मुंबई, 11 फेब्रुवारी: परीक्षेआधी एवढी तयारी करूनही अनेकदा आपल्याला परीक्षागृहात गेल्यावर काही आठवत नाही. अशा तीन कॅटेगरीचे लोग असतात. ज्यांना पेपर समोर येताच भरकन आठवत दुसरे ज्यांना थोडा वेळ लागतो पण आठवतं आणि तिसरे की ज्यांना पेपर पाहून नुसता घाम फुटतो. काहीच आठवत नाही. अशावेळी काय ट्रिक वापरायची हे आज आम्ही सांगणार आहोत. ही ट्रिक मार्क मिळवून देण्यासाठी कामी येईल. 1. पेपर नीट वाचा शांत डोकं ठेवून पेपर वाचा. एक प्रश्न दोन वेळा वाचा त्यामुळे प्रश्न समजायला मदत होईल. 2. ऑब्जेक्टीव्ह प्रश्नांची उत्तरं किंवा एका वाक्यात येत नसेल तर थोडं लॉजिक लावून लिहा. उगाच 10-20 करत ठोकू नका. त्यामुळे मार्क जातील. थोडं डोकं लावून लिहिलं तर मार्क मिळू शकतात. 3. कथा उतारा आणि लेखन कौशल्यावर थोडा भर दिला तर ज्या प्रश्नात आपलं मत मांडायचं असतं तिथे चांगले मार्क मिळू शकतात. 4. आपला आत्मविश्वास, लेखन कौशल्य वापरून पेपर लिहायला हवा. मला काहीच येत नाही किंवा जमणार नाही म्हणून तुम्ही नुसतेच बसून राहिलात किंवा मार्कांसाठी धडपड केलीच नाहीत आणि पेपर कोरा सोडलात तर मार्क देणार कसे. त्यामुळे किमान विचारलेल्या प्रश्नाशी संलग्न किंवा त्या प्रश्नाचं जमेल तसं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. **हेही वाचा-** HSC-SSC Exam : टेंशन घेऊ नका! असं नियोजन करून 3 तास करा अभ्यास आणि व्हा पास 5. 3 तास बसण बंधनकारक आहे. तुम्ही पेपर लिहा किंवा नका लिहू. न लिहून मार्क घालवण्यापेक्षा जेवढा जमेल केवढा लॉजिकने पेपर सोडवा. त्यातून पास होण्याची संधी असते. 6. प्रश्न वाचताना त्यामध्ये एखादा की-वर्ड आपल्याला सापडतो. त्या की-वर्ड भोवती आपलं उत्तर फिरतं राहायला हवं. तपासणारा व्यक्तीकडे वेळ नसेल तर तो नजर फिरवून साधारण मार्क देईल. 7. एक प्रश्न दोन ते तीन वेळा वाचा. त्यामुळे तो प्रश्न तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. त्यातून आपल्याला उत्तर सुचेल. किंवा उत्तर काय आणि कसं लिहायचं याचा अंदाज येईल. त्यानुसार सुचेल तसं लिहायला सुरुवात करा. 8. पेपर कोरा सोडू नका, त्याऐवजी जेवढा जमेल तेवढा सोडवण्याचा प्रयत्न करा. 9. जे येत नाहीत असे प्रश्न पुन्हा वाचा, उत्तराची सुरुवात चांगली करायला हवी. कारण पेपर तपासणारे शिक्षण संपूर्ण उत्तर वाचतीलच असं नाही. त्यामुळे ते पहिल्या काही ओळी वाचून पुढे नजर फिरवतात. त्यामुळे उत्तराची सुरुवात चांगली करा. 10. पेपर सुटसुटीत आणि टापटीप ठेवा, खाडाखोड किंवा जोडून लिहिलं आणि वाचण्यास त्रास झाला तर पेपर तपासणारे शिक्षक वैतागतात. जेवढा पेपर टापटिप तेवढा लवकर तपासून पुढे सरकतात. **हेही वाचा-**S SC-SSC Board Exam : कशी सोडवावी प्रश्न पत्रिका? बोर्डाची उत्तरपत्रिका लिहिताना.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







