मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

पूर्णवेळ नोकरी करुन UPSC, MPSC मध्ये यश मिळवता येतं! सांगतायेत देशात 28 वी रँक मिळवलेल्या IAS

पूर्णवेळ नोकरी करुन UPSC, MPSC मध्ये यश मिळवता येतं! सांगतायेत देशात 28 वी रँक मिळवलेल्या IAS

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

यूपीएससी (UPSC), एमपीएससी (MPSC) किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची (Competitive Exam) तयारी करताना अभ्यासासाठी भरपूर वेळ हवा असतो. मात्र, तुम्ही पूर्णवेळ नोकरी करुनही परीक्षेत यश मिळवू शकता, हे युपीएससी परीक्षेत देशात 28 वी रँक मिळवलेल्या काजल यांनी सांगतिलं आहे. काय आहे त्यांच्या यशचं सुत्र?

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 20 डिसेंबर : यूपीएससी (UPSC) असो किंवा एमपीएससी (MPSC) आर्थिक पाठबळ असणे फार आवश्यक आहे. पण, सर्वांचीच आर्थिक परिस्थिती चांगली असेल असं नाही. परिणामी अनेकजण स्पर्धा परीक्षांचा (Competitive Exam) नाद मध्येच सोडून देतात. मात्र, दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण परिश्रम असतील तर पूर्णवेळ नोकरी करुनही तुम्ही या परीक्षेत यश मिळवू शकता. हे आम्ही नाही म्हणत तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशातून 28 वी रँक मिळवणाऱ्या कालज ज्वाला (Kajal Jawla) सांगतायेत. नोकरी करतानाही अभ्यासाठी कसा वेळ काढायचा? वेळचं नियोजन कसे करायचं? या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. काजल यांनी 2018 च्या युपीएससी परीक्षेत देशातून 28 वी रँक मिळवली आहे, तेही पूर्णवेळ नोकरी करुन.

चुकातून शिका..

पुढच्याच ठेच मागचा शहाणा, अशा आपल्याकडे मराठी म्हण आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या चुकातून शिका. काजल यांनीही हेच सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, की ज्यांनी अशा परीक्षेत यश मिळवलं आहे. अशा लोकांचे मार्दर्शन घेतल्यास खूप फायदा होता. कारण, आम्ही केलेल्या चुका तुम्ही टाळू शकता. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. यातही योग्य व्यक्तीचे मार्गदर्शनच घ्या असंही त्यांनी सांगितलंय. नाहीतर चुकीच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही भरकटू शकता.

तुमच्याकडे असलेल्या वेळेनुसार अभ्यास करा

काजल इच्छुकांना वेळेचं स्पष्ट भान ठेवण्याचं आवाहन करतात, “मी दररोज कामासाठी दिल्ली ते गुडगाव असा प्रवास करत असे. त्यामुळे मला कोणत्या आठवड्यात कोणता विषय संपवायचा आहे, याचं नियोजन केलं होतं. प्रवासातच मी माझा खूप अभ्यास पूर्ण केला. आजकाल ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरुपताही अभ्यास उपलब्ध असल्याने तुम्ही असा प्रवास करताना कानात हेडफोन टाकून अभ्यास करू शकता. तुमच्याकडे असणाऱ्या वेळेचं योग्य नियोजन केलं तर तुम्हालाही अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ काढता येईल.

झापडं लावलेला अश्व व्हा

याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितलं की, "2012 मध्ये मी पहिली परीक्षा दिल्याने, 2018 मधील माझ्या चौथ्या प्रयत्नातच मी प्रिलिम्स पास करू शकले. प्रतीक्षा खूप मोठी होती. पण, मी माझे लक्ष पुढील मार्गावर ठेवलं." स्वतःला अशा लोकांमध्ये ठेवा, जे तुम्हाला नेहमीच सकारात्मक पाठींबा देत असतात. यासाठीच त्या म्हणतात, की झापडं लावलेला अश्व ज्याप्रमाणे फक्त आपल्या ध्येयाच्या दिशेने चालत असतो, त्याचप्रणाने तुम्ही करा. आपल्या आसपास काय चाललंय याचा विचार करू नका.

..तर तुम्हीही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा क्रॅक करू शकता, कशी करावी तयारी?

चांगल्या गुंतवणुकीवर परतावा चांगलाच मिळतो

काजल म्हणतात, “माझ्याप्रमाणे, एखाद्या इच्छुकाकडे तयारीसाठी आणि उजळणी करण्यासाठी कमी वेळ असेल, तर अभ्यासक्रमांतर्गत प्रत्येक विषयाचं तुम्ही विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे,” कारण, अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे हे परीक्षेची तयारी करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. इच्छुकांना विषयांची आणि प्रत्येक भागाला दिलेली महत्त्वाची स्पष्ट माहिती असणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी उमेदवार मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेशी अभ्यासक्रमाची तुलना करू शकतात.

हुशारीने विषय निवडा

मागील वर्षाच्या पेपरमध्ये ज्या विषयात फक्त एखादाच विषम प्रश्न विचारला गेला होता. अशा विषयांसाठी मी वेळ दिला नाही. “उदाहरणार्थ, जागतिक इतिहास, जो एक विस्तृत विषय आहे, तो मी तयार केलेला नाही. मी मागील वर्षाच्या पेपर्सचा अभ्यास केला आणि मला असे आढळले की या विषयातून फार कमी प्रश्न विचारले गेले. अशा विषयाची मला मूलभूत माहिती आहे का? याची खात्री करुन घेतली. बाकी वेगळा वेळ दिला नसल्याचे काजल यांनी सांगितले.

परीक्षेचा पटर्न

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करण्यासाठी पुरेसा वेळ दिल्यास आपल्याला परीक्षेचा पॅटर्न लक्षात येतो. काजल म्हणाल्या की “मला असे आढळले की माझ्या वैकल्पिक पेपरसाठी (zoology), प्रत्येक पर्यायी वर्षी असे विषय होते ज्याची पुनरावृत्ती झाली होती. त्यामुळे इतर विषयांकडे कमी लक्ष देताना मी अशा विषयांवर लक्ष केंद्रित केले,” त्या म्हणतात, की उमेदवारांनी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांवर पुरेसा वेळ दिल्यावर त्यांना असे नमुने सापडतील.

उजळणी ही गुरुकिल्ली

जेव्हा विद्यार्थी अभ्यास करत असतात तेव्हा उजळणी त्यांच्या यशाची गुरुकिल्ली असते. काजल म्हणतात, “तुम्ही अभ्यासाचा फक्त 60 टक्के भाग जरी पूर्ण करू शकलात तरीही, तुम्ही त्याची व्यवस्थित उजळणी करून सदर विषयात जास्तीत जास्त गुण मिळवू शकता,” पुढे त्या म्हणाल्या, की उजळणीसोबतच मॉक टेस्टवर काम करत राहा. मॉक टेस्टमधील निकालांचे विश्लेषण करा आणि त्यानुसार तुमच्या कमकुवत भागांवर काम करा.

MPSC क्षेत्राकडे नव्याने वळण्याआधी 'या' गोष्टींची माहिती घ्या!

प्रत्येक गोष्टीसाठी रिमाइंडर

काजल म्हणतात, की तंत्रज्ञानाचा वापर करून मी प्रत्येक गोष्टीसाठी अलार्म किंवा रिमाइंडर सेट केला होता. "नियोजित वेळेवर उठण्यापासून ते माझ्या सकाळची कॉफी पिण्यापर्यंत - सर्व काही वेळापत्रकानुसार चालले," त्या म्हणतात, त्यांनी प्रवासात घालवलेला वेळही कार्यक्षमतेने वापरला. त्या दररोज प्रवासादरम्यान वृत्तपत्र आणि इनसाइट्सचे चालू घडामोडींचे संकलन वाचत असे.

अभ्यासात स्मार्टनेस वापरा

विशेषत: जे पूर्णवेळ नोकरी करत परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांनी तयारी करताना हुशार असणे आवश्यक आहे. “सर्व काही वाचण्याच्या फंदात पडू नका. तुमच्याकडे वेळ लक्झरी नाही, म्हणून तुम्ही जे अभ्यास करता ते निवडण्यात हुशार व्हा. मर्यादित संसाधनांमधून मर्यादित सामग्रीवर लक्ष केंद्रित करा,” नवीन साहित्य उचलण्यापेक्षा मोजकं निवडून तयारी करा.

चुकांमधून शिका

CSE साठी आधीच पाच वेळा प्रयत्न केल्यानंतर, काजल यांनी अनेक चुका केल्याचे मान्य केल्या. "कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत असते. मित्रांच्या दबावामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्यात उडी मारू नका,” परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेताना विद्यार्थ्यांनी मोजून मापून जोखीम पत्करली पाहिजे.

MPSC परीक्षेत चालू घडामोडींची तयारी कशी करावी?

सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा

स्वतःविषयी कायम सकारात्मक विचार करत राहा. यातून तुमचा आत्मविश्वास वाढत राहतो. काजल म्हणतात, की “मी अनेकदा माझ्या यशाच्या भाषणाचा सराव करत असे जे मी पुढील वर्षी इच्छुकांना देईन. मी अकादमीच्या भिंतीवर माझे छायाचित्र काढले आणि या छोट्या गोष्टी मला माझ्या पुढे असलेल्या यशाची कल्पना करण्यास मदत करतात.” काजल यांनी त्यांच्या संपूर्ण प्रवासात स्वतःला प्रेरित ठेवण्यासाठी सकारात्मक व्हिज्युअलायझेशनचा वापर केला.

First published:

Tags: Exam, Mpsc examination, Upsc exam