Home /News /career /

IT क्षेत्रात बॅक-एंड डेव्हलपर्सना आहे मोठी मागणी: तुम्हालाही करिअर करायचंय? मग इथे मिळेल संपूर्ण माहिती

IT क्षेत्रात बॅक-एंड डेव्हलपर्सना आहे मोठी मागणी: तुम्हालाही करिअर करायचंय? मग इथे मिळेल संपूर्ण माहिती

बॅकएंड डेव्हलपरची (Backend Developers) भूमिका किती महत्त्वाची असते ते आपण या लेखामध्ये सखोलपणे समजून घेऊ.

मुंबई, 19 जुलै: सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्स (Software Applications) हे आजच्या आधुनिक डिजिटल-फर्स्ट जगाचा ड्रायव्हिंग फोर्स बनले आहेत. दररोज, जगभरातले लाखो सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developers) मानवी जीवनाला मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी असंख्य उपकरणं, यंत्रसामग्री, ऑपरेटिंग सिस्टीम्स आणि वेब अ‍ॅप्लिकेशन्सची निर्मिती करतात, ती चालायला मदत करतात. जेव्हा आपण सॉफ्टवेअरचा विचार करतो, तेव्हा आपण मुख्यतः डोळ्यांना दिसणारा सुंदर लेआउट, वापरण्यास सोपी फंक्शन्स (Friendly Functions) व फीचर्स यांची मांडणी आणि ऑपरेशनची सुलभता यांबद्दल विचार करतो. सॉफ्टवेअरच्या मेंदूबद्दल म्हणेज ते कसं काम करतं याबाबत आपण क्वचितच विचार करतो. बॅक-एंड अल्गोरिदम (Back-end Algorithm), प्रक्रिया होत असलेला डेटा आणि ते औपचारिकपणे ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणून ओळखल्या जाणार्‍या यूआयशी कसे संवाद साधतात, या तीन घटकांचा समावेश सॉफ्टेवेअरच्या मेंदूमध्ये होतो. हे घटक सुरळीत सुरू राहावेत यासाठी कोण काम करतं? बॅकएंड डेव्हलपरची (Backend Developers) भूमिका किती महत्त्वाची असते ते आपण या लेखामध्ये सखोलपणे समजून घेऊ. बॅक-एंड डेव्हलपर हे ब्रेनस्टॉर्मिंग मास्टरमाइंड आहेत जे पडद्यामागे काम करतात आणि बऱ्याचदा त्यांची दखल घेतली जात नाही. फ्रंट-एंड डेव्हलपर्ससोबत काम करून, बॅक-एंड डेव्हलपर फंक्शनॅलिटी कोड (Functionality Code) लिहितात आणि वापरकर्त्यांनी न पाहिलेल्या तंत्रज्ञानाला लॉजिक देतात. उदाहरण : स्क्रीनवर बटण आहे का आणि ते ट्रिगर झाल्यास काय करील हे तेच शोधतात. पदवी प्रवेशासाठीच्या कट-ऑफ स्कोअरमध्ये मोठी घट, मुंबईतील मेरिट लिस्ट जाहीर तंत्रज्ञानातल्या (Technology) प्रगतीमुळे जगातल्या बहुतांश गोष्टी ऑनलाइन होत आहेत. त्यामुळे बॅक-एंड डेव्हलपर्सची मागणी फार वाढली आहे. जागतिक स्तरावर सर्वाधिक हव्या असलेल्या नोकऱ्यांपैकी एक म्हणून बॅक-एंड डेव्हलपमेंट सेक्टरकडे बघितलं जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नोकर्‍या आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांसाठी त्यावर सर्वांत जास्त लक्ष केंद्रित होईल. बॅक-एंड डेव्हलपर का व्हावं? - सर्व उद्योगांमधल्या संस्था-संघटनांनी जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षांची पूर्तता करणं, तंत्रज्ञानासह त्यांची अंतर्गत प्रणाली मजबूत करणं यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना प्रचंड मागणी आहे. कोड लिहिणं, अ‍ॅप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस (API) व्यवस्थापित करणं आणि बॅक-एंड अ‍ॅप्लिकेशन्स डीबग करण्यासह संपूर्ण सॉफ्टवेअर फ्रेमवर्क तयार करण्याचं काम बॅक-एंड डेव्हलपर करतात. बॅक-एंड कोड तयार करण्यासाठी ते जावा (Java), पायथन (Python) आणि पीएचपी (PHP) यांसारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा (Programming Languages) वापर करतात. जेव्हा वापरकर्ता एखादी विशिष्ट क्रिया ट्रिगर करतो तेव्हा वेब किंवा अ‍ॅप कसा प्रतिसाद देईल, याचं व्यवस्थापन करण्याचं काम हे डेव्हलपर्स करतात. बॅक-एंड डेव्हलपर्सशिवाय, वेब आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या क्षेत्राची कल्पनाही करता येणार नाही. बॅक-एंड डेव्हलपर्सना सर्वाधिक मागणी कुठे आहे? बॅकएंड डेव्हलपर्सना मायक्रोसॉफ्ट (Microsoft), गुगल (Google), अ‍ॅपल यांसारख्या (Apple) आयटीतल्या दिग्गज कंपन्यांपासून ते लहान आणि मध्यम आकाराच्या संस्थांपर्यंत कोणत्याही सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये कमालीची मागणी आहे. वेब आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे सध्याच्या डिजिटल जगामध्ये केंद्रस्थानी असल्यानं, बॅक-एंड डेव्हलपर्सना सर्व उद्योगांमध्ये मागणी आहे. आयटी, फायनान्स, हेल्थकेअर, रिटेल आदी क्षेत्रांत त्यांना चांगलं वेतन दिलं जातं. भारतात बॅक-एंड डेव्हलपर्सना साधारण 8 लाख रुपयांचं पॅकेज दिलं जातं. दोन वर्षांचा अनुभव असलेल्या बॅक-एंड डेव्हलपर्सना साधारणतः 6 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज दिलं जातं. शिवाय, चीन, यूएसए, जर्मनी, रशिया, भारत आणि फ्रान्स यांसारख्या जगातल्या आघाडीच्या टेक कंट्रीजमध्ये बॅक-एंड डेव्हलपर्सना जास्त मागणी आहे. संपूर्ण आयटी कर्मचारी इंडस्ट्री आणि आयटीईएस फर्म्स, (ITES Firms) ज्या अविकसित देशांना टेक्नॉलॉजी आउटसोर्स (Technology Outsource) करतात, ते केवळ आर्थिक फायद्यासाठीच नाही, तर भारतातल्या चांगल्या टॅलेंटला मागणी मिळेल यासाठीही प्रयत्न करतात. बॅक- एंड डेव्हलपर्सच्या नोकऱ्यांसाठी कोण पात्र होऊ शकतं? कम्प्युटर सायन्सची (Computer Science) पार्श्वभूमी, तंत्रज्ञानाची आवड असलेले आणि प्रोग्रामिंगमध्ये स्वारस्य असलेल्यांसाठी बॅक-एंड डेव्हलपमेंट हा एक उत्कृष्ट करिअर मार्ग ठरू शकतो. याशिवाय, तंत्रज्ञानाची आवड असलेली कोणतीही व्यक्ती कोणत्याही दिवशी या क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रयत्न करू शकते. एक चांगला बॅक-एंड प्रोग्रामर कोडिंग लँग्वेज, डेटाबेस आणि डेटाबेस कॅशिंगमध्ये पारंगत असणं आवश्यक आहे. शिवाय, बॅक-एंड डेव्हलपर म्हणून, एखाद्याला प्रॉडक्शन वेब सर्व्हर तंत्रज्ञान आणि अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसची (Application Programming Interfaces) माहिती असणं आवश्यक आहे. व्यावसायिक बॅक-एंड डेव्हलपर होण्यासाठी अल्गोरिदम (Algorithms) आणि डेटा स्ट्रक्चर्सचं (Data Structures) ज्ञानदेखील आवश्यक आहे. ज्यांना इच्छा आहे ते बॅक-एंड डेव्हलपमेंट शिकण्यासाठी अभ्यासक्रमाची निवड करू शकतात. विनामूल्य प्रशिक्षणासाठी भरपूर ऑनलाइन संसाधनंही उपलब्ध आहेत. स्प्रिंगसारखं जावा फ्रेमवर्क, जँगो (Django) आणि एएसपी डॉट नेटसारखं पायथन फ्रेमवर्क, रुबी ऑन रेल इत्यादी बॅक-एंड भाषा शिकण्याची आम्ही शिफारस करतो. IT क्षेत्रात DevOps आणि API ला आहे प्रचंड मागणी; यात करिअर कराल तर लाईफ सेट
बॅक-एंड डेव्हलपमेंटसाठी आवश्यक प्रशिक्षण आणि कौशल्यं
