Home /News /career /

IIT मध्ये प्रवेश हवाय? मग JEE देण्याची काहीच आवश्यकता नाही; 'या' कोर्सेससाठी डायरेक्ट मिळतेय Admission

IIT मध्ये प्रवेश हवाय? मग JEE देण्याची काहीच आवश्यकता नाही; 'या' कोर्सेससाठी डायरेक्ट मिळतेय Admission

 'या' कोर्सेससाठी डायरेक्ट मिळतेय Admission

'या' कोर्सेससाठी डायरेक्ट मिळतेय Admission

आता देशातील एका IIT (IIT Madras Data Science course) नं असेल काही भन्नाट कोर्सेस आणले आहेत की तुम्हाला त्यासाठी JEE देण्याची काहीच गरज पडत नाही.

  मुंबई, 02 ऑगस्ट: देशातील कोणत्याही IIT कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा म्हंटला की JEE ची परीक्षा देणं आवश्यक असतं. JEE mains आणि JEE Advance परीक्षा उत्तीर्ण केल्यानांतरच तुम्हाला IIT ला प्रवेश मिळू शकतो. मात्र आता देशातील एका IIT (IIT Madras Data Science course) नं असेल काही भन्नाट कोर्सेस आणले आहेत की तुम्हाला त्यासाठी JEE देण्याची काहीच गरज पडत नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIT मद्रासने 4 वर्षांचा B.Sc डेटा सायन्स कोर्स जाहीर केला आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी JEE स्कोअर आवश्यक नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना जेईईशिवाय आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी आहे. IIT मद्रासने 1 ऑगस्ट रोजी या अभ्यासक्रमाची माहिती दिली आहे. ज्यासाठी 12वी पास विद्यार्थी अर्ज करू शकतात. याबाबतची अधिसूचना अधिकृत वेबसाइट onlinedegree.iitm.ac.in वर शेअर करण्यात आली आहे. Career Option : फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करायचं आहे?; मग 'हे' एकदा वाचाच
  या तारखेपासून सुरु होणार अर्ज
  या कोर्ससाठी सप्टेंबरच्या टर्मसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 ऑगस्टपर्यंत सुरू आहे. विद्यार्थी onlinedegree.iitm.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन कोर्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अशी असेल पात्रता या अभ्यासक्रमासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार कोणत्याही शाखेचे विद्यार्थी त्यात प्रवेश घेऊ शकतात. दहावीत इंग्रजी आणि गणित हे दोन विषय असावेत. सध्या 13000 हून अधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. त्यापैकी सर्वाधिक विद्यार्थी तामिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील आहेत. यासाठी देशातील 111 शहरांमधील 116 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाते. यूएई, बहरीन, कुवेत आणि श्रीलंका येथेही हीच परीक्षा केंद्रे उघडण्यात आली आहेत. सरकारी नोकरी ते ही मुंबईत; मग गोल्डन चान्स सोडू नका; ही घ्या अर्जाची लिंक
  आयआयटी मद्रासला खूप आनंद आहे की एवढा चांगला कोर्स येथे सुरू झाला आहे. बीएस इन डेटा सायन्स अँड अॅप्लिकेशन्स पदवी हा उच्च रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आहे. उद्योगातही त्याची मागणी जास्त आहे. यासोबत जेईई परीक्षेशिवायही प्रवेश घेता येणार आहे. आयआयटी मद्रासचे संचालक प्रोफेसर व्ही कामकोटी असं म्हणाले आहेत.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Education, IIT, Job

  पुढील बातम्या