मराठी बातम्या /बातम्या /करिअर /एका हाताला सलाइन आणि दुसऱ्या हातात पुस्तक, नवजीवन यांच्या संघर्षाची यशोगाथा

एका हाताला सलाइन आणि दुसऱ्या हातात पुस्तक, नवजीवन यांच्या संघर्षाची यशोगाथा

15 दिवसांनंतर नवजीवनला बरं वाटू लागलं त्यानंतर अभ्यासाचं नुकसान झाल्यामुळे खूप तणाव आला होता.

15 दिवसांनंतर नवजीवनला बरं वाटू लागलं त्यानंतर अभ्यासाचं नुकसान झाल्यामुळे खूप तणाव आला होता.

15 दिवसांनंतर नवजीवनला बरं वाटू लागलं त्यानंतर अभ्यासाचं नुकसान झाल्यामुळे खूप तणाव आला होता.

मुंबई, 09 जुलै : IAS Success Story : देशात सर्वात अवघड समजली जाणारी UPSCची परीक्षा या तरुणाने आपल्या केवळ जिद्दीच्या जोरावर पास केली आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या परीक्षेत यश खेचून आणणं फार कमी लोकांना जमतं. डेंग्युमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणानं जिद्दीच्या जोरावर अभ्यास करून ही परीक्षा पास केली आणि 2018 मध्ये देशात 316 क्रमांकही मिळवला.

नवजीवन विजय पवार यांचा संघर्ष आणि IAS पर्यंतचा खडतर प्रवास प्रेरणादायी आहे. वडील शेतकरी आणि आई शिक्षिका. शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सिव्हील इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नागरी सेवांसाठी तयारी करण्याचा निश्चय पक्का केला.

हे वाचा-उधारी घेऊन केली UPSC ची तयारी, शेतकऱ्यांचा मुलगा झाला IAS

नवजीवन यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली येथे आले. त्यांनी येथे अभ्यास सुरू केला. नवजीवनने तयारीसाठी कोचिंग क्लास लावले नाही. तो स्वत: च्या अभ्यासावर अधिक भर देत असे. नवजीवनने मुलाखतीत सांगितले, मेन्स परीक्षा जवळ आली असताना खूप जास्त अंगात ताप होता. वेदनेनं अंग फुटत होतं. रुग्णालयात अॅडमिट केलं तेव्हा कळलं डेंग्यु झाला आहे. एकीकडे इंजेक्शन आणि सलाइन सुरू होत्या आणि माझ्या दुसऱ्या हातात पुस्तक.

15 दिवसांनंतर नवजीवनला बरं वाटू लागलं त्यानंतर अभ्यासाचं नुकसान झाल्यामुळे खूप तणाव आला होता. मात्र हिम्मत आणि जिद्द सोडली नाही. 2018 साली UPSC परीक्षा देऊन 316 वा क्रमांक मिळवला.

First published:

Tags: Upsc, Upsc exam