जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / UPSCची तयारी कशी करावी? IAS होण्यासाठी तुमच्याकडे कोणती पदवी असणं गरजेचं?

UPSCची तयारी कशी करावी? IAS होण्यासाठी तुमच्याकडे कोणती पदवी असणं गरजेचं?

UPSC Exam

UPSC Exam

सध्याच्या परिस्थितीत इंजिनीअरिंगकडेदेखील अनेकांचा कल आहे. गेल्या काही वर्षांतील आयएएस टॉपर्सच्या यादीवर नजर टाकल्यास त्यात इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी वर्चस्व गाजवल्याचं स्पष्ट दिसतं.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 30 एप्रिल :   आपल्या गावातील किंवा ओळखीतील एखादी ‘अ‍ॅस्परन्ट’ व्यक्ती जर यूपीएससीसारखी स्पर्धा परीक्षा पास झाली तर आपल्याला तिचं फार कौतुक वाटतं. अशा व्यक्तीचे सत्कार समारंभ आयोजित केले जातात. तिचं गुणगाण केलं जातं. स्पर्धा परीक्षा पास झालेल्या मुला-मुलींना समाजात फार आदर मिळतो. या पदापर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतलेले असतात. असं म्हणतात की, स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी फक्त हुशार असून चालत नाही तर सातत्य, चिकाटी आणि खंबीर मनाची आवश्यकता असते. भारतात आयएएस अधिकारी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. भारतीय प्रशासकीय सेवा किंवा आयएएस ही नागरी सेवांची एक शाखा आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं (यूपीएससी) 2020 मध्ये आयएएस उमेदवारांसाठी 796 जागा ऑफर केल्या होत्या. दरवर्षी, साधारणपणे 180 जागा खुल्या असतात. जनतेच्या कल्याणासाठी तयार केलेल्या धोरणांची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याची, तसंच सर्व सरकारी निर्णय प्रक्रियेवर विचारपूर्वक सल्ला देऊन केंद्र आणि राज्य सरकारांना पाठिंबा देण्याची जबाबदारी आयएएस अधिकाऱ्यांवर असते. दुसर्‍या शब्दांत सांगायचं झाल्यास एक आयएएस अधिकारी प्रशासनातील धोरणं, त्यांची अंमलबजावणी आणि संबंधित मंत्रालयांना त्यांची स्थिती आणि प्रभाव यासंबंधी योग्य ती माहिती पुरवण्यात मदत करतो. हेही वाचा - Success Story : 2 Computer भाड्याने घेऊन सुरू केला व्यवसाय, आता अंकिता वर्षाला कमावते तब्बल 100 कोटी आयएएस होण्यासाठी कोणतं शिक्षण घ्यावं? आयएएस अधिकारी म्हणून करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी त्यांच्या हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात कोणत्याही शाखेतून शिक्षण घेऊ शकतात. सीबीएसई किंवा अन्य मान्यताप्राप्त बोर्डातून त्यांनी बारावी किंवा समतुल्य परीक्षा यशस्वीरीत्या पास केलेली असली पाहिजे. त्यांनी राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि तत्त्वज्ञानासारख्या विषयांचा अभ्यास केलेला असेल तरी आयएएस अधिकारी होता येतं. एखादी व्यक्ती डिप्लोमा पूर्ण केल्यानंतरही यूपीएससी परीक्षा देऊ शकते. यूपीएससी परीक्षा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक विशिष्ट महाविद्यालय किंवा युनिव्हर्सिटी दिली जाते. जेथे ते समुपदेशनाद्वारे आपलं उच्च शिक्षण सुरू ठेवू शकतात. इच्छुक आयएएस अधिकाऱ्यानं रेटिंगच्या दृष्टीने अव्वल महाविद्यालय निवडलं पाहिजे. त्यांचं यूजी किंवा पीजी स्तरावरील शिक्षण चांगल्या दर्जाच्या महाविद्यालयांमधून पूर्ण होणं आवश्यक आहे. कारण या शिक्षणाचा दीर्घकालीन प्रशासकीय सेवांवर परिणाम होतो. पात्रता निकष 1. उमेदवारांनी 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवणं गरजेचं आहे. कोणत्या शाखेतून पदवी मिळवायची यासाठी उमेदवारांकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 2. आयएएस अभ्यासक्रमाशी संरेखित असलेल्या विषयातील बीएची पदवी किंवा इतर कोणत्याही पदवी मिळवणं हे आयएएसच्या तयारीसाठी फायदेशीर ठरेल. 3. ज्यांनी पत्रव्यवहार किंवा दूरस्थ शिक्षणाद्वारे अंडरग्रॅज्युएट पदवी मिळवलेली आहे अशा व्यक्तींनादेखील आयएएस होण्यासाठी परीक्षा देता