जैसलमेर, 27 जानेवारी : आयएएस अधिकारी टीना डाबी ही भारतीय प्रशासकीय सेवेत 8 वर्षांपूर्वी रुजू झालीय. पण आजही अनेक कारणांनी ती चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर टीना डाबीची चर्चा होतेय. तिचं मार्कलीस्ट व्हायरल झालं आहे. टीना डाबीने पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर टीना डाबी प्रकाशझोतात आली होती. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी तिच्याकडे रोल मॉडेल म्हणून पाहतात.
युपीएससीच्या २०१५ च्या परीक्षेत टीनाने यश मिळवलं होतं. या परीक्षेत चांगले गुण मिळवून टॉप येणारी ती एससी वर्गातील पहिली महिला ठरली होती. टीना डाबीने एकूण १०६३ गुण मिळवून ऑल इंडिया पहिली रँक मिळवली होती. टीना डाबीने युपीएससीची तयारी लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमन, दिल्ली विद्यापीठात शिकत असताना केली होती. डाबीने तिचं पदवीचं शिक्षण राज्यशास्त्र या विषयात घेतलं आहे.
हेही वाचा : Success Story : IIT पास, UPSC मध्ये दुसरा क्रमांक, शेतकऱ्याची मुलगी झाली IAS अधिकारी
पदवीचं शिक्षण घेत असताना तिने वेळापत्रक आणि अभ्यासाचं शेड्युल तयार केलं आणि ते तंतोतंत पाळलंसुद्धा. याशिवाय आपल्या या शेड्युलमध्ये पुरेसा ब्रेक घेण्यासाठीही ती प्रोत्साहन देते, ज्यामुळे थकवा जाणवणार नाही. टीना डाबी सध्या राजस्थान कॅडरमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये जिल्हाधिकारी आणि न्यायदंडाधिकारी म्हणून ती काम करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.