जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / उमेदवारांनो, UPSC Prelims 2022ची तयारी करताय? एक महिन्यात अशा पद्धतीनं करा अभ्यास; व्हाल IAS

उमेदवारांनो, UPSC Prelims 2022ची तयारी करताय? एक महिन्यात अशा पद्धतीनं करा अभ्यास; व्हाल IAS

तुम्ही UPSC Prelims परीक्षा क्रॅक करू शकता

तुम्ही UPSC Prelims परीक्षा क्रॅक करू शकता

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे अवघ्या एका महिन्यात तुम्ही UPSC Prelims परीक्षा क्रॅक करू शकता. चला तर जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 मे: केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी सरकारी नोकऱ्यांसाठी अनेक परीक्षा घेते. यामध्ये UPSC परीक्षेचाही (UPSC Exam Strategy) समावेश आहे. यावर्षी UPSC प्रिलिम्स परीक्षा (UPSC Prelims 2022 date) 5 जून 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी लाखो उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रिलिम्स परीक्षा ही यूपीएससी परीक्षेचा (How to crack UPSC Prelims 2022) पहिला टप्पा आहे जी 3 टप्प्यात घेतली जाते. आता या परीक्षेला फारसा वेळ उरलेला नाही. अशा परिस्थितीत, UPSC प्रिलिम्स परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अंतिम रिव्हिजनवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. काही टिप्स (UPSC Exam Tips) जाणून घ्या, ज्याद्वारे तुम्ही UPSC प्रिलिम्स 2022 परीक्षेत तुमचे सर्वोत्तम देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे अवघ्या एका महिन्यात तुम्ही UPSC Prelims परीक्षा क्रॅक करू शकता. चला तर जाणून घेऊया. चुका करू नका तुम्ही जर एकदा UPSC परीक्षेला बसला असाल तर तुम्हाला पेपर आणि इतर गोष्टींची कल्पना आली असेल. त्यामुळे आता तुमच्या चुकांमधून धडा घ्या आणि त्यांची पुनरावृत्ती टाळा (UPSC Preparation Tips 2022). मॉक टेस्ट मध्ये झालेल्या चुकांकडे विशेष लक्ष द्या. जर तुम्ही तुमच्या चंगूकांमधून शिकलात तर पुन्हा ती चूक कधीच होणार नाही. Exam Tips: स्पर्धा परीक्षांची तयारी करताना टेन्शन घेऊ नका; ‘या’ टिप्समुळे एका प्रयत्नात क्रॅक होईल परीक्षा करंट अफेयर्स महत्त्वाचे यूपीएससी परीक्षेत करंट अफेयर्सची माहिती खूप उपयुक्त आहे. त्यामुळे रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावा. त्यात येणारा संपादकीय स्तंभ तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. तसेच, परीक्षेत पर्यायी विषय हुशारीने निवडा. ‘या’ टिप्स येतील कामी UPSC प्रिलिम्स परीक्षेचा अभ्यासक्रम नीट तपासा. तसेच तुमची अंतिम उजळणी अभ्यासक्रमानुसार करा. तुम्ही कव्हर केलेल्या विषयांवर टिक करत रहा. गेल्या एका आठवड्यात हे तुम्हाला खूप मदत करेल. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका तपासा आणि त्यांचा सराव करा. याच्या मदतीने परीक्षा पॅटर्न (UPSC Exam Pattern) चांगल्या प्रकारे समजू शकतो. तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि स्वतःवर अतिरिक्त दबाव टाकू नका. जास्त टेन्शन घेतल्याने परीक्षेतील तुमच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्समधून उजळणी केलीत तर बरे होईल. आता नवीन पुस्तके किंवा संदर्भ पुस्तकांवर लक्ष केंद्रित करू नका. तुम्हाला जो काही अभ्यास करायचा आहे तो फक्त NCERT च्या पुस्तकांमधून करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात