मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या कसा कराल अर्ज

Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या कसा कराल अर्ज

Indian Army

Indian Army

Indian Army GD Constable recruitment 2021: भारतीय सैन्यात पुन्हा एकदा भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. 8 वी ते 12 पास उमेदवारांसाठी ही निश्चितच एक सुवर्णसंधी आहे.

  • Published by:  news18 desk

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी: भारतीय सैन्यात पुन्हा एकदा भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. 8 वी ते 12 पास उमेदवारांसाठी ही निश्चितच एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे जर तुमचं भारतीय सैन्यात जायचं स्वप्न असेल, तर त्यासाठी सुवर्णसंधी आहे. भरतीप्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://joinindianarmy.nic.in वर जाऊन माहिती घेऊ शकता. झेबिज.कॉमने याबाबत अधिक माहिती दिली आहे.

या पोस्टवर मिळेल नोकरी :

Indian Army GD Constable recruitment 2021 ही भरती रॅली सैनिक जीडी, सैनिक जीडी (ST उमेदवार), सैनिक लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल, सैनिक नर्सिंग सहाय्यक, सैनिक व्यापारी इत्यादी पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता :

Indian Army GD Constable recruitment 2021  या पदांसाठी आठवी, दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. वेगवेगळया पदांनुसार ठराविक शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

वयोमर्यादा:

Indian Army GD Constable recruitment 2021 या भरतीसाठी  वयोमर्यादा पदांनुसार ठरवण्यात आली आहे. सैनिक (General duty) या पदासाठी उमेदवारांच किमान वय 17.5 वर्षे आणि जास्तीत जास्त 21 वर्षे असावं. तसेच शिपाई लिपिक / स्टोर कीपर तांत्रिक पदासाठी किमान वयोमर्यादा 17.5 वर्षे आणि जास्तीत जास्त 23 वर्षे निश्चित केली आहे.

अर्ज भरण्याची मुदत:

Indian Army GD Constable recruitment 2021  सैनिक भरतीसाठी इच्छुक उमेदवार या पदांवर 5 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

(हे देखील वाचा  - Job alert: गावखेड्यातल्या तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी मोदी सरकारची विशेष योजना)

सैन्य भरती मेळावा

Indian Army GD Constable recruitment 2021 मध्यप्रदेश मधील कुशाभाऊ ठाकरे स्टेडियमवर 20 मार्च ते 30 मार्च या कालावधीत भरती मेळावा घेण्यात येणार आहे. इंदूर, उज्जैन, धार, देवास, अगर मालवा, अलिराजपूर, बडवानी, बुरहानपूर, खंडवा, खरगोन, मंदसौर, नीमच, रतलाम, शाजापूर येथील तरुण या सैनिक भरती रॅलीत सहभागी होऊ शकतात.

निवड प्रक्रिया कशी असेल:

या सैनिक भरतीसाठी फक्त मध्य प्रदेशातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे रहिवासी प्रमाणपत्रही बंधनकारक केले आहे. शारिरीक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम नसणार आहे.

First published:

Tags: Employment, Indian army, Military, Sarkari Naukari, Uttar pradesh