मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

आयटी कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना किती पगार मिळतो? कोणती कंपनी देते सर्वांत मोठं स्टार्टिंग पॅकेज?

आयटी कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना किती पगार मिळतो? कोणती कंपनी देते सर्वांत मोठं स्टार्टिंग पॅकेज?

Success

Success

भारतातल्या मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असणाऱ्या टीसीएसमध्ये (TCS fresher's average annual salary) फ्रेशर्सना कमीत कमी 1,82,970 रुपये ते जास्तीत जास्त 6,45,044 रुपये एवढा वार्षिक पगार दिला जातो.

मुंबई, 3 डिसेंबर : सध्या आयटी सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात भरती सुरू झाली आहे. TCS, Infosys, Wipro अशा मोठमोठ्या कंपन्या फ्रेशर्सना चांगली संधी देत आहेत. मोठमोठ्या आयटी कंपन्यांच्या सीईओंचे पगार आपण बातम्यांमधून वाचत असतो. सीईओंचे कित्येक कोटी रुपयांचे असलेले पगार पाहून, त्या कंपनीत फ्रेशर्सना किती पगार दिला जात असेल (IT freshers average salary) हा प्रश्न कदाचित तुम्हालाही पडला असेल. त्यामुळेच भारतातल्या काही अग्रगण्य आयटी कंपन्यांमध्ये सुरुवातीला किती पगार दिला जातो, याची माहिती इथे देत आहोत. 'टाइम्स जॉब्ज'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

प्रत्येक कंपनीचे एखाद्या व्यक्तीला कामावर घेण्यासाठीचे आणि त्याचा पगार निश्चित करण्याचे निकष वेगवेगळे असतात. याच्या आधारे एकाच कंपनीत वेगवेगळ्या पदावरच्या फ्रेशर्सचा पगारही वेगवेगळा असू शकतो. ही यादी 'जॉबबझ' या एम्प्लॉयर रेटिंग अँड रिव्ह्यू पोर्टलवरच्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे.

भारतातल्या मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असणाऱ्या टीसीएसमध्ये (TCS fresher's average annual salary) फ्रेशर्सना कमीत कमी 1,82,970 रुपये ते जास्तीत जास्त 6,45,044 रुपये एवढा वार्षिक पगार दिला जातो. म्हणजेच, एखाद्या नव्या सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा प्रोग्रामरचा टीसीएसमधला सरासरी वार्षिक पगार हा 3,78,114 रुपये एवढा आहे. देशातल्या इतर आयटी कंपन्यांमध्येही वर्षाला सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंतच पगार दिला जातो.

Paytm ला पहिल्यांदा एखाद्या ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईज किती?

विप्रो (Wipro) या आणखी एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये नव्याने जॉइन होणाऱ्या सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना कमीत कमी 1,65,068 रुपये, ते जास्तीत जास्त 5,73,637 रुपये एवढा वार्षिक पगार देतात. विप्रोमधल्या फ्रेशर्सचा सरासरी वार्षिक पगार (Wipro freshers annual salary) 3,29,533 रुपये आहे. टेक महिंद्रा (Tech Mahindra) आणि एचसीएल (HCL) या कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना अनुक्रमे 3,33,568 रुपये आणि 3,30,751 रुपये एवढा सरासरी वार्षिक पगार देण्यात येतो.

नॉन इंडियन आयटी कंपन्यांबाबत बोलायचं झाल्यास, कॅपजेमिनी, कॉग्निझंट आणि अॅक्सेंचर या तीनही कंपन्यांमधल्या फ्रेशर्सचा सरासरी वार्षिक पगार साडेतीन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. यामध्ये कॉग्निझंट (Cognizant freshers package) सगळ्यात कमी म्हणजेच 3,61,212 रुपये वार्षिक पगार देते, तर कॅपजेमिनीमध्ये (Capgemini freshers package) सर्वांत जास्त म्हणजेच 3,92,554 रुपये एवढा सरासरी वार्षिक पगार मिळू शकतो. अॅक्सेंचरमध्ये (Accenture freshers package) फ्रेशर्सना मिळणारा सरासरी वार्षिक पगार 3,83,673 रुपये आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सहज उपलब्ध होणार कर्ज, SBI ची Adani Capital शी हातमिळवणी

दरम्यान, भारतात फ्रेशर्सना सर्वाधिक वार्षिक पगार देणारी कंपनी इन्फोसिस (Infosys freshers salary) असल्याचं समोर आलं आहे. या कंपनीत नव्याने जॉइन झालेल्यांना कमीत कमी 2,07,805 रुपये, तर जास्तीत जास्त 6,95,277 रुपये वार्षिक पगार देण्यात येतो. म्हणजेच इन्फोसिसमधल्या फ्रेशर्सना सुमारे 4,14,090 एवढा वार्षिक पगार मिळू शकतो.

तुम्ही जर नुकतेच ग्रॅज्युएट झाला असाल आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर या यादीनुसार तुम्ही कोणत्या कंपनीला प्राधान्य द्यायचं हे निश्चित करू शकाल.

First published:

Tags: Job, Money