दहावी-बारावी परीक्षा : टेंशन घेऊ नका! असं नियोजन करून 3 तास करा अभ्यास आणि व्हा पास

दहावी-बारावी परीक्षा : टेंशन घेऊ नका! असं नियोजन करून 3 तास करा अभ्यास आणि व्हा पास

स्वत:वर विश्वास ठेवा. मेडिटेशन करा. दिवसातले तीन तासपण खूप चांगला अभ्यास होऊ शकतो फक्त तो मन लावून न चुकता करायला हवा.

  • Share this:

मुंबई, 11 फेब्रुवारी: बारावीच्या परीक्षेला अवघा आठवडा तर दहावीच्या परीक्षेला 20 दिवस राहिले आहेत. अजूनही आपण अभ्यासाला सुरुवात केली नसेल तरी टेन्शन घेऊ नका. रोज तीन तास अभ्यास करून तुम्ही पास होऊ शकता. बऱ्याचदा गणित आणि विज्ञान सारख्या विषयांचं आपल्याला टेन्शन येतं या विषयात पास कसं होणार? पण दहावीत तर आपण सहज तीन तास अभ्यास करून पास होऊ शकता.

1. वेळेचं नियोजन हा यशाचा उत्तम आणि यशस्वी मार्ग आहे. त्यामुळे कोणत्याही विषयात यशस्वी व्हायचं तर आधी नियोजन हवं.

2. रात्री झोपण्याआधी दुसऱ्या दिवशीचं वेळेचं नियोजन करायला हवं. योग्य वेळाचा योग्य वापर आपल्याला कमी वेळात जास्त कष्ट करून यश खेचून आणता येतं.

3. यामध्ये आपल्याला आपला छंद जोपसण्यासाठी किंवा आपण जे काय नियमित करतो म्हणजे सोशल मीडियावर वेळ घालवणं, आवारण, मनोरंजन हे सगळं करायचं आहे. ह्यातून तीन ते चार तास वेळ हा अभ्यासासाठी राखून ठेवायचा आहे. मग तो सकाळचा असूदे किंवा संध्याकाळचा.

4. आधी आपल्याला असलेले विषय आणि त्याचं नियोजन करायला हवं. अवघड जाणारे विषय, सोपे जाणारे विषय, मार्क मिळवून देणारे प्रश्न आणि पास होण्यासाठी आपण काय आणि कसे प्रश्न सोडवायला हवेत याचं इतर वेळेत थोडं अॅनालिसीस कराय़ला हवं.

हेही वाचा-HSC-SSC Board Exam : परीक्षेला जाता जाता...या गोष्टी करायला अजिबात विसरू नका

5. सोपे जाणारे विषय हे शक्यतो मधल्या वेळेत घ्या. टंगळमंगळ करत केले तरीही आपल्याकडून होतील किंवा एक तास सोप्या विषयांना वेळ द्या. कठीण विषयांना 2 तास शांतपणे देणं महत्त्वाचं आहे.

6. याशिवाय मागितल वर्षांच्या प्रश्नपत्रिका, पूर्व परीक्षेचे पेपर यांच्यातील प्रश्नांचा अभ्यास विशेष करा. झोपण्याआधी थोडसं सोप्या विषयाचं वाचन करा. त्यामुळे वाचनही होईल आणि रात्री झोपही चांगली येईल.

7. ज्यावेळी अभ्यास करत असाल त्या वेळी इतर कोणतीही कामं करू नका. सोशल मीडिया, मनोरंजनाची साधनं, किंवा खाणंही नाही. ते तीन तास फक्त अभ्यास असा निश्चय करा. त्यानंतर तुम्हाला हव्या गोष्टी दिवसभर करू शकता.

8. भाषा विषयाचा अभ्यास करताना गाईडचा वापर करण्याऐवजी पुस्तकावर भर द्यावा. आणि आपल्या शब्दात उत्तर लिहावं. उत्तरामध्ये म्हणी, वाक्प्रचार, अलंकारांचा वापर करावा. अभ्यास करताना धड्याचं वाचन प्रस्तावनेपासून बारकाईनं करावं. त्यामुळे प्रश्न कितीही फिरवून आला तरीही उत्तर लिहिणं सोपं होतं.

9. गणिताची प्रक्रिया फॉलो करा- गणित सोडवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. प्रत्येक फॉर्म्युला आणि स्टेपला महत्त्व असतं. त्यामुळे त्या गाळू नका. प्रत्येक वर्षातील गणिताचे धडे महत्त्वाचे असतात, ते एकमेकांसोबत लिंक केलेलं असतं.

10. स्वत:वर विश्वास ठेवा. मेडिटेशन करा. दिवसातले तीन तासपण खूप चांगला अभ्यास होऊ शकतो फक्त तो मन लावून न चुकता करायला हवा.

हेही वाचा-SSC BOARD EXAM: 15 दिवसांत अभ्यास करून मिळवा 90 टक्के मार्क

First published: February 11, 2020, 12:28 PM IST

ताज्या बातम्या