मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कॉलेजला असताना MPSC चा अभ्यास कसा करायचा?

कॉलेजला असताना MPSC चा अभ्यास कसा करायचा?

MPSC Study in College Days कॉलेजमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेकजण स्पर्धा परीक्षांच्या (Competitive Exam) अभ्यासाला सुरुवात करतात. मात्र, महाविद्यालयापासून तुम्ही याचा अभ्यासाला सुरुवात केली तर यश लवकर भेटण्याची शक्यता वाढतात. पण, कॉलेजला असताना कसा अभ्यास करावा? चला आजच्या लेखातून जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  मुंबई, 22 डिसेंबर : अनेकजण पदवी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा (MPSC, UPSC) अभ्यास सुरू करतात. परिणामी संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्यायलाच पहिले सहा महिने जातात. त्यामुळे कॉलेजला असताना तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली तर त्याचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. मात्र, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतेवेळी पदवीकडे दुर्लक्षा होता कामा नये हे लक्षात असुद्या. कॉलेजला असताना राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी? याविषयी आज आपण माहिती घेऊ. अभ्यासक्रम समजून घेणे महत्वाचे कुठल्याही परीक्षेचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर त्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा तुम्हाला माहीत असायला हवा. जर तुम्हाला अभ्यासक्रम हा माहीत नसेल तर काय वाचावे आणि के वाचू नये हाच गोंधळ होतो. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी जाहिरात आहे, त्यानुसार या अभ्यासक्रमात सात मुद्दे आहेत. प्रश्नांचे स्वरुप Quetion Types अभ्यासक्र समजून घेतल्यानंतर अभ्यासाच्या सुरुवातीलाच तुम्हाला प्रश्नपत्रिका चाळणे आवश्यक आहे. ह्या प्रश्नपत्रिका नुसत्या चाळायच्या नाहीतर तर त्यांचा बारकाईने अभ्यास करायचा आहे. यामुळे तुम्हाला परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न असतात याचा अंदाज येईल. आपल्याला त्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करत असताना आपण करत असलेल्या अभ्यासावर आयोग कसे प्रश्न विचारते ही गोष्ट समजते. मागील 3 ते 4 वर्षात आयोग कशावर जास्त फोकस करते आहे म्हणजेच ट्रेंड काय आहे? हे आपल्याला समजते. पूर्णवेळ नोकरी करुन UPSC, MPSC मध्ये यश मिळवता येतं! सांगतायेत देशात 28 वी रँक मिळवलेल्या IAS कोणती पुस्तकं वाचावी? Books राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी काही महत्वाची पुस्तके आहेत ती तुम्ही वाचू शकता. अगदी इयत्ता चौथीपासून ते बारावी पर्यंतची स्टेट बोर्डाची क्रमिक पुस्तके आपण वाचलेच पाहिजे. त्यात इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञान यांचा समावेश असतो. हे वाचून झाल्यावर इयत्ता सहावी ते इयत्ता बारावी पर्यंतची एनसीईआरटीची क्रमिक पुस्तके तुम्हाला वाचायची आहेत. याशिवाय प्रत्येक विषयासाठी काही महत्वाचे संदर्भ ग्रंथ असतात त्यातील काही निवडक पुस्तकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. वर्तमानपत्र News Paper चालू घडामोडी हा विषय आपल्याला समजून घेण्यासाठी दररोज एक मराठी आणि एक इंग्रजी वर्तमानपत्र वाचायचे आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांची संख्या ही कायम जास्त असते. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आयोगाचा भर जास्त असतो. आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे, त्याच्याशी निगडित चालू घडामोडींवर आपल्याला प्रश्न येत असतात. चर्चेतील व्यक्ती, पुरस्कार, संस्था आणि त्यांची कार्ये या सर्वांवर आयोगाचे लक्ष असते. ..तर तुम्हीही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा क्रॅक करू शकता, कशी करावी तयारी? वेळेचं नियोजन Time Mangement अभ्यासाचे नियोजन करताना मी माझा अभ्यासक्रम किती दिवसात पूर्ण करेल, किती महिन्यात पूर्ण करेल, माझ आठवड्याचे टार्गेट काय, माझे महिन्याभराचे टार्गेट काय, सहा महिन्यांचे टार्गेट काय? याचं नियोजन हे अभ्यासाच्या सुरुवातीलच तुमच्याकडे तयार पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे तयार केलेले वेळापत्रकाचे पालन करणे. स्वतःला कायम सकारात्मक उर्जा देत रहा. सातत्य हेच यशाच रहस्य आहे, हे लक्षात असुद्या.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Mpsc examination, Upsc exam

  पुढील बातम्या