मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

पालकांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना शिकवा व्यवहारातील 'या' IMP गोष्टी; सजग होतील मुलं

पालकांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना शिकवा व्यवहारातील 'या' IMP गोष्टी; सजग होतील मुलं

तुमच्या मुलांना शिकवू शकता

तुमच्या मुलांना शिकवू शकता

आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आयुष्यातील काही काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता आणि त्यांचं महत्त्वं पटवून देऊ शकता.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 05 मे: कोरोनामुळे बॅड असलेल्या शाळा पुन्हा सुरु झाल्या आणि विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षाही घेण्यात आल्या आहेत. मात्र आता शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे मुलं घरी आहेत. याच महत्वाच्या सुट्यांचा फायदा घेऊन पालकांनी आपल्या मुलांना सजग बनवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आयुष्यातील काही काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता आणि त्यांचं महत्त्वं पटवून देऊ शकता. या गोष्टी अंमलात आणल्यामुळे मुलं नक्कीच यशस्वी (How to be successful) होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया.

स्वयंपाक बनवणं

आजकाल अनेक मुलं लहानपणापासूनच घराच्या दूर कुठेतरी परदेशात किंवा दुसऱ्या शहरात शिकण्यासाठी जातात. मात्र अनेकदा त्यांना जेवण बनवता येत , नसल्यामुळे जेवणासाठी अडचणी निर्माण होतात. म्हणूनच मुलांना आतापासूनच ब्रेकफास्ट बनवणं, चपाती करणं, भाजी करणं किंवा चहा बनवणं (cooking skills)अशा काही गोष्टी शिकवणं महत्त्वाचं आहे. यामुळे मुलांना जेवणासाठी कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही.

Career Tips: जीवनात 'या' चांगल्या सवयी असतील तर कोणीही रोखू शकणार नाही तुमची प्रगती; कोणत्या? वाचा

पैशांचं महत्वं

आपल्या मुलांना पैशाचं मूल्य (Importance of Money) देखील समजावून सांगितलं पाहिजे. खिशातील पैसे कसे वापरायचे हे त्यांनानक्कीच समजवून सांगितलं पाहिजे. आपल्यासाठी निरोगी गोष्टी किंवा अत्यावश्यक वस्तू (Essential things) मिळवण्यासाठी पैसे योग्य रीतीनं कसे खर्च करावे हे देखील सांगितलं पाहिजे. तसंच त्यांना एटीएम (ATM) आणि बँक संबंधित प्रत्येक गोष्टीची माहिती देणं आवश्यक आहे ज्यामुळे त्यांना व्यवहार ज्ञान येईल.

वेळेचं व्यवस्थापन

अगदी लहान वयातच मुलांना वेळेचं व्यवस्थापन (Time Management) शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे त्यांना वेळेचं महत्त्वं समजेल आणि ते यशस्वी होतील. यासाठी मुलांना वेळेचं बंधन पाळण्यास शिकवा.सकाळी शाळेत जाण्यास सांगा आणि दिवसभर केलेल्या कामांची यादी तयार करायला सांगा. तसंच रात्रीच्या वेळी अलार्म (Alarm) लावण्याची आणि सकाळी योग्य वेळी स्वतःहून उठण्याची सवय लावा. मुलांना अभ्यास करण्याच्या आणि गेम्स खेळण्याच्या वेळा ठरवून द्या. असं केल्यामुळे त्यांना वेळेचं महत्त्वं कळेल आणि ते भविष्यात यशस्वी होतील.

ऑफिसच्या कामांमुळे खासगी आयुष्यावर परिणाम होतोय का? असा साधा बॅलन्स

आपातकालीन स्थितीचं ज्ञान

एखाद्या वेळी अचानक घरात काही आपातकालीन स्थिती (Emergency situation) आल्यावर नक्की कोणती पावलं उचलली पाहिजेत याबद्दल आपल्या मुलांना सतर्क करून ठेवणं महत्त्वाचं आहे. घरात अचानक आग लागली किंवा कोणाची प्रकृती बिघडली तर आपातकालीन नंबर्स (Emergency numbers) ही मुलांकडे देऊन ठेवले पाहिजेत. जेणेकरून त्यांना स्थिती हाताळण्यासाठी कोणाची मदत मागता येईल. मुलांना प्रत्येक संकटाचा सामना करण्यास सक्षम बनवलं पाहिजे.

First published:

Tags: Career, Career opportunities, School children