मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Career Tips: 'या' तीन क्षेत्रांमध्ये आहेत करिअर करण्याची सर्वात मोठी संधी; जाणून घ्या डिटेल्स

Career Tips: 'या' तीन क्षेत्रांमध्ये आहेत करिअर करण्याची सर्वात मोठी संधी; जाणून घ्या डिटेल्स

जाणून घ्या काही वाईट सवयी

जाणून घ्या काही वाईट सवयी

आज आम्ही तुम्हाला अशा 3 करिअर क्षेत्रांची (Top 3 trending fields for career) माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला उत्तम करिअरच्या संधी मिळू शकतील.

मुंबई, 02 नोव्हेंबर: आजकाल सर्वच विद्यार्थ्यांना आपलं करिअर वेगळ्या आणि नवीन क्षेत्रात (career in unique field) करायचं असतं. त्यांना असे कोर्स करायचे असतात ज्यांची फी आणि कालावधी कमीत कमी (Short term courses) आहे. तसंच या अभ्यासक्रमांनंतर त्यांना लवकरात लवकर चांगल्या पगाराची नोकरीही मिळायला हवी. इतकंच नाहीतर विद्यार्थ्यांना असं करिअर निवडायचं आहे, ज्यामध्ये त्यांची नवी ओळख होऊ शकेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा 3 करिअर क्षेत्रांची (Top 3 trending fields for career) माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला उत्तम करिअरच्या संधी मिळू शकतील. चला तर मग जाणून घेऊया.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence)

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात सातत्यानं प्रगती होत आहे. विशेषतः कोविड-19 नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप वेगानं वाढला आहे. आजकाल हे तंत्रज्ञान फोन किंवा कॉम्प्युटर, गुगल आणि अलेक्सा व्हॉईस असिस्टंटसह रोबोट सारखी उपकरणं उपलब्ध असलेल्या बुद्धिबळ सारख्या खेळांच्या स्वरूपात देखील उपलब्ध आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अशी यंत्रणा तयार केली जाऊ शकते, जी मानवी बुद्धिमत्तेच्या बरोबरीची असेल. या अल्गोरिदमद्वारे शिक्षण, ओळख, समस्या सोडवणं, भाषा, तार्किक तर्क इत्यादी सहज समजू शकतात. या तंत्रज्ञानावर अजूनही काम सुरू आहे, पण करिअर म्हणून ते एक उत्तम क्षेत्र म्हणून उदयास आलं आहे. या क्षेत्रात करिअर करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

AMC Recruitment: अकोला महानगरपालिका इथे विविध पदांसाठी जागा रिक्त

पब्लिक रिलेशन (Public Relations)

आजकाल प्रत्येक कंपनी आणि व्यक्तीला आपली प्रतिमा सुधारायची असते. पब्लिक रिलेशन ऑफिसर यासाठी काम करतात. कोणतीही कंपनी, सेलिब्रिटी, उद्योगपती, राजकारणी, समाजाशी संबंधित लोक, करोडपती इ. लोकांसमोर स्वत:ला चांगल्या प्रकारे प्रमोट करण्यासाठी पब्लिक रिलेशन्स प्रोफेशनल्सची नियुक्ती करतात. या क्षेत्रात उत्तम करिअरच्या संधी आहेत. थोड्या अनुभवानंतर अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये जनसंपर्क, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, कॉर्पोरेट अफेअर्स किंवा एक्सटर्नल अफेअर्स विभागात या क्षेत्रात चांगली नोकरी मिळू शकते.

फॉरेन लँग्वेज (Foreign Language)

जर तुमचं संवाद कौशल्य चांगलं असेल तर तुम्ही कोणतीही परदेशी भाषा शिकून उत्तम करिअर करू शकता. सध्या सर्व देश जागतिकीकरणाच्या टप्प्यातून जात असल्यानं एका देशातील लोक दुसऱ्या देशात जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. परदेशी भाषेच्या क्षेत्रात तुम्ही फ्रेंच, जर्मन, रशियन, जपानी, चायनीज आणि इंग्रजी या परदेशी भाषा शिकून उत्तम करिअर करू शकता. यानंतर, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भाषा तज्ञ, पर्यटक मार्गदर्शक आणि भाषा शिक्षक बनून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

First published:
top videos

    Tags: Career opportunities