Home /News /career /

पदवी प्रवेशासाठीच्या कट-ऑफ स्कोअरमध्ये मोठी घट, मुंबईतील मेरिट लिस्ट जाहीर

पदवी प्रवेशासाठीच्या कट-ऑफ स्कोअरमध्ये मोठी घट, मुंबईतील मेरिट लिस्ट जाहीर

या गुणांचा परिणाम कॉलेजच्या पदवी प्रवेशासाठीच्या मेरिट लिस्टच्या (Merit List) कट-ऑफवरही झाला आहे.

या गुणांचा परिणाम कॉलेजच्या पदवी प्रवेशासाठीच्या मेरिट लिस्टच्या (Merit List) कट-ऑफवरही झाला आहे.

या गुणांचा परिणाम कॉलेजच्या पदवी प्रवेशासाठीच्या मेरिट लिस्टच्या (Merit List) कट-ऑफवरही झाला आहे.

    मुंबई, ३० जून : गेल्या वर्षी राज्यात कोरोनामुळे (Corona) बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली होती आणि परीक्षेशिवाय आधीच्या शाळा-कॉलेजातील मूल्यमापनावर आधारित निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे गुणांची टक्केवारी वाढली होती. यंदा मात्र, दोन वर्ष ऑनलाइन शिकल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा (Offline Exam) दिली आणि त्याचा गुणांवर परिणाम झाला. या गुणांचा परिणाम कॉलेजच्या पदवी प्रवेशासाठीच्या मेरिट लिस्टच्या (Merit List) कट-ऑफवरही झाला आहे. मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) यापूर्वी जारी केलेल्या प्रवेशाच्या वेळापत्रकाचे पालन करत शहरातील बहुतांश महाविद्यालयांनी पदवी प्रवेशासाठीची पहिली मेरिट लिस्ट (merit list for degree admissions) बुधवारी (29 जून 22) जाहीर केली. यामध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले सरासरी गुण जास्त आहेत; पण तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व महाविद्यालयांमधील कट-ऑफ स्कोअरमध्ये मोठी घट झाली आहे. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) अभ्यासक्रमासाठी, पहिल्या मेरिट लिस्टमधील कट-ऑफ स्कोअर 92 टक्के आहे. हा स्कोअर गेल्या वर्षी 98 टक्के होता. तर बीएससी (Biological) आणि बीएससी ( Non-Biological) चा कट-ऑफ स्कोअर अनुक्रमे 82.33 टक्के आणि 82.17 टक्के आहे. गेल्या वर्षी या दोन्हीचा स्कोअर 92 टक्के होता. यंदा या टक्केवारीत जवळपास 10 टक्क्यांनी घट झाली आहे. तर, डी. जी. रूपारेल कॉलेज (D G Ruparel College), रामनारायण रुईया कॉलेज (Ramnarain Ruia College), विल्सन कॉलेज (Wilson College) आणि आर. ए. पोद्दार कॉलेज (R A Podar College) यासारख्या शहरातील इतर महाविद्यालयांमध्येही हीच परिस्थिती आहे. या संदर्भात इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिलंय. रुईया कॉलेजमध्ये बीए अभ्यासक्रमासाठी पहिल्या मेरिट लिस्टमधील कट-ऑफ स्कोअर गेल्या वर्षीच्या 96.2 टक्क्यांवरून 89.33 टक्क्यांवर घसरला आहे. तर, कॉमर्स अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या पोद्दार कॉलेजमध्ये बीकॉम कट ऑफ गेल्या वर्षीच्या 96.6 टक्क्यांवरून यंदा 92.33 वर घसरला आहे. “कट ऑफ स्कोअर कमी होण्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्णांची टक्केवारी कमी आहे. त्याशिवाय, ICSE आणि CBSE बोर्डांच्या विद्यार्थ्यांना निकाल अद्याप न लागल्याने ते या मेरिट लिस्टमधेच नाहीत. त्यामुळे इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यावर प्रवेशाच्या नंतरच्या टप्प्यावर घोषित केल्या जाणाऱ्या याद्यांमधील कट-ऑफ स्कोअरमध्ये वाढ होऊ शकते,” असं रुईया कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अनुश्री लोकूर यांनी सांगितलं. दुसरीकडे आर. ए. पोद्दार कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शोभना वासुदेवन म्हणाल्या, “यानंतर घोषित होणाऱ्या गुणवत्ता यादीच्या कट ऑफचा अंदाज आताच बांधणं कठीण आहे. गेल्या वर्षी या दोन्ही बोर्डांनी परीक्षा न घेता निकाल जाहीर केला होता. त्यामुळे त्यांचा यंदाचा एकूण निकाल काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण तेच भविष्यातील मेरिट लिस्टमधील कट-ऑफ स्कोअर ठरवू शकतील,” या वर्षी बारावीच्या परीक्षेची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 94.22 टक्के होती. हीच गेल्या वर्षी 99.63 टक्के होती. त्यामुळे यंदा टक्केवारीत मोठी घट झाली आहे. तसंच 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थांच्या संख्येत तर लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी तब्बल 91,420 विद्यार्थ्यांना 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळाले होते. मात्र, यंदा ही संख्या फक्त 10,040 आहे. दरम्यान, ICSE आणि CBSE बोर्डांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे काही महाविद्यालयांनी या बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी ठराविक जागा राखीव ठेवल्या आहेत.
    First published:

    पुढील बातम्या