Home /News /career /

जगभरातील टॅलेंटेड विद्यार्थ्यांसाठी UK नं उघडली नोकरीची दारं; सहज मिळणार Visa आणि जॉब्स; वाचा सविस्तर

जगभरातील टॅलेंटेड विद्यार्थ्यांसाठी UK नं उघडली नोकरीची दारं; सहज मिळणार Visa आणि जॉब्स; वाचा सविस्तर

High Potential Individual (HPI) Visa असं या Visa ला नाव

High Potential Individual (HPI) Visa असं या Visa ला नाव

विविध देशातील टॅलेंटेड विद्यार्थ्यांना UK मध्ये येऊन शिक्षण (Higher Education in UK) घेण्यासाठी आणि नोकरी करण्यासाठीचा ,मार्ग अधिकच सुकर झाला आहे.

  मुंबई, 06 मे: UK म्हणजेच युनायटेड किंगडम (United Kingdom) मध्ये जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि जॉब (Jobs in UK) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर येतेय. UK नं विद्यार्थ्यांसाठी आणि जॉब सिकर्ससाठी एक नवीन Visa प्रोग्राम (New Visa Program of UK) जाहीर केला आहे. या प्रोग्राम अंतर्गत जगभरातील विविध देशातील टॅलेंटेड विद्यार्थ्यांना UK मध्ये येऊन शिक्षण (Higher Education in UK) घेण्यासाठी आणि नोकरी करण्यासाठीचा ,मार्ग अधिकच सुकर झाला आहे. या नवीन Visa प्रोग्राममध्ये नक्की कोणत्या तरतुदी आहे आणि त्यासाठी अप्लाय (How to apply for UK Visa) कसं करता येईल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. High Potential Individual (HPI) Visa असं या Visa ला नाव देण्यात आलं आहे. या अंतर्गत जगभरातील टॉप युनिव्हर्सिटीजच्या विद्यार्थ्यांना UK चा Visa दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या डिग्री लेव्हलनुसार विद्यार्थ्यांना हा Visa देण्यात येणार आहे. हा Visa किमान दोन ते तीन वर्षांचा असणार आहे अशी माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या Visa मुळे UK मधील कंपन्यांना जगभरातील टॉप स्किल्ड उमेदवारांना नोकरी देना शक्य होणार आहे. तसंच यासाठी कंपन्यांना कुठल्याही प्रकारची sponsorship fees भरावी लागणार नाहीये. ज्या उमेदवारांकडे हा Visa आहे अशा उमेदवारांना UK मधील कोणत्याही कंपनीत जॉब करण्याची संधी मिळणार आहे. याला म्हणतात जिद्द! भाजीविक्रेत्याची मुलगी झाली जज; आर्थिक परिस्थितीला दिली मात
  कोण करू शकेल Apply
  जभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीत किमान डिग्रीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तसंच ज्या उमेदवाराचं डिग्री किंवा त्यावरील शिक्षण हे मागील पाच वर्षांमध्ये पूर्ण झालंय असेच विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकणार आहे. 18 वर्ष वयाचे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे उमेदवार हे या पदभरतीसाठी पात्र असतील. उमेदवारांनी Gov.uk या वेबसाईटवर देण्यात आलेल्या लिस्टपैकी कोणत्याही युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलं असणं महत्त्वाचं आहे. असाही मिळेल Visa हा Visa मिळवण्यासाठी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं जॉब ऑफर लेटर असण्याची गरज नाही तसंच स्पॉन्सरशिप असण्याची गरज नाही उमेदवार हे self-employed किंवा volunteer म्हणून UK मध्ये जाऊन जॉब मिळवू शकतात. ज्या उमेदवारांकडे Visa आधीच आहे अशा उमेदवारांना हा Visa मिळू शकणार नाही. ज्या उमेदवारांची डिग्री इंग्लिश विषयात पूर्ण झाली नसेल तर अशा उमेदवारांना B1 परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक असेल. या Visa चं शुल्क हे £715 म्हणजे साधारणतः 68,000 भारतीय रुपायी इतकं असणार आहे. यासाठी तुम्हाला किमान £1270 इतके पैसे तुमच्या अकाउंटमध्ये दाखवणं महत्वाचं आहे. व्वा! नोकरीसोबत 'छोकरा-छोकरी'ही देते ही भारतीय कंपनी; लग्न करताच वाढते सॅलरी या Visa साठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांना Uk च्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे लागणार आहेत.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Education, England, Job, Jobs Exams, Visa, World news

  पुढील बातम्या