मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मोठी बातमी! भारतीय वायुसेनेकडून अग्निवीर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स जारी; असे करा डाउनलोड

मोठी बातमी! भारतीय वायुसेनेकडून अग्निवीर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स जारी; असे करा डाउनलोड

 इंडियन एअर फोर्स तर्फे मॉडेल पेपर

इंडियन एअर फोर्स तर्फे मॉडेल पेपर

इंडियन एअर फोर्स तर्फे मॉडेल पेपर (IAF Agniveer syllabus 2022) जारी करण्यात आले आहेत. हे मॉडल पेपर्स डाउनलोड (How to download IAF Agniveer Model Papers) करता येणार आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 28 जून: अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाई दलात (Indian Air Force) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना आता सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू भरती प्रक्रिया-2022’ (IAF Agniveer Vayu Recruitment 2022) साठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक असलेले पात्र उमेदवार विविध पदांसाठी भारतीय हवाई दलाच्या careerindianairforce.cdac.in आणि agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटना भेट देऊन अर्ज करू शकतात. तसंच आता इंडियन एअर फोर्स तर्फे मॉडेल पेपर (IAF Agniveer syllabus 2022) जारी करण्यात आले आहेत. हे मॉडल पेपर्स डाउनलोड (How to download IAF Agniveer Model Papers) करता येणार आहेत. खालील पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. इच्छुक उमेदवार https://careerindianairforce.cdac.in/assets/joining या लिंकला क्लिक करून अधिकृत नोटिफिकेशन (Notification) तपासून पाहू शकतात. अग्निवीर वायू भरती प्रक्रिया-2022 अंतर्गत अनेक पदांची भरती केली जाणार आहे. JEE असो वा NEET कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करताना फॉलो करा या टिप्स काय असेल वयोमर्यादा अग्निवीर वायू भरती प्रक्रिया - 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना वयोमर्यादेची अट असणार आहे. यात 29 डिसेंबर 1999 आणि 29 जून 2005 या यादरम्यान जन्मतारीख असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. काय असेल पगार आणि सुविधा नोकरी मिळाल्यानंतर उमेदवारांना पहिल्या वर्षी दरमहा 30,000 रुपये पगार असेल. त्यात 21,000 रुपये इनहँड पगार (In hand Salary ) तर दरमहा 9,000 रुपये भारत सरकारच्या कॉर्पस फंडमध्ये (Corpus Fund) जमा होईल. दुसऱ्या वर्षी पगार दरमहा 33,000 रुपयांवर जाईल. त्यात 23,100 रुपये हातात मिळतील. तर 9,900 कॉर्पस फंडमध्ये जातील. तिसऱ्या वर्षी पगार दरमहा 36,500 असेल. यातील 25,550 रुपये हातात मिळतील आणि 10,950 रुपये कॉर्पस फंडमध्ये जाणार आहेत. चौथ्या वर्षी मासिक पगार दरमहा 40,000 रुपये असणार आहे. यातील 28,000 रुपयांची रक्कम हाती मिळेल आणि दरमहा 12,000 रुपये कॉर्पस फंडमध्ये जमा होणार आहेत. 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांनो रेडी राहा; मुंबईतील 'या' कॉलेजमध्ये बंपर भरती असे डाउनलोड करा मॉडेल पेपर्स सर्वप्रथम agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आता उमेदवार विभागात जा आणि ड्रॉप डाउन मेनू उघडा आता यादीतील Syllabus आणि Model Paper च्या पर्यायावर क्लिक करा आता नवीन पृष्ठावर विषय निवडा आता Syllabus आणि Model Paper ची PDF स्क्रीनवर ओपन होईल, ती डाउनलोड करा
First published:

Tags: Career, Job

पुढील बातम्या