Home /News /lifestyle /

क्या बात है! नोकरीसोबत 'छोकरा-छोकरी'ही देते ही भारतीय कंपनी; लग्न करताच वाढते Salary

क्या बात है! नोकरीसोबत 'छोकरा-छोकरी'ही देते ही भारतीय कंपनी; लग्न करताच वाढते Salary

भारतातील ही कंपनी कर्मचाऱ्यांना जॉबसोबत मॅचमेकिंग सर्व्हिसही देते.

    चेन्नई, 05 मे : लग्नासाठी वधू-वर शोधताना एक अपेक्षा सामान्य असते ती म्हणजे चांगली नोकरी असावी. त्यामुळे जोपर्यंत चांगली नोकरी मिळत नाही तोपर्यंत बरेच लोक लग्नाचा विचार करत नाही. आधी नोकरी नंतर छोकरी असंच त्यांनी ठरवलेलं असतं. पण आता टेन्शन सोडा कारण भारतात अशी एक कंपनी आहे जी नोकरीसोबत छोकरीही देते. म्हणजे जॉबसोबत ही कंपनी मॅचमेकिंगची सर्व्हिसही देते (IT firm offers matchmaking services). इतकंच नव्हे तर शोधलेल्या जोडीदारासोबत लग्न केल्यानंतर लगेच पगारवाढही दिली जाते (IT firm offers employees salary hike after marriage). तामिळनाडूतील एका आयटी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसह त्यांच्या कुटुंबाचीही जबाबदारी स्वीकारली आहे. विवाहित कर्मचाऱ्यांना जोडीदार शोधून देण्यास त्यांचा संसार उभा करण्याची जबाबदारी ही कंपनी घेते आहे. या कंपनीचं नाव आहे श्री मुकंबिका इन्फोसोल्युश. ही ग्लोबल टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रोव्हाइडर कंपनी आपल्या मदुराई ब्रांचमधील कर्मचाऱ्यांना ही खास सुविधा देते आहे. हे वाचा - लग्नाआधी होणाऱ्या नवऱ्याने केली भलतीच डिमांड; महिलेने सोशल मीडियावरच मागितली मदत टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार कंपनीचे सीईओ सेल्वागणेश यांच्या मते, ते आपले पैसे आणि वेळ कर्मचाऱ्यांसोबत बाँड तयार करण्यात लावतात. कंपनीची सर्वात मोठी ताकद आहेत ते कर्मचारी आणि त्यांना सुविधा देण्यावर ते विश्वास ठेवतात. सुरुवातीला कर्मचारी हायर करण्यात अडचणी झाल्या. पण जेव्हा कर्मचाऱ्यांना सुविधा मिळू लागल्या तेव्हा त्यांचं परफॉर्मन्सही चांगली झालं. कर्मचारी त्यांना मोठ्या भावाप्रमाणे मानतात. कित्येकांचे आईवडिल गावात राहतात आणि लग्नासाठी जोडीदार शोधण्यात त्यांना अडचणी येतात. त्यामुळे अलयान्स मेकर्स नेटवर्कमार्फत ते अशा कर्मचाऱ्यांची वधू-वर शोधण्यात मदत करतात. सर्व कर्मचारी एकत्र लग्नाला जातात.  कंपनीत दर सहा महिन्यांनी 6-8 टक्के पगारवाढ केली जाते. पण लग्न होताच कर्मचाऱ्यांची सॅलरी वाढवण्याची पॉलिसीही कंपनीची आहे. हे वाचा - कुणी धरले हात, कुणी धरले पाय आणि...; हळदीत मित्रांनी नवरीबाईसोबत केली नको ती मस्ती; VIDEO VIRAL जुन्या कर्मचाऱ्यांची ते जास्त काळजी घेतात जेणेकरून ते कंपनी सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाही. जर काही समस्या झाली तर ते थेट सीईओकडे जातात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Career, Job, Viral, Viral videos

    पुढील बातम्या