मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

..तर तुम्हीही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा क्रॅक करू शकता, कशी करावी तयारी?

..तर तुम्हीही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा क्रॅक करू शकता, कशी करावी तयारी?

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

How to crack MPSC Prelims Exam: महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची (MPSC) पूर्वपरीक्षा ही अधिकारी होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल समजलं जातं. तुम्हीही या परीक्षेत यश मिळवू शकता. मात्र, यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या लेखात आपण MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत यश कसं मिळवावं याची सविस्तर माहिती घेऊ.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 17 डिसेंबर : महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या (MPSC) कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप समजून घेणे. या माहितीच्या आधारे आपण आपली तयारी चांगल्या प्रकारे सुरू करू शकतो. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. तर चला या लेखात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा कशी क्रॅक करावी याची सविस्तर माहिती घेऊ.

राज्यसेवा पूर्व परीक्षा स्वरुप MPSC Rajyaseva Prelims Exam Pattern

या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात.  पेपर 1 मध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतात. यात प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतो. यासाठी 2 तासांचा अवधी असतो. तर पेपर 2 मध्ये 80 प्रश्न 200 गुणांसाठी असतात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण असतो. यासाठीही 2 तासाचा वेळ असतो. दोन्ही पेपरमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण कमी केले जातात. (Negative marking).

पेपर 1

सामान्य अध्ययन (General Studies) : यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय असतात.

पेपर 2

सामान्य बुद्धिमत्ता चाचणी किंवा CSAT.  यामध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय येतात.

MPSC क्षेत्राकडे नव्याने वळण्याआधी 'या' गोष्टींची माहिती घ्या!

कोणत्या विषयात किती प्रश्न विचारले जातात?

पेपर 1

चालू घडामोडी    16-17

राज्यशात्र    15

इतिहास (प्राचीन,मध्ययुगीन व आधुनिक) 15

भूगोल    16

अर्थशात्र    15

सामान्य विज्ञान     18-19

पर्यावरण    5-6

पेपर 2

उताऱ्यावरील प्रश्न 50

गणित आणि बुद्धिमत्ता    25

निर्णय क्षमता    5

अभ्यासाची पद्धत

पूर्वीच्या काळी अभ्यास करण्यासाठी ठराविक नोट्स आणि पुस्तकांवर मर्यादीत राहावं लागत होतं. मात्र, आता बाजारात असंख्य प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहे. तंत्रज्ञानात झालेला बदल आताच्या विद्यार्थ्यांसाठी जमेची बाजू आहे. पूर्वीसारखे आता कोणत्याही मोठ्या शहरात किंवा अभ्यासवर्गासाठी बाहेर जाण्याची गरज उरली नाही. तुम्ही मोबाईल, संगणक, टॅब्लेटच्या माध्यमातून घरुनही या गोष्टी करू शकता. यात सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यास सामग्री अंतिम करणे. बर्‍याच पुस्तकांऐवजी आपल्याला सर्वोत्तम पुस्तके निवडण्याची गरज आहे. फक्त पुस्तकातून अभ्यास करणे कंटाळवाणे होते. त्यामुळे युट्युबवरील व्हिडीओच्या माध्यमातून अभ्यास केला तर जास्त लक्षात राहतो. सध्या ऑडिओ बुकही उपलब्ध असल्याने त्याचीही मदत तुम्ही घेऊ शकता. यामुळे तुमच्या डोळ्यांनाही आराम मिळेल.

Previous Year Questions: मागील वर्षांतील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे हे उत्तम तंत्र आहे. यातून परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात? आपण कुठे कमी आहे? अभ्यासाची दिशा कशी असावी? याबद्दलची माहिती मिळते. मागील वर्षांचे हे प्रश्न तुमच्या तयारीला पूरक ठरू शकतात. CSAT च्या तयारीसाठी प्रश्नांची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. CSAT च्या पेपरला वेळ कमी पडतो. त्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढा जास्त फायदा होईल.

चालू घडामोडी  

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये राजकीय, शासकीय विधेयके, महत्त्वाची आर्थिक धोरणे, सामाजिक घडामोडी, योजना, महतत्वाचे पुरस्कार, साहित्य, व्यक्ति, पर्यावरण,‌ क्रिडा, संरक्षण, जागतिक परीषदा आणि तंत्रज्ञान इत्यादींवर प्रश्र्न विचारले जातात. नियमित वर्तमानपत्र वाचुन नोट्स काढणारा आणि शेवटी स्पर्धापरिक्षा मासिकातुन उजळणी करणाऱ्यांना सगळे प्रश्र्न सोडविणे सोपे होते.

First published:

Tags: Upsc exam