मुंबई, 05 मे: कोणत्याही क्षेत्रात करिअर (Career Tips) करायचं म्हंटलं त्यासाठी त्या क्षेत्राशी संबंधित सर्व शिक्षण (Education for Career) घेणं महत्त्वाचं असतं. तसंच त्या क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधून पुढे जाण्यासाठी मार्ग शोधावे लागतात. मात्र हे सगळं करताना तुमच्यातील काही सुप्त गुणांचा (how to identify talent in you) तुम्हाला फायदा होतो. काही सवयी (Good habits for Career) अशा असतात ज्यामुळे तुमचं नुकसान नाहीतर तुम्हाला फायदाच होतो. एकदा career सुरु केलं की ते सुपरफास्ट गतीनं समोर नेण्याची जबाबदारी (How to be Successful in Career) सर्वस्वी तुमच्यावर असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही चांगल्या सवयी सांगणार आहोत ज्या तुम्ही दैनंदिन जीवनात अंमलात आणल्यात तर तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्या विद्यार्थी जीवनात अभ्यासापेक्षा महत्त्वाचं काहीही नाही यात शंका नाही. मात्र या वयात व्यक्तिमत्त्व विकासावरही (Personality Development) भर देण्याची गरज आहे. विद्यार्थी जीवनापासूनच रागावर नियंत्रण ठेवायला शिका. तसंच व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष द्या. यासाठी मेडिटेशन करत राहा किंवा योग करत राहा. ही सवय जीवनभर मोडू नका. ऑफिसच्या कामांमुळे खासगी आयुष्यावर परिणाम होतोय का? असा साधा बॅलन्स तज्ञांची मदत घ्या आयुष्य आणि करिअरच्या चांगल्या मार्गदर्शनासाठी पालक, शिक्षक आणि तुमच्या वरिष्ठांकडून टिप्स घेत राहा. यासह, करिअरच्या कोणत्याही टप्प्यावर तुमची पावले अडखळणार नाहीत. तसंच तुमच्या क्षेत्राशी निगडित काही एक्सपर्ट्सचा सल्ला नेहमी घेत राहा.यामुळे तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यास सत्ता मदत मिळत राहील. प्रकृती सांभाळा तुमच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आणि करिअरच्या ध्येयांसोबत प्रकृतीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. सकस आहार घेणे महत्त्वाचं आहे. याशिवाय झोपेची वेळ निश्चित ठेवणंही महत्त्वाचं आहे. या सवयीमुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात चांगली प्रगती करू शकाल. रुटीन असणं महत्त्वाचं आयुष्यात रुटीन (How to make career strong) असणं गरजेचं आहे असं तुम्ही वडिलांकडून अनेकदा ऐकलं असेल. त्यावेळी त्याच्या या गोष्टी डोक्यावरून गेल्यासारखे वाटतात, पण सत्य हे आहे की जीवनात दिनचर्या करूनच आपलं ध्येय आणि गोल्स गाठता येतात. म्हणूनच दैनंदिन सवयींप्रमाणे तुम्हाला एक रुटीन फॉलो करणं महत्त्वाचं आहे. दररोज काहीतरी नवीन शिका तुम्ही कोणत्याही वयोगटातील असलात तरी दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. यासह तुम्ही शर्यतीत नेहमीच पुढे असाल. नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्यांसह अद्ययावत रहा. यासाठी तुमच्या क्षेत्राशी निगडित ऑनलाईन कोर्सेस (Online courses) करत राहा. तसंच नवीन टेक्नॉलॉजी शिकत राहा. नवीन जगाशी सतत अपडेट राहा. तरुणांनो, घरातील बिकट आर्थिक स्थितीचा करा सामना; ‘हे’ जॉब्स देतील पैसे बचतीचं नियोजन आवश्यक बचतीची सवय पॉकेटमनीच्या दिवसापासूनच लावली पाहिजे. यासह, नोकरीचा सुरू केल्यानंतर, तुम्ही गुंतवणूक करण्यावर तसेच बचत करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यासाठी आपल्या पगारातून काही भाग हा नेहमी बचतीसाठी राखून ठेवला पाहिजे. निरनिराळया इन्व्हेस्टमेंट पॉलिसीमध्ये बचत केली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.