नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने बुधवारी आरआरबी पीओ ऑफिसर स्केल- 1 या मुख्य परीक्षेचा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. IBPS RRB PO च्या मुख्य परीक्षेस बसलेले उमेदवार 20 फेब्रुवारी, 2021 किंवा त्यापूर्वी ibps.in वर जाऊन त्यांचं गुणपत्रक डाऊनलोड करू शकतात.
आयबीपीएस आरआरबी पीओ अधिकारी स्केल 1 ची मुख्य परीक्षा 30 जानेवारी, 2021 रोजी घेण्यात आली होती. त्याचाच निकाल संस्थेने 8 फेब्रुवारी, 2021 रोजी जाहीर केला आहे. आता ज्या उमेदवारांनी मुख्य परीक्षा दिली आहे ते आता मुलाखतीस पात्र ठरणार आहेत.
IBPS RRB PO चा निकाल कसा पहावा?
ibps.in या अधिकृत वेबसाईटवर जा
मुख्यपृष्ठावर ‘Click here to View Your Scores of Online Main Examination for CRP RRB IX - Officers Scale I’ यावर क्लिक करा
एक नवीन पेज उघडेल.
तुमचे लॉगिन डिटेल्स भरून आतमध्ये प्रवेश करा
हे देखील वाचा - FASTag बाबत कार चालकांना दिलासा; वाचा नव्या नियमानुसार काय परिणाम होणार
IBPS RRB PO चं गुणपत्रक तुम्हाला दिसू लागेल.
भविष्यातील वापरासाठी गुणपत्रक डाउनलोड करा आणि त्याचा प्रिंट आउट घ्या