येते. जीएस इंटिग्रेटेड प्रोग्रॅमद्वारे, तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात तुम्ही यूपीएससी प्रीलिम्स आणि मुख्य परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या सामान्य अध्ययनाच्या विविध विषयांची तयारी करण्यात कमिटेड असलं पाहिजं. ही निवड महत्त्वपूर्ण आहे. कारण, पर्यायी विषयांचे दोन मुख्य पेपर असतात आणि हे पेपर उमेदवाराच्या एकूण गुणवत्तेत महत्त्वपूर्ण योगदान देतात. गेल्या काही वर्षांतील कल पाहिल्यास असं लक्षात येतं की, मेडिकल सायन्स या क्षेत्रात आयएएस परीक्षेच्या बाबतीत वारंवार सूट देण्यात आली आहे. वैद्यकीय पदवी असलेल्या आयएएस उमेदवारांची संख्या वाढत आहे आणि ते परीक्षेत चांगली कामगिरीही करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक पदवी प्राप्त केल्यानंतर काही लोक सरकारी संस्थांमध्ये नोकरी शोधतात, हे या मागील एक कारण आहे. फिजिकल सायन्स आणि मेडिकल सायन्सची पार्श्वभूमी असलेल्या यशस्वी अर्जदारांची संख्या वाढत आहे. हेही वाचा - अ‍ॅपल-इंडिया स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो? आवश्यक आहे ‘ही’ शैक्षणिक पात्रता सध्याच्या परिस्थितीत इंजिनीअरिंगकडेदेखील अनेकांचा कल आहे. गेल्या काही वर्षांतील आयएएस टॉपर्सच्या यादीवर नजर टाकल्यास त्यात इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी वर्चस्व गाजवल्याचं स्पष्ट दिसतं. असं असलं तरीही आयएएस परीक्षेसाठी इंजिनीअरिंग हा ऑप्शनल विषय म्हणून निवडणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या यशाचे प्रमाण अजूनही कमी आहे. ज्यांनी इंजिनीअरिंग हा मुख्य विषय घेऊन तयारी केली आहे त्यांनीच यशस्वी उमेदवारांच्या लिस्टमध्ये टॉप केलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर नागरी सेवा परीक्षेत यश मिळवायचं असेल तर इंजिनीअरिंग हे निःसंशयपणे चांगलं क्षेत्र ठरू शकतं. मानवतावादी विषयांना पूर्वीपासूनच नागरी सेवा परीक्षांचा आधारस्तंभ मानलं जातं. जर आपण यूपीएससीच्या वार्षिक अहवालांमधील डेटावर नजर टाकली, तर आपल्याला असं निदर्शनास येईल की इतरांच्या तुलनेत मानवतवादी विषय घेऊन परीक्षा देणाऱ्यांच्या यशाची टक्केवारी जास्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांनी मानवतावादी विषय घेऊन घवघवीत यश मिळवलेलं आहे. हा ट्रेंड असूनही गेल्या काही वर्षांमध्ये, ह्युमॅनिटी फाउंडेशन कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि यशाची टक्केवारी कमी होऊ लागली आहे. सायन्स स्ट्रीममधील लहान पण एकूण उमेदवारांच्या तुलनेत दखलपात्र असा गट सिव्हिल सर्व्हिसेस जॉइन करतो आणि काही काळानंतर ही नोकरी सोडून देतो. पण, वैज्ञानिक विचारांचा वाढता प्रभाव आणि नोकरशाही व्यवस्थेत टेक्नोक्रॅट्सची वाढती गरज लक्षात घेता या संख्येत हळूहळू सुधारणा होत असल्याचं दिसत आहे. यापैकी प्रत्येक पदवी विशिष्ट विषयातील तज्ज्ञ पदवी समजली जाते. परिणामी, तुलनेनं कमी लोक त्यांचा पाठपुरावा करतात. पण, गेल्या काही वर्षांत एमबीए आणि बीकॉमची पार्श्वभूमी असलेल्या अर्जदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रिझनिंग, सायन्स, ट्रान्सलेटिंग इन्फॉर्मेशन आणि फंडामेंटल लिडरशीप यावर लक्ष केंद्रित करणार्‍या सीसॅटची (CSAT) पार्श्वभूमी असलेल्या बी. कॉम आणि एमबीए शाखेतील विद्यार्थ्यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याबाबत विचार सुरू केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांच्या संख्येत आणि प्रगती गुणोत्तरात लक्षणीय बदल दिसण्याची शक्यता आहे. जे विद्यार्थी आयएएस होण्यासाठी परीक्षा देण्याची तयारी करत आहेत त्यांना हे माहित असणं गरजेचं आहे की, यश पूर्णपणे त्यांच्या तयारीवर आणि उत्साहावर अवलंबून असतं. म्हणून, प्रबळ इच्छा आणि यशाची भूक ही आयएएस परीक्षा उत्तीर्ण होण्याची गुरुकिल्ली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात