Home /News /career /

अब Bollywood दूर नहीं! अभिनयाच्या क्षेत्रात आहेत करिअरच्या मोठ्या संधी; पण कसं घ्याल शिक्षण? इथे मिळेल उत्तर

अब Bollywood दूर नहीं! अभिनयाच्या क्षेत्रात आहेत करिअरच्या मोठ्या संधी; पण कसं घ्याल शिक्षण? इथे मिळेल उत्तर

अभिनयाच्या क्षेत्रात करिअर

अभिनयाच्या क्षेत्रात करिअर

जर तुम्हालाही अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल तर ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे.

  मुंबई, 29 जून: अभिनय म्हंटलं की लगेच अनेकांच्या डोळ्यासमोर बॉलिवूड (Bollywood Career) आणि हॉलिवूड (Hollywood) येतं. अनेकांना अभिनयाच्या क्षेत्रात आपलं करिअर (Career in Acting) करण्याची इच्छा असते. काही लॊकांना या क्षेत्रात मिळणाऱ्या ग्लॅमरची, प्रसिद्धीची आणि पैशांची भूक असते तर काही लोक अक्षरशः अभिनय (How to make career in Acting) जगतात. म्हणूनच जर तुम्हालाही अभिनयाच्या क्षेत्रात करिअर  करण्याची इच्छा असेल तर ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. अभिनयात तेच लोक करिअर करू शकतात जे अभिनयाशिवाय राहू शकत नाहीत. आज अभिनय क्षेत्रात पैसा, ग्लॅमर आणि प्रसिद्धी हे सर्व काही आहे. आजच्या युगात टीव्ही इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इंडस्ट्री मानली जाते. यामध्ये करिअर करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, ज्यामध्ये ते पुढे करता येईल. तब्बल 2 लाखांवर पगार; मराठवाडा प्रशासकीय विभागात 'या' पदांसाठी मोठी भरती
  कोणता कोर्स करायचा
  चांगल्या अभिनय शाळेत प्रवेश घेण्यासाठी तुम्ही 12वी पास ते पदवीपर्यंत अर्ज करू शकता. अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर पीजी डिप्लोमा इन अॅक्टिंगचा दोन वर्षांचा कोर्स, तीन वर्षांचा अभिनय डिप्लोमा, सिनेमातील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाचा तीन वर्षांचा कोर्स आणि एक्टिंग फास्ट ट्रॅकचा सहा महिन्यांचा कोर्स. निवडू शकता. अभिनय क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. या संस्थेतील कमी जागांमुळे अत्यंत कठीण प्रवेश प्रक्रियेतून जावे लागते. Acting शिकण्याचे काही इस्न्टिट्यूट फिल्म इन्स्टिट्यूट पुणे सिटी पल्स इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन, गांधीनगर (गुजरात) सत्यजित रे फिल्म इन्स्टिट्यूट, कोलकाता नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्ली, एशियन अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन नोएडा, दिल्ली फिल्म इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली इंडियन अकादमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स, नवी दिल्ली. व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल भारतीय वायुसेनेकडून 'अग्निवीर'चा Syllabus आणि मॉडेल पेपर्स जारी; करा Download
  कसं असेल भविष्य
  जर तुमचा अभिनय चांगला असेल आणि तुम्ही तुमच्या कौशल्याला धार दिली असेल तर तुम्हाला आज नाही तर उद्या नक्कीच ब्रेक मिळेल. सुरुवातीला तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल. असो, सोने जितके जास्त गरम होईल तितका त्याचा रंग उजळ होतो. पण आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम सारख्या इतर प्लॅटफॉर्मच्या आगमनाने या उद्योगात शक्यता वाढल्या आहेत.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job

  पुढील बातम्या