जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / India Post Recruitment: 10वी पास आहात ना? मग नोकरीचं टेन्शन सोडा! भारतीय पोस्टात बंपर भरती; असा करा अर्ज

India Post Recruitment: 10वी पास आहात ना? मग नोकरीचं टेन्शन सोडा! भारतीय पोस्टात बंपर भरती; असा करा अर्ज

India Post Recruitment: 10वी पास आहात ना? मग नोकरीचं टेंशन सोडा! भारतीय पोस्टात बंपर भरती; असा करा अर्ज

India Post Recruitment: 10वी पास आहात ना? मग नोकरीचं टेंशन सोडा! भारतीय पोस्टात बंपर भरती; असा करा अर्ज

India Post Recruitment 2022: भारतीय पोस्ट विभागाने (India Post Recruitment 2022) स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कुठली पाहा सर्व माहिती…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 जून: सरकारी नोकरी (Government Job) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही 10वी पास असाल, तर मग नोकरीची चिंता सोडा. कारण तुम्ही भारतीय पोस्ट विभागात (India Post) नोकरीसाठी अर्ज करू शकता. भारतीय पोस्ट विभागाने (India Post Recruitment 2022 h0w to apply) स्टाफ कार ड्रायव्हर (Staff Car Driver- ordinary grade) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, असे इच्छुक आणि पात्र उमेदवार पोस्टाची अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे. याशिवाय, उमेदवार या लिंक वर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, तुम्ही https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_13062022 या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरतीअंतर्गत एकूण 24 पदे भरण्यात येणार आहेत. महत्वाच्या तारखा-  पोस्ट विभागातील स्टाफ ड्रायव्हर पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै आहे. रिक्त जागांचा तपशील - या भरतीअंतर्गत पोस्ट विभागात स्टाफ ड्रायव्हर पदासाठी एकूण 24 पदांची भरती करण्यात येणार आहे. हेही वाचा:  Golden Chance! 10वी पाससाठी बंपर लॉटरी; थेट भारतीय सैन्यात थेट नोकरीची संधी; ही घ्या अर्जाची लिंक पात्रता निकष- उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराकडे वैध वाहन चालवण्याचा परवाना (Heavy Driving License) आवश्यक आहे. उमेदवाराला वाहतूक नियमांची माहिती असावी आणि वाहनातील छोटे-मोठे बिघाड दुरुस्त करता यावेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कमीत कमी 3 वर्ष वाहन चालवण्याचा अनुभव असावा. हेही वाचा:  दहावी उत्तीर्णांसाठी Mahatransco मध्ये बंपर जॉब ओपनिंग्स; पात्र असाल तर संधी सोडू नका; लगेच करा अर्ज वयोमर्यादा- अर्ज मिळाल्याच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवारांची वयोमर्यादा ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावी. त्यापेक्षा जास्त वय असलेले उमेदवार अर्ज करण्यास अपात्र असतील. इतर तपशील- उमेदवार विहित नमुन्यातील आपला अर्ज भरून पुढील पत्त्यावर पाठवू शकतात. अर्जासाठीचा पत्ता- सीनियर मॅनेजर (JAG), Mail Motor Service, No. 37, Greams Road, चेन्नई- 600006

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात