurvedic), होमिओपॅथी (Homeopathy graduation) किंवा डेंटल क्षेत्रात डॉक्टर होतात. आतापर्यंत MBBS नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती मात्र आता याची जागा आयुर्वेदनं (Ayurvedic becomes choice of students after MBBS) घेतली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आयुर्वेद क्षेत्रामध्ये येणाऱ्या कंपन्या आणि या क्षेत्राला वाढणारी मागणी बघता विद्यार्थ्यांचा कल याकडे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील लोकही वेस्टर्न आणि परदेशातील औषध घेण्यापेक्षा आयुर्वेदिक उपचारांवर अधिक भर देत आहेत म्हणूनही विद्यार्थ्यांना या क्षेत्रांमध्ये रस वाटू लागला आहे. Polytechnic Admissions 2022: पटापट अपलोड करा तुमचे मार्क्स; डिप्लोमासाठी दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया सुरु TOI च्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील NEET UG (Maharashtra NEET 2022) च्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षांचे पुढील आकडे बघून आयुर्वेदाला मागणी वाढल्याचं दिसून आलं आहे. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात आयुर्वेदाच्या जागांमध्ये 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यापैकी केवळ काही जागा दरवर्षी रिक्त राहतात. आयुर्वेदाबरोबरच होमिओपॅथीही उमेदवारांना आवडू लागली आहे. तेही याला खूप पसंती देत ​​आहेत आणि 2019-20 मध्ये जिथे 844 जागा रिक्त होत्या, तिथे आता ही संख्या 60 वर पोहोचली आहे. 2018-19 मध्ये महाराष्ट्र राज्यात आयुर्वेदाच्या 4300 जागा होत्या, 2021-22 मध्ये त्या सुमारे 5600 पर्यंत वाढल्या. कोरोनानंतर आयुर्वेद आणि होमिओपॅथीकडे उमेदवारांचा कल वाढला आहे. जीवनशैलीतील अनेक आजारांवर आधुनिक वैद्यकशास्त्र तितकेसे प्रभावी नसले तरी या दोन्ही शाखांनी उत्तम काम केले आहे. Career After 10th: मार्क्स कमी पडलेत तरी राहा बिनधास्त; 11वीमध्ये स्ट्रीम निवडण्यासाठी एक्सपर्ट्सने दिला सल्ला आयुर्वेद आणि होमिओपॅथीमधील पीजी अभ्यासक्रमांचीही हीच स्थिती आहे. जिथे विद्यार्थी संख्या आणि जागा वाढल्या आहेत. 2019-20 मध्ये आयुर्वेद पीजीच्या एकूण जागा 1092 होत्या, त्या पुढील वर्षी 1163 पर्यंत वाढल्या. 2019 मध्ये 355 जागा रिक्त होत्या, त्यानंतर 2020 मध्ये ही संख्या फक्त 126 राहिली.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Ayurvedic medicine, Career, Career opportunities

    पुढील बातम्या