बॅक-एंड डेव्हलपमेंटमधल्या चांगल्या करिअरचा रोडमॅप तीन सर्वांत जास्त मागणी असलेल्या प्रोग्रामिंग भाषांच्या कौशल्यापासून सुरू होतो. जावा, पायथन आणि पीएचपी या लँग्वेजेस महत्त्वाच्या आहेत. बॅक-एंड डेव्हलपरने या भाषांपैकी एका भाषेवर चांगलं प्रभुत्व मिळवल्यानंतर त्यांनी एचटीएमल (HTML), सीएसएस (CSS) आणि जावास्क्रिप्ट (JavaScript) यांसारख्या प्राथमिक फ्रंट-एंड भाषा शिकल्या पाहिजेत. बॅक-एंड फ्रेमवर्क हा प्रोग्राम किंवा अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही भाषेचा कणा असतो. त्यामुळे बॅक-एंड डेव्हलपरने फ्रेमवर्कमधली कौशल्यं वाढवणंदेखील आवश्यक आहे. NodeJs, ExpressJs आणि Django ही काही सर्वांत चांगली आणि लोकप्रिय फ्रेमवर्क्स आहेत जिथे बॅकएंड डेव्हलपर्सनी त्यांच्या प्रोग्रॅमिंग कौशल्याचा वापर केला पाहिजे. वेगवेगळ्या डेटाबेसमधल्या कोडमधल्या बदलांचा मागोवा घेण्यासाठी GitHub आणि GitLab यांसारख्या नियंत्रण प्रणालींच्या विविध व्हर्जन्सचं संपूर्ण ज्ञान आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, एखाद्या प्रकल्पावर काम करताना, बॅक-एंड डेव्हलपरकडे डेटाबेस, अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) आणि सर्व्हर हाताळणीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. JSON, SOAP, REST आणि GSON हे बॅक-एंड डेव्हलपर्समधले काही सर्वांत लोकप्रिय एपीआय आहेत. हे तंत्रज्ञान आणि फ्रेमवर्क्सच्या एक्स्पोजरमुळे इच्छुकांना सॉफ्टवेअर किंवा वेब अ‍ॅप्लिकेशनची उद्दिष्टं समजण्यास आणि प्रभावी उपाय तयार करण्यास मदत होईल. भविष्यातल्या संधी सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाने सर्व उद्योग आणि कार्यक्षेत्रांमध्ये प्रवेश करणं सुरू ठेवल्याने, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेव्हलपर्सचं भविष्य खूप उज्ज्वल दिसत आहे. ऑनलाइन टूल्स, ट्युटोरियल्स आणि शिकवणी वर्गांच्या प्रसारामुळे या क्षेत्रात येण्यास इच्छुक असलेल्या व्यक्ती अनुभवी तज्ज्ञांकडून शिकू शकतात आणि त्यांची कौशल्यं सुधारू शकतात. शिवाय, जगभरातल्या संस्थांमध्ये कंत्राटी नोकर्‍या आणि रिमोट स्टाफिंगची संस्कृती रुजत असल्यामुळे बॅक-एंड डेव्हलपर्स घरी राहूनदेखील जगातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करू शकतात. ही माहिती आपल्यापर्यंत पियुष राज यांनी आणली आहे. डिजीटल उत्पादने, BFSI, रिटेल आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 14+ वर्षांचा उद्योग अनुभव असलेले अनुभवी एंटरप्राइझ-सेल्स व्यावसायिक उद्योजक आहेत. त्यांनी Bridgentech.com ची सह-स्थापना केली आणि त्याच्या बूटस्ट्रॅप्ड स्टार्ट-अपसह $2.5M+ च्या उत्कृष्ट ARR सह एक मजबूत टीम तयार केली आहे. ते MIT, मणिपाल (मेकॅनिकल इंजिनीअरिंग), SPJIMR, मुंबई (MBA), ESB Reutlingen, जर्मनी आणि TU म्युनिक, जर्मनी यांसारख्या भारतातील प्रमुख संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी जगभर प्रवास केला आहे, प्रामुख्याने पश्चिम युरोप, यूएस आणि भारतीय उपखंडातील बाजारपेठांमध्ये काम केले आहे. तसंच त्यांनी व्यवसाय वाढ आणि यशाच्या दिशेने संघ तयार केले, व्यवस्थापित केले आणि त्यांचे नेतृत्व केले आणि गुंतवणुकीच्या नवीन कल्पना आणि व्यवसाय योजनांमध्ये नेहमीच रस असतो. त्याच्या छंदांमध्ये UI/UX डिझाइन, व्यवसाय नियोजन, संगीत, प्रशिक्षण आणि धोरण यांचा समावेश आहे
First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Technology

पुढील बातम्या