जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / खूशखबर! ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा; जाणून घ्या

खूशखबर! ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा; जाणून घ्या

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra budget 2021) सादर केला आहे. यामध्ये जागतिक महिला दिनाच्या (Women’s Day) निमित्ताने ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी भरघोस घोषणा केल्या आहेत. जाणून घ्या महत्त्वाच्या पाच घोषणा…

01
News18 Lokmat

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra budget 2021) सादर केला आहे. यामध्ये जागतिक महिला दिनाच्या (Women's Day) निमित्ताने ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी भरघोस घोषणा केल्या आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

अजित पवारांनी राज्यातील महिलांसाठी 'राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजने'ची घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी 01 एप्रिल 2021 पासून महिलेच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या महसुलामध्ये 1000 कोटींची तूट येण्याची शक्यता आहे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी प्रवास सवलत योजना - राज्यातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिंनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही राज्यव्यापी योजना आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

तर शहरी भागातील महिलांसाठी 'तेजस्विनी योजना' जाहीर करण्यात आली आहे. मोठया शहरातील महिलांच्या सुलभ व सुरक्षित प्रवासासाठी “तेजस्विनी योजने” अंतर्गत आणखी विशेष महिला बस उपलब्ध करुन देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

महिला व बाल सशक्तीकरण योजना - महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 3 टक्के नियतव्यय राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून प्रत्येक वर्षी किमान 300 कोटी रुपये नियतव्यय उपलब्ध होणार आहेत. त्याचंबरोबर महिला आणि बालांवर अत्याचार प्रकरणाचा निकाल लवकर लागावेत. यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टांच्या निर्मितीसाठी 103 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने राज्य राखीव पोलीस दलात 'स्वतंत्र महिला गट' स्थापन करण्याची घोषणाही अजित पवारांनी केली आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

यासोबतच आतापर्यंत असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनाही राज्यसरकारने दिलासा दिला आहे. संत जनाबाई सामाजिक सुरक्षा आणि कल्याण योजनेंतर्गत घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी केली जाणार आहे. यासाठी राज्यसरकारने 250 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    खूशखबर! ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा; जाणून घ्या

    मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra budget 2021) सादर केला आहे. यामध्ये जागतिक महिला दिनाच्या (Women's Day) निमित्ताने ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी भरघोस घोषणा केल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    खूशखबर! ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा; जाणून घ्या

    अजित पवारांनी राज्यातील महिलांसाठी 'राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजने'ची घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी 01 एप्रिल 2021 पासून महिलेच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या महसुलामध्ये 1000 कोटींची तूट येण्याची शक्यता आहे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    खूशखबर! ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा; जाणून घ्या

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी प्रवास सवलत योजना - राज्यातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिंनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही राज्यव्यापी योजना आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    खूशखबर! ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा; जाणून घ्या

    तर शहरी भागातील महिलांसाठी 'तेजस्विनी योजना' जाहीर करण्यात आली आहे. मोठया शहरातील महिलांच्या सुलभ व सुरक्षित प्रवासासाठी “तेजस्विनी योजने” अंतर्गत आणखी विशेष महिला बस उपलब्ध करुन देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    खूशखबर! ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा; जाणून घ्या

    महिला व बाल सशक्तीकरण योजना - महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 3 टक्के नियतव्यय राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून प्रत्येक वर्षी किमान 300 कोटी रुपये नियतव्यय उपलब्ध होणार आहेत. त्याचंबरोबर महिला आणि बालांवर अत्याचार प्रकरणाचा निकाल लवकर लागावेत. यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टांच्या निर्मितीसाठी 103 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने राज्य राखीव पोलीस दलात 'स्वतंत्र महिला गट' स्थापन करण्याची घोषणाही अजित पवारांनी केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06