जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / याला म्हणतात जिद्द! आर्थिक परिस्थितीसमोर मानली नाही हार; भाजीविक्रेत्याची मुलगी झाली जज

याला म्हणतात जिद्द! आर्थिक परिस्थितीसमोर मानली नाही हार; भाजीविक्रेत्याची मुलगी झाली जज

आर्थिक परिस्थितीवर मात करत दिवाणी न्यायधीश पदाची परीक्षा पास

आर्थिक परिस्थितीवर मात करत दिवाणी न्यायधीश पदाची परीक्षा पास

मध्यप्रदेशातील इंदौर इथे राहणाऱ्या अंकिताने केवळ स्वतःच्या कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण इंदौरची मान उंचावली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 मे: अत्यंत वाईट आर्थिक परिस्थितीसमोर हार न मानता यशाची शिखरं गाठणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांबाबत आपण आतापर्यंत ऐकलं असेल. त्यांच्या यशोगाथाही (Success Stories) वाचा असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला जिच्याबद्दल सांगणार आहोत, तिचा संघर्षमय प्रवास वाचून तुमच्याही डोळ्यांत पाणी (Heart Touching Success Stories) आल्याशिवाय राहणार नाही. अंकिता नागर (Success Story of Ankita Nagar) तिचं नाव. मध्यप्रदेशातील इंदौर इथे राहणाऱ्या अंकिताने केवळ स्वतःच्या कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण इंदौरची मान उंचावली आहे. अंकिताने आर्थिक परिस्थितीवर मात करत दिवाणी न्यायधीश पदाची परीक्षा पास केली आहे. अंकिताचे वडील हे इंदौरमध्येच भाजी विकतात तर तिची आईसुद्धा त्यांना मदत करते. अंकिता नागरने दिवाणी न्यायाधीश परीक्षेत SC कोट्यातून 5 वा क्रमांक मिळवला आहे. तिनं सांगितल की, कुटुंबातील सर्व सदस्य भाजीविक्रीचे काम करतात. वडील पहाटे पाच वाजता उठतात आणि मंडीला जातात. आई सकाळी आठ वाजता सगळ्यांसाठी जेवण बनवते आणि भाजीच्या गाडीवर जाते, मग दोघी भाजी विकतात. मोठा भाऊ आकाश वाळू बाजारात मजुरीचे काम करतो. धाकट्या बहिणीचे लग्न झाले आहे. असं असूनही अंकिताने मिळवलेलं यश कौतुकास्पद आहे. तरुणांनो, घरातील बिकट आर्थिक स्थितीचा करा सामना; ‘हे’ जॉब्स देतील पैसे

भाजीच्या गाडीवर दिली आनंदाची बातमी

दिवाणी न्यायधीश परीक्षेचा निकाल आठवडाभरापूर्वी जाहीर झाला होता, पण कुटुंबातील मृत्यूमुळे तिच्या कुटुंबातील सर्वजण इंदूरच्या बाहेर होते. घरात उदास वातावरण होते. त्यामुळे अंकिताने लगेच कोणालाही निकाल जाहीर झाल्याची बातमी दिली नाही. मात्र काही दिवसांनंतर अंकिताने थेट भाजीच्या गाडीवर जाऊन आईला जज झाल्याबद्दल माहिती दिली. असे घेतले परिश्रम दैनिक भास्करनं दिलेल्या माहितीनुसार, अंकिताने ला सांगितले की, ती अभ्यासासाठी दिवसातून 8 तास देत असे. संध्याकाळी गाडीत गर्दी झाली की ती भाजी विकायला जायची. रात्री दहा वाजता ते दुकान बंद करून घरी यायचे. मग ती रात्री अकरा वाजल्यापासून अभ्यासाला बसायची. म्हणून सर्वप्रथम आईला दिली बातमी कॉलेजची फी भरण्यासाठी वडील कर्ज काढायचे. कॉलेज संपल्यानंतर ती सतत दिवाणी न्यायाधीशपदाच्या तयारीत गुंतली होती. दोनदा निवड न झाल्यानेही पालक प्रोत्साहन देत राहिले. हेच कारण आहे की आज निकाल लागताच सगळ्यात आधी मी आईला गोड बातमी दिली असं अंकिता सांगते. Engineer उमेदवारांनो, MahaTransco मध्ये तब्बल 223 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा

पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशा परिस्थितीत अंकिताच्या अभ्यासासाठी आम्हाला अनेक वेळा कर्ज घ्यावे लागले पण तिचा अभ्यास थांबू दिला नाही. अंकिताची आई लक्ष्मी यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीच्या न्यायाधीश झाल्याची बातमी ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. खूप वेळ अश्रू थांबले नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात