मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Retirement झालं म्हणून आयुष्य संपत नाही; 'या' क्षेत्रांमध्ये करा करिअरची सुरुवात; कमवा भरघोस पैसे

Retirement झालं म्हणून आयुष्य संपत नाही; 'या' क्षेत्रांमध्ये करा करिअरची सुरुवात; कमवा भरघोस पैसे

Retirement नंतर Career

Retirement नंतर Career

आज आम्ही तुम्हाला असे काही पार्ट टाइम जॉब्स (Part Time Jobs After Retirement) सांगणार आहोत जे Retirement नंतर तुम्हाला करता येतील (How to start Career in Retirement) आणि यामुळे तुमच्या नव्या इनिंग्सची सुरुवात होईल.

मुंबई, 06 मे: Retirement म्हंटलं की आपल्या आठवतात ते दिवस जेव्हा आपण आपली इतक्या वर्षांची नोकरी सोडून एक शांत आणि आनंदी जीवन जगात असतो. Retirement नंतर तर मी फक्त आराम करणार असं अनेकदा आपण बोलताना म्हणतो. मात्र Retirement नंतरच्या काही दिवसांमध्येच (career after Retirement) आपल्याला कंटाळा येण्यास सुरुवात होते. असा अनुभव अनेक जणांना येतो. तसंच नेहमीच पगार (How to earn money after Retirement) बंद झाल्यामुळे पैसे कसे कमवता येतील याबद्दलही अनेक Retire व्यक्ती विचार करत असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही पार्ट टाइम जॉब्स (Part Time Jobs After Retirement) सांगणार आहोत जे Retirement नंतर तुम्हाला करता येतील (How to start Career in Retirement) आणि यामुळे तुमच्या नव्या इनिंग्सची सुरुवात होईल. चला तर मग जाणून घेऊया.

ब्लॉगिंग

ब्लॉगिंग (Career in Blogging after Retirement) करण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक आवश्यकता किंवा प्रशिक्षणाची आवश्यकता नाही; विविध सामग्री व्यवस्थापन प्रणाली कशा वापरायच्या हे शिकण्यासाठी तुम्हाला फक्त शब्दांचा मार्ग आणि तंत्रज्ञानाची गरज असते. बहुतेक कन्टेन्ट ऑनलाइन वाचली जात असल्याने, ऑनलाइन साइट्ससाठी ब्लॉगिंग किंवा सामग्री लेखनाला आजकाल प्रचंड मागणी आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये प्रचंड पैसे कमवता येऊ शकतात.

जगभरातील टॅलेंटेड विद्यार्थ्यांसाठी UK नं उघडली नोकरीची दारं; सहज मिळणार Visa

ट्रॅव्हल गाईड

जर तुम्हाला फिरण्याची आणि नवनवीन ठिकाणे बघण्याची प्रचंड आवड असेल तर तुम्ही यालाच आपलं करिअर निवडू शकता. सेवानिवृत्तीनंतर तुम्ही ट्रॅव्हल कंपन्यांकडे काम करून ट्रॅव्हल गाईड (Travel guide career after Retirement) बनू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणे बघायला मिळतील आणि तुम्हाला भरघोस पैसेही मिळतील.

कन्सल्टन्ट

प्रोग्रॅमिंग, वेबसाइट डेव्हलपमेंट, फायनान्स आणि लिटिगेशनमधील प्रगत पदवी किंवा विशेष अनुभव असलेल्या सेवानिवृत्त व्यक्ती कन्सल्टंट (Consultant Jobs after Retirement) करिअरचा विचार करू शकतात. कारण संध्यच्या काळात कन्सल्टेशन प्रचंड ट्रेंडिंग करिअर आहे.विशेष म्हणजे कन्सल्टेशन करणाऱ्या व्यक्तींचा पगारही उत्तम आहे.

पालकांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना शिकवा व्यवहारातील या IMP गोष्टी

शिक्षक किंवा ट्यूटर

जे सेवानिवृत्त विद्यार्थ्यांसोबत काम करण्याचा आनंद घेतात त्यांना अध्यापन सहाय्यक किंवा ट्यूटर (Teachers and tutor jobs after Retirement) बनण्याचा चांगला चान्स मिळू शकतो. विद्यापीठे कधीकधी नाममात्र पगारावर शिकवणी सहाय्यकांना नियुक्त करतात. दुसरीकडे, शिक्षक स्वयंरोजगार किंवा मोठ्या संस्थेसह काम करू शकतात. कोर्सेरा, अनॅकॅडमी, खान अकादमी, बायजू इत्यादी सारख्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून तुम्ही तुमच्या घरीच आरामात शिकवू शकता. YouTube वर शिकवण्याचे व्हिडिओ अपलोड करणे हा देखील सध्याचा ट्रेंड आहे.